Skip to content
Sale!

अ भा ज्योतिष अधिवेशन

800.003,500.00

ॲस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त

श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित

प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकॅडमी सातारा
आणि
अभिजीत प्रतिष्ठान द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई प्रायोजित

ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन ( वर्ष दुसरे )

दि. ०८ व ०९ जून २०२२
पुणे

विचारांचे, ज्ञानाचे अधिवेशन
ज्योतिषप्रेमींचे महासंमेलन…

नमस्कार!

श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे दोन दिवसीय ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत आहे. आपल्या देशात आतापर्यंत अनेक ज्योतिष अधिवेशने यशस्वीरीत्या संपन्न झाली आहेत व यापुढेही होत राहतील. कारण शास्त्राच्या प्रचार-प्रसारासाठी, प्रसिद्धीसाठी, शास्त्राविषयी सर्वांना जागरुक करण्यासाठी ही अधिवेशने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळेच ज्योतिष अभ्यासक या नात्याने अशा अधिवेशनांना उपस्थित राहणं ही आपली जबाबदारी ठरते.

गेली दोन वर्ष आपण या आनंदाला कुठेतरी पारखे झाले होतो. आता पुन्हा एकदा ही सुसंधी आपल्याला प्राप्त होणार आहे. कारण श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे दि. ०८ व ०९ जून २०२२ रोजी पुणे येथे ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या या दोन दिवसांमध्ये ज्योतिष विश्वातील जेष्ठ व तज्ज्ञांसह, ज्योतिष अभ्यासक व ज्योतिषप्रेमी देखील उपस्थित असतील. ज्यामुळे विचारांचं आदान-प्रदान होणं, अभ्यासाची उचित दिशा सापडणं, आपल्या क्षेत्रात नवीन ओळखी होणं, परिचय होणं या सर्व दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे विचारांचे, ज्ञानाचे हे अधिवेशन ज्योतिषप्रेमींचे महासंमेलन ठरणार आहे.

आपली संस्था जळगावची असतांना देखील केवळ सर्वांना सोयीचं व्हावं, या उद्देशाने आपण पुणे शहरात अधिवेशन घेत आहोत. जेणे करुन जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींना ते सहज आणि सोपे होईल. महत्त्वाची बाब म्हणजे यात आपण कमीत कमी खर्च ठेवणार आहोत. त्यानुसार ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांनी तसेच ज्यांना भविष्यात ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, त्या सर्वांनी या अधिवेनशात सहभागी होण्यासाठी आधी नावनोंदणी नक्की करावी.

नावनोंदणी फी – १,४०० रुपये मात्र.

विशेष प्रतिनिधी

अधिवेशनात विशेष प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी ३५००/- रुपये शुल्क आहे या शुल्कात सन्मानचिन्ह शाल बुके व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल. यांची आसन व्यवस्था पहिल्या चार रांगेत केली जाईल

स्वागत सदस्य समिती

या समितीत सदस्यांची नोंद केली जाईल. त्यांचा सन्मान व्यासपीठावर करण्यात येईल. त्यांची आसन व्यवस्था पाचव्या व सहाव्या रांगेत असेल शुल्क २१००/-

(महत्त्वाचे – अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आधी नावनोंदणी करणे आवश्यक राहिल. अधिवेशनात सहभागी सर्वांना एक वेलकम किट दिले जाईल. तसेच दुपारचे भोजन व चहा यांचा त्यात समावेश राहिल.)

धन्यवाद!
शुभम भवतु!
डॉ.सौ.ज्योती जोशी
श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव

 

Sitting

अधिवेशन सहभागासाठी नाव नोंदणी, अलंकार परीक्षा विद्यार्थी, बाल्कनी रजिस्ट्रेशन फी, विशेष प्रतिनिधी, स्वागत सदस्य समिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अ भा ज्योतिष अधिवेशन”

Your email address will not be published. Required fields are marked *