Skip to content

ज्योतिष अलंकार परीक्षा आणि 3 दिवसांचे ज्योतिषीय शिबीर →

वार्षिक राशि भविष्य 2022: →

ज्योतिष विशारद
ज्योतिष भास्कर
ज्योतिष प्रवीण
आजचे पंचांग
मैगज़ीन
ज्योतिष विषयावरील माहितीपूर्ण लेख
डॉ. ज्योती जोशी लिखित सर्व पुस्तके
व्हीडिओज
डॉ ज्योती जोशी यांचे स्वतःचे ऍप्प
ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन
व्हिडिओ
डॉ ज्योती जोशी यांचे स्वतःचे ऍप्प

ज्योतिष प्रवीण , ज्योतिष विशारद आणि ज्योतिष भास्कर परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांनी या लिंक वर क्लिक करावे

ज्योतिष विशारद शनिवार, १६ एप्रिल २०२२ दुपारी ०४ ते ०७
ज्योतिष प्रविण रविवार, १७ एप्रिल २०२२ सकाळी १० ते ०१
ज्योतिष भास्कर रविवार, १७ एप्रिल २०२२ दुपारी ०४ ते ०७

रजिस्ट्रेशन सिर्फ आज

🏚 वास्तु केसस्टडीज् – ऑनलाइन कार्यशाला 🏚

रजिस्ट्रेशन सिर्फ आज शाम 7 बजे तक खुला है।

रविवार, 20 जूलाई 2024
समय – दोपहर 12 से 03

🌷 फीस – मात्र 500 रूपये

मार्गदर्शक – गुरुवर्य श्री. नरेंद्र सहस्रबुद्धे जी

आपको 5 दिन के लिए रिकॉर्डिंग दिया जाएगा

पेमेंट करने के बाद .. वर्कशॉप का नाम, अपना नाम और पेमेंट का स्क्रीनशॉट दोनों नंबरों 9850098688, 9075257345 पर भेजें।

🔹 पाठ्यक्रम 🔹

१. अपमृत्यु
२. ⁠अपघात
३. ⁠आत्महत्या
४. ⁠खून
५. रोग जर्जरता

गूगल पे/फ़ोन पे – 9850098688


धन्यवाद!

Join Group

Astroguru Dr. Jyoti Joshi

एस्ट्रोगुरु डॉ ज्योति जोशी यांच्या बद्दल

ज्योतिषशास्त्र ही आपल्या संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. आपल्या ऋषी मुनींनी कठोर परिश्रमातून केलेल्या संशोधनाचे ते फळ आहे. त्याची महती इतकी प्रचंड आहे की, आज हजारो वर्षांनंतरही ते जसेच्या तसे लागू होते. ज्योतिषशास्त्राची निर्मिती मनुष्याच्या कल्याणासाठी करण्यात आलेली आहे. ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने मनुष्याचे जीवन सुखद, सुखकर होऊ शकते. अशा या ज्योतिषशास्त्राची श्री वैदिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या माध्यमातून डॉ.सौ. ज्योती जोशी गत 22 वर्षांपासून सेवा करीत आहेत.

ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योति जोशी यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक जातकांच्या पारिवारीक, वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक समस्या सोडविल्या आहेत. ज्योतिषशास्त्र हे फक्त भविष्य वर्तविणारे शास्त्र अजिबात नाही. ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही. भाग्यात जे लिहिलंय ते अटळ आहे. त्याला कोणीही टाळू शकत नाही. मात्र त्याच्या आधाराने ज्योतिषी जातकाचं आयुष्य अधिक सुखकर नक्कीच करु शकतो. संकट काळात त्याला सावध करुन संकटांची दाहकता कमी करुन शकतो. तसेच प्रगतीचा काळ असेल तर मिळणाऱ्या संधीचा लाभ अधिक चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी सजग करु शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे आणि तेवढा त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास देखील आहे.

नावात काय आहे?

नावात काय आहे?

सर्व ज्योतिषप्रेमी, अभ्यासक व आमच्या सेवा-सुविधांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकासांठी…
जगप्रसिद्ध महान नाटककार शेक्सपिअर म्हणून गेलाय की ‘नावात काय आहे?’ आता एवढा मोठा व्यक्ती म्हणतोय तर काही वेळासाठी आपल्यालाही वाटायला लागतं की, ‘खरंच नावात काय ठेवलंय?’ मात्र वास्तविकतेचा विचार केला असता परिस्थिती याच्या अगदी विपरीत दिसून येते. सर्वकाही नावातच व नावासाठीच तर सुरु आहे. किंबहूना ‘नावात काय आहे?’ असं म्हणणाऱ्या शेक्सपिअरने स्वत: लिहिलेल्या नाटकांना न चुकता स्वत:चे नाव दिले, ही बाब आपल्याला विसरुन चालणार नाही. आज त्याचे नाव एक ब्रॅण्ड झालेले आहे. म्हणजे आज इतक्या वर्षानंतरही त्याने निर्माण केलेल्या कलाकृती केवळ त्याच्यावरच चालत आहेत. थोडक्यात नाव ही आपली ओळख असते आणि ओळख ही खूप परिश्रमाने बनवावी लागते . खूप मोठी तपस्या त्यासाठी करावी लागते. तेव्हाच नावाला ओळख प्राप्त होते. एक वलय प्राप्त होतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ओळख बनविण्यासाठी जेवढे परिश्रम करावे लागतात तेवढेच ओळख टिकवून ठेवण्यासाठी देखील करावे लागतात. अनावधानाने जरी आपल्याकडून एखादी चुक झाली तर नाव खराब होण्याची शक्यता असते. त्यात समाजातील काही विघातक प्रवृत्ती जणू काही अशा व्यक्तींच्या शोधातच असतात. समोरील व्यक्तीच्या नावाचा दुसरोप करणे किंवा विनाकरण त्रास देण्याचा प्रयत्न करणे, हा जणू त्यांचा व्यवसायाच झालेला असतो. आयुष्यातील अनेक वाईट अनुभावांमध्ये हा अनुभव देखील आपल्या वाट्याला येऊ शकतो. जो माझ्या आलेल्या आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच…
श्री ज्योतिष संशोधन केंद्र गत तीन वर्षांपासून ज्योतिष क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहे. अर्थात काही गोष्टी ध्यानी मनी नसतांना खूप व्यापक स्वरुपात होऊन जातात. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचे व चांगल्या उद्देशाने ते फळ असते. वास्तविक पाहता, मी गत २२-२३ वर्षांपासून ज्योतिष क्षेत्रात सेवाव्रत आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञान व सेवासुविधांचा लाभ घेत ज्योतिषशास्त्र घराघरात पोहोचावे… प्रत्येकाला शास्त्राचा लाभ घेता यावा… या उदात्त हेतूने आम्ही ऑनलाईन फ्लॅटफॉमवर काही नि:शुल्क उपक्रम सुरु केलेत. ते सुरु करीत असतांना उद्देश निश्चितच मोठा होता. मात्र त्याला इतक्या कमी वेळात आणि इतक्या व्यापक स्वरुपात प्रसिद्धी मिळेल, याचा मी विचारही केलेला नव्हता. खरं सांगायचं तर आमच्या पिढीसाठी ऑनलाईन ही संकल्पना मूळातच अगदी नवीन होती. मला कुठलाही अनुभव नव्हता. परिणामी रोज नव्या समस्या उभ्या राहत होत्या. त्या सोडविता सोडविता रोज आम्ही नवीन काही तरी शिकत होतो. ही प्रक्रिया अगदी आजही सुरु आहे. फरक फक्त इतकाच की ज्याप्रकारे उपक्रमांची व्याप्ती वाढली आहे, त्याप्रमाणे समस्यांची व्याप्ती देखील वाढली आहे.
यातील एक फारच भयंकर अनुभव म्हणजे एका महाशयांनी चक्क माझ्या नावाने वेबसाईट तयार केली आहे . त्यातही आश्चर्यजनक बाब म्हणजे असे बेकायदेशीर विषय ज्यांना कोणताही सुज्ञ ज्योतिष अभ्यासक थारा देणार नाही, किंबहूना भयंकर गुन्हा ठरतील असे भडक विषय त्या बेवबाईटवर टाकलेले आहेत. ही बाब जेव्हा पहिल्यांदा समजली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला होता. वेळ न दवडता मी यासाठी लगेच आयटी तज्ज्ञांची मदत घेतली. मात्र शोकांतिका म्हणजे समोरील व्यक्ती इतका हुशार आहे की आपण कितीही प्रयत्न केले तरी बेकायदेशीर बाब करुनही तो कायद्याच्या कचाट्यात अडकू शकत नाही. शेवटी त्याला कोपरापासून हात जोडावेसे वाटले.
श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या सर्व उपक्रमांचा सुरुवातीपासूनच मूळ उद्देश शास्त्राचे शास्त्रशुद्ध ज्ञान व शास्त्राचा प्रचार-प्रसार करणे हा राहिलेला आहे. त्यामुळे भलेही परवानगी न घेता कोणी माझ्या नावाचा उपयोग करुन चांगली कामे केली असती, या कामात मदत केली असती तर मला खूप आनंद झाला असता. मात्र ज्या गोष्टी मूळात आपल्या तत्त्वातच बसत नाहीत, ज्यातून समाजाची दिशा भूल होते, शास्त्राचा प्रचार-प्रसार होण्यापेक्षा नाव खराब होते त्या गोष्टी आपण सहन तरी कशा आणि का म्हणून करायच्या? हा फक्त माझ्या नावाचाच नव्हे तर शास्त्राचाही दुपयोग ठरतो. त्यामुळे शास्त्राचे सर्व अभ्यासक, ज्योतिषप्रेमी व आमच्या सेवा-सुविधांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना आमचे आवाहन आहे की अशा चुकीच्या गोष्टींना तुम्ही अजिबात बळी पडू नका. श्री ज्योतिष संशोधन केंद्राचे सर्व उपक्रम फक्त सहा ऑनलाईन फ्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. ते प्लॅटफॉर्म्स म्हणते….

१) ऍस्ट्रोगुरु डॉ.ज्योती जोशी युट्युब चॅनल (मराठी)

२) ऍस्ट्रो गुुरुमाँ डा. ज्योति जोशी युट्युब चॅनल (हिंदी)

३) अभ्यास ज्योतिषशास्त्राचा फेसबूक ग्रुप

४) ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन

५) भविष्य दर्पण (ई-मासिक)

६) www.drjyotijoshi.com

याशिवाय वेबसाईटचे काम अजून प्रगतीपथावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आमची वेबसाईट कार्यान्वित होण्याच्या आधीच इतर कुणी नावाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातहून आश्चर्याची बाब म्हणजे प्रयत्न करुनही समोरील व्यक्ती कोण आहे? हे देखील अजून शोधता आलेलं नाही. असो.. आम्ही आयटी तज्ज्ञांची मदत घेऊन कायदेशीररीत्या त्यादृष्टीने काय करता येईल? याचा प्रयत्न करीत आहोतच. मात्र आमच्याशी संबंधित सर्वांना या द्वारे सूचित करावेसे वाटते की फक्त माझे नाव दिसते आहे, म्हणून तुम्ही या गोष्टींचा अजिबात बळी पडू नका. सोबतच हे माझ्या सोबत झाले आहे तर कोणासोबतही घडू शकते. आम्हाला टेक्निकल गोष्टींचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे ही बाब घडून आलेली आहे. त्यातून आम्हाला जो त्रास सहन करावा लागला, तो तुम्हाला करावा लागू नये किंवा फसवणूक देखील होऊ नये, हाच आमचा उद्देश आहे. म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या.

धन्यवाद!
शुभम भवतु!
डॉ. ज्योती जोशी 

Marathi Video

Hindi Video

0 + वर्षे

एकूण अनुभव

0 +

संतुष्ट जातक

0 +

प्राप्त पुरस्कार

0 +

एकूण विद्यार्थी

तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर आजच मार्गदर्शन मिळवा. (आपली वैयक्तिक माहिती संपूर्णपणे सुरक्षित आहे)

आमच्या मुख्य सेवा

ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही. भाग्यात जे लिहिलंय ते अटळ आहे. मात्र त्याच्या आधाराने ज्योतिषी जातकाचं आयुष्य अधिक सुखकर नक्कीच करु शकतो.
आम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मागच्या 22 वर्षापासुन लोकांचे आयुष्य सुखद व सुखकर बनवत आहोत.

ज्योतिषशास्त्राचे कोर्सेस

आम्ही ज्योतिषशास्त्राचे ऑनलाइन व क्लासरुममधील अध्ययन वर्ग घेतो. आजपर्यंत ३०००+ हून अधिक विद्यार्थ्यांना आम्ही ज्योतिषशास्त्र शिकवले असून त्यातील २०००+ अधिक विद्यार्थी स्व:तच्या पायावर उभे आहेत व उत्तम प्रकारे कन्सल्टन्सी करत आहेत.

ऑनलाईन सल्लामसलत

आम्ही या नव्या युगातील तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ज्योतिषशास्त्राची सेवा करीत आहोत. त्यानुसार आम्ही ऑनलाईन मार्गदर्शनही करीत असतो. वेबसाईटवर तशी सुविधा आम्ही उपलब्ध केली आहे.

आरोग्य

कोणत्याही आजारचा संबंध फक्त आपल्याशी नव्हे तर आपल्या पत्रिकेतील ग्रहांशी सुद्धा असतो. झालेले आजार आणि भविष्यात होणारे आजार सुद्धा पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन ओळखता येऊ शकतात.

वास्तुयोग

आयुष्यातील इतर सुखांबरोबर वास्तुसुखासाठी सुद्धा आपल्या पत्रिकेतील ग्रहच कारणीभुत असतात. ज्यांच्या पत्रिकेत वास्तुयोग असतो त्यांनाच स्वतःच्या वास्तुचे सुख प्राप्त होत असते.

विवाहयोग

मनुष्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्यावर अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह होय. असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. आम्ही म्हणतो लग्नाच्या गाठी पत्रिकेतील ग्रहांवरुन कळतात.

शिक्षणासाठी ज्योतिषशास्त्र

पालक सदैव मुलांच्या शिक्षणासाठी चिंतेत असतात. कारण त्याचा संबंध भविष्याशी असतो. मात्र चिंता न करता वेळीच पाल्याची पत्रिका ज्योतिषीला दाखविली तर पत्रिकेत असणाऱ्या ग्रह स्थितीवरुन योग्य ते शिक्षण घेता येऊ शकते.

नोकरी योग

काहींना किंवा सर्वांनाच कुठली ना कुठली नोकरी कधीतरी मिळेलच. मात्र ती कधी मिळेल, कशी मिळेल? कुठे मिळेल? हे अगदी ते सुद्धा स्वतः सांगू शकणार नाहीत. मात्र त्यांच्या पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन ते सांगता येऊ शकते.

व्यवसाय योग

स्वतःचा व्यवसाय सुरु करणे, त्याला व्यवस्थित सांभाळणे, वाढविणे ही प्रत्येकाला जमणारी गोष्ट नक्कीच नाही. जातकासाठी नोकरी चांगली आहे की व्यवसाय? हे त्या जातकाच्या पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन सांगता येऊ शकते.

संतती सुख

संतती सुखामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने येतात. एक म्हणजे संतती प्राप्तीचे सुख आणि दुसरे म्हणजे संततीपासून मिळणारे सुख होय. आयुष्याचा व्यवस्थित विचार केल्यास या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

कर्ज

काहींचे संपूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यातच वाया जात असते. हे पत्रिकेतील बिघडलेल्या ग्रहस्थितीमुळे घडते. कर्जाच्या फेऱ्यामध्ये जो व्यक्ती एकदा अडकतो तो त्यातून लवकर बाहेर निघु शकत नाहीत.

परदेश गमन योग

प्रदेशात जाण्याची संपूर्ण तयारी केल्यानंतरही काही लोकांना कुठल्या ना कुठल्या कारणाने विमानतळावरुन परत यावे लागते. तर काही लोकांना ध्यानी मनी नसतांनाही, जवळ पुरेसा पैसा नसतांनाही परदेशगमन घडू शकते. हे पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन स्पष्ट होऊ शकते.

नविनतम महितीपूर्ण लेख

एक पत्रिका अशीही - नटसम्राट नव्हे सम्राज्ञी

मनुष्याला नेहमी इतरांच्या आयुष्याकडे पाहून अंदाज बांधण्याची सवय असते. ही सवय कळन-नकळत आपल्याला तुलना करायला लावते. आजच्या जगामध्ये

एक पत्रिका अशीही - काळ थांबत नसतोच...

नमस्कार! ज्योतिषशास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी सौ. ज्योती जोशी मनःपूर्वक स्वागत करते. मला आनंद आहे, की आपण ज्या

एक पत्रिका अशीही - नियती आपली रोज परिक्षा घेते...

नमस्कार! ज्योतिषशास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी सौ. ज्योती जोशी मनःपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्याशी अशा

डॉ ज्योती जोशी लिखित सर्व पुस्तके Amazon वर उपलब्ध