Skip to content

व्यवसायासाठी ज्योतिषशास्त्र

व्यवसायासाठी ज्योतिषशास्त्र

स्वतःचा व्यवसाय सुरु करणे, त्याला व्यवस्थित सांभाळणे, वाढविणे ही प्रत्येकाला जमणारी गोष्ट नक्कीच नाही. मात्र का? याचा कोणी कधी गंभीरपणे विचार केला आहे का? अनेकदा याचा संबंध स्वभावाशी जोडला जातो. स्वभावावरुन हा नोकरी करु शकतो की व्यवसाय याचे अंदाज बांधले जातात. अनेकदा ते खरे ठरतात तर अनेकदा चुकतात. मात्र त्याचे खरे कारण कोणी सांगतांना दिसत नाही आणि ते शोधतांनाही कोणी दिसत नाही. ज्योतिषशास्त्रात मात्र असे होत नाही. जातकासाठी नोकरी चांगली आहे की व्यवसाय? हे त्या जातकाच्या पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन सांगता येऊ शकते. पत्रिकेतील दशम स्थानावरुन व्यवसाय बघितला जातो. व्यवसाय सुरु केला तरी तो कितपत टिकेल. त्यात नफा होईल की तोटा? स्वतंत्र व्यवसाय सुरु करायचा की भागिदारीत? भागिदारी यशस्वी होईल का? फसविले जाण्याची शक्यता आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ज्योतिषशास्त्राच्या आधारे आपल्याच पत्रिकेतून मिळू शकतात. काहींचे व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने सुरु असतात. अगदी यशोशिखरावर ते पोहचलेले असतात. मात्र अचानक गडबडी सुरु होतात. होत्याचे नव्हते झालेल्याची सुद्धा अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. म्हणून व्यवसाय सुरु करण्याआधी, व्यवसाय अडचणीत असतांना किंवा व्यवसाया संबंधी इतर कुठली समस्या असतांना आपली पत्रिका एकदा दाखवायला विसरु नका. ज्योतिषशास्त्रामध्ये कारणे आणि त्यावरील समाधान या दोन्ही गोष्टी आहेत.

ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा

1 ते 3 प्रश्न.1 फोन काॕल