Skip to content
Home » गुरु परिवर्तन – तुळ रास

गुरु परिवर्तन – तुळ रास

  • by

मिळतील प्रगतीच्या संधी

होईल आर्थिक उन्नती

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रह सातत्याने भ्रमण करतात. गोचरद्वारे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांचे विश्लेषण आपण करतच असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामध्ये नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे अनेक अर्थाने सर्वच राशींसांठी अत्यंत शुभ ठणार आहे. कारण ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. १३ एप्रिल रोजी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होणार असून त्यांच्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण आपण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण तुळ राशीसाठी गुरु महाराजाचं हे राशी परिवर्तन कसं राहिल? यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुरु ग्रह व त्यांच्या कारकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणे आवश्यक आहे. सर्व ग्रहांपैकी चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे चार नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखले जातात. मात्र चंद्राला अट लागू आहे की पौर्णिमेजवळचा चंद्र हा शुभ असतो तर अमावस्येजवळचा चंद्र हा अशुभ मानला जातो. चंद्र हा सूर्यापासून जितका लांब असेल, जितकी घरं तो पुढे असेल तितका तो शुभ ठरतो. याशिवाय देखील शुभत्त्वाच्या बाबतीत चंद्राला अनेक अटी लागू आहेत. बुध ग्रह देखील नैसर्गिक शुभ ग्रह आहे. मात्र तो ज्या ग्रहासोबत असतो त्या ग्रहाला अनुसरुन त्याच्या प्रवाभावाची दिशा बदलते. त्यामुळे त्याच्या नैसर्गिक शुभत्वात कुठेतरी उणिव निर्माण होते. मग गुरु आणि शुक्र हे सगळ्यात शुभ ग्रह दोनच उरले. शुक्र साधारणपणे महिन्याभरात राशी बदल करतो. म्हणजे त्याचे जे काही शुभ-अशुभ परिणाम असतील ते तो एका महिन्यात देतो. म्हणजे छोट्या घटनांसाठी शुक्राचं गोचर हे शुभत्व देतं. मात्र गुरु महाराज एका राशीत जवळपास १३ महीने विराजमान असतात. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

सोबतच त्यांच्या दृष्ट्यांचाही खूप मोठा परिणाम होत असतो. इतर सर्व शुभ ग्रहांना सप्तम ही केवळ एकच दृष्टी असते. मात्र गुरु महाराजांकडे पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. महत्त्वाची बाब म्हणजे नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे स्थानापेक्षा त्यांच्या दृष्टीला जास्त महत्त्व असते. किंबहूना त्यांच्या दृष्टीला अमृततुल्य मानले जाते. म्हणजे राशी राशीत १३ महीने राहून एकाच वेळी पत्रिकेतील चार स्थानं शुभ करण्याचं सामर्थ्य गुरु महाराजांमध्ये आहे. त्या चारही स्थानांच्या कारकत्वानुसार अत्यंत शुभ फळं जातकांना प्राप्त होतात. म्हणूनच गुरु महाराजाचं गोचर किंवा त्यांचं राशि परिवर्तन हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. आता तर ते विशेेषत्वाने महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण गेली तीन वर्ष सातत्याने नकारात्मक, संघर्षदायक प्रवासातून आता ते सुखदायक प्रवासाला आता ते सुरुवात करणार आहेत. आपल्या भाषेत सांगायचं झाल्यास गुरु महाराज गत तीन वर्षांपासून खडकाळ रस्त्यावर मार्गक्रमण करीत होते. स्वत: खडकाळ रस्त्यावर असतांना देखील जमेल तेवढी शुभ फळं त्यांनी जातकांना दिलेली आहेत. मात्र त्यांचाच प्रवास संघर्षमय स्थितीत असल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर पडत होता. स्वत:च्या मीन राशीत प्रवेश केल्यानंतर आता ते छानपैकी चौपदरी रस्त्यावरुन वाटचाल सुरु करणार आहेत. परिणामी त्यांची अत्यंत शुभ फळं सर्वांनाच प्राप्त होणार आहेत. असे हे गुरु महाराज १३ एप्रिल रोजी कुंभ राशीतून मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुळ राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

तुळ रास व लग्नाच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज तुमच्या पत्रिकेला तृतीयेश आणि षष्ठेश आहेत. म्हणजे तुमच्या पत्रिकेतील तृतीय आणि षष्ठ या दोन स्थानाचं स्वामीत्व त्यांच्याकडे आहे. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहेत. म्हणजे गुरु महाराज अर्थ त्रिकोणाच्या मध्यावर येणार आहेत. कारण द्वितीय, षष्ठ आणि दशम हे तीन स्थानं मिळून पत्रिकेतील अर्थ त्रिकोण पूर्ण होत असतो. त्यानुसार गुरु महाराज आता तुमच्या षष्ठ म्हणजे अर्थ त्रिकोणाच्या स्थानात प्रवेश करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गुरु महाराज हे एकमेव असे ग्रह आहेत की जे एका अर्थत्रिकोणाच्या स्थानात बसून आपल्या दृष्टीद्वारे संपूर्ण अर्थत्रिकोण पूर्ण करण्याचं सामर्थ्य ठेवतात. त्यानुसार ते तुमच्या षष्ठ स्थानात बसून एकटेच अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत. त्यामुळे साहजिकच आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहिल.

खरं सांगायचं तर तुळ राशीला गुरु महाराज हे कारक ग्रह नाहीत. कारण तुळ राशीचा स्वामी शुक्र आणि गुरु यांच्यात नैसर्गिक शुत्रुत्वाचं नातं आहे. शुक्र म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आणि गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती होय. परिणामी ते एकमेकांचे शत्रु ठरतात व म्हणूनच शुक्राच्या तुळ राशीसाठी ते अकारक ठरतात. दुसरी बाब म्हणजे पत्रिकेतील नकारात्मक स्थान ज्याला ज्योतिषीय भाषेत त्रिक स्थान म्हटलं जातं, त्यापैकी एक असलेल्या तुमच्या षष्ठ स्थानात त्याचं आगमन होत आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांची मीन ही स्वरास येत असल्यामुळे त्या स्थानाचे ते स्वामी देखील आहेत. अशा नकारात्मक बाबी असतांना देखील षष्ठ स्थानातील गुरु महाराज तुम्हाला भररुन शुभ फळं देणार आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर ते अर्थत्रिकोणाच्या स्थानात येणार असल्यामुळे एकटेच पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करण्याला सक्षम ठरतील. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

      मात्र तुळ राशीसाठी अकारक ग्रह असल्यामुळे षष्ठ स्थानातील गुरु महाराज तुमच्यासाठी आरोग्यविषयक काही समस्या निर्माण करु शकतात. तुमचं वजन वाढवू शकतात. ज्या जातकांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांच्या त्रासात वाढ होऊ शकते. या काळात तुमचे शत्रु देखील प्रबळ होऊ शकतात. स्पर्धकांच्या कारवाया वाढू शकतात. असा सर्व त्रास असतांना देखील तुम्ही यश प्राप्त करणार आहात, ही अत्यंत जमेची बाजु म्हटली पाहिजे. सोबतच गुरु महाराजांच्या कृपादृष्टीमुळे या काळात तुम्ही आर्थिक उन्नती प्राप्त करु शकणार आहात. किंबहूना त्यांच्या गोचरचं तुमच्या राशीसाठी असणारं हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून देखील सांगता येईल. आपल्या दृष्टींनी ते तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील. ज्योतिष नियमांनुसार जेव्हा पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण होतो तेव्हा आर्थिक लाभ हा होणारच असतो. फक्त त्याचा किती उपयोग करुन घ्यावा, ते सर्वस्वी तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून असेल. ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही आपले प्रयत्न, परिश्रम वाढवायला पाहिजेत. जेणे करुन तुम्हाला जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल.

 

गुरु परिवर्तन – मेष रास

गुरु परिवर्तन – वृषभ रास

गुरु परिवर्तन – मिथुन रास

 

जसं मी आधीही सांगितलं की गुरु महाराज आपल्या दृष्टीद्वारे तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील. कारण त्यांचा पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन अत्यंत प्रभावशाली दृष्ट्या असतात. इतकंच नव्हे तर स्थानापेक्षा त्यांच्या दृष्टीला जास्त महत्त्व दिलं जातं. कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हणतात. त्यानुसार गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. सोबतच ते अर्थ त्रिकोणाचं देखील स्थान असतं. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे तुमचं कर्म समृद्ध होईल. कर्म समृद्ध झाले की लाभाची प्राप्ती वाढते आणि लाभ वाढला की साहजिकच पैसा वाढतो. उन्नती, प्रगती होत असते. ज्याचा अनुभव तुम्ही या काळात घेऊ शकणार आहात. तुमच्या कर्माची दिशा योग्य राहणार आहे. उचित कर्म करुन तुम्ही उचित लाभ देखील प्राप्त करणार आहात.

यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या व्यय स्थानावर पडेल. व्यय म्हणजे खर्च होय. त्यानुसार पत्रिकेतील व्यय स्थानावरुन अचानक, अनपेक्षित येणारे खर्च व त्या सोबतच परदेशगमन देखील बघितले जाते. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या दृष्टीमुळे जे तुळ जातक परदेशात स्थित आहेत त्यांच्यासाठी अत्यंत शुभ अशा काळाची निर्मिती होईल. सोबतच ज्या जातकांचा व्यवसाय, नोकरी परदेशाशी संबंधित असेल त्यांच्यासाठी देखील हा काळ अत्यंत लाभदायक राहिल. उन्नतीच्या, लाभाच्या विविध संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. तसेच जे जातक शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ शुभ राहिल. त्यामुळे त्यांनी या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवायला हवेत. त्यात ते नक्कीच यशस्वी होतील आणि त्यांची मनोकामना देखील पूर्ण होईल.

यानंतर गुरु महारांची नवम दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावर पडेल. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन, कुटुंब, वाणी यांचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तसेच हे देखील अर्थत्रिकोणाचं स्थान असतं. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे तुम्हाला आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल. सोबतच कुटुंब वृद्धी देखील होऊ शकते. म्हणजे एखादं बाळ किंवा नवीन सुन-जावाईचा प्रवेश तुमच्या कुटुंबात होऊ शकतो. याशिवाय तुमची बुद्धिमत्ता आणि धार्मिक वृत्तीत देखील वृद्धी घडून येईल. धर्माच्या बाबतीत तुम्ही अत्यंत जागरुक व्हाल. थोडक्यात या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या दृष्टी तुमची आर्थिक वृद्धी तर नक्की घडेल. सोबतच तुमचं कौटुंबिक जीवनही समृद्ध होणार आहे. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा.

एकंदरीत या गुरु परिवर्तनाचा विचार केला असता तुमच्या पत्रिकेतील तृतीय व षष्ठ ही गुरु महाराजांची दोन स्थाने, त्यानंतर दशम, व्यय व धन या तीन स्थानांवर पडणारी त्यांची दृष्टी, अशी एकूण पाच स्थानं गुरु महाराज तुमच्यासाठी शुभ करणार आहेत. या पाचही स्थानांच्या कारकत्वानुसार तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होणार आहेत. कारण गुरु महाराज स्वत:च्या स्थानात प्रवेश करणार आहेत. खूप दिवसांनंतर व्यक्ती जेव्हा स्वत:च्या घरी जातो तेव्हा तो खूप आनंदात असतो. तोच आनंदी ती व्यक्ती इतरांना देखील देत असते. ग्रहांचं कारकत्व देखील मनुष्य स्वभावानुसारच असतं, असं म्हणता येईल. गुरु महाराज जेव्हा स्वत:च्या राशीत प्रवेश करतील तेव्हा ते खूप आनंदात असतील. तिथे त्यांना खूप शुभत्व वाटेल. ती शुभता, तो आनंद ते तुम्हाला देखील प्रदान करतील. म्हणूनच या गुरु परिवर्तनाचे अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होईल. ते अर्थत्रिकोण पूर्ण करीत असल्यामुळे आर्थिक उन्नती घडून येईल. मात्र इतर राशींना मिळणाऱ्या फळांशी तुलना केली असता तुळ जातकांना थोडे कमी शुभ फळं प्राप्त होतील.

 

गुरु परिवर्तन – कर्क रास

गुरु परिवर्तन – सिंह रास

गुरु परिवर्तन –  कन्या रास

 

अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गुरु महाराजांचं हे गोचर सुरु असतांना त्यांच्या मागील राशीत शनि तर पुढील राशीत राहु विराजमान असणार आहे. त्याचा देखील एक दुष्प्रभाव तुम्हाला कुठे न कुठे नक्कीच सहन करावा लागेल. मात्र मागील काळापेक्षा येणारा काळ हा नक्कीच चांगला व शुभ आहे, असे आपण म्हणू शकतो. एप्रिल नंतर बऱ्याच शुभ गोष्टी घडणार आहेत. त्यात गुरु महाराजांच्या या गोचरचे देखील तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत.

उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक असे छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे कोणीही अगदी सहज करु शकतो. त्यासाठी विशेष असं काहीच करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. फक्त अट एकच की पूर्ण श्रद्धेने ते उपाय करायला हवेत. त्यानुसार तुळ राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता आधी सांगितल्याप्रमाणे तुळ राशीच्या षष्ठ स्थानात गुरु महाराजांचं आगमन होणार आहे. जे तुम्हाला आर्थिक लाभ प्रदान करणार आहेत. त्यानुसार तुम्ही गोरगरीब गरजूंना उपयुक्त वस्तूचं दान करावं. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.

अशाप्रकारे गुरु परिवर्तनाचे तुळ राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *