






ज्योतिष अलंकार परीक्षा आणि 3 दिवसांचे ज्योतिषीय शिबीर →
Astroguru Dr. Jyoti Joshi


एस्ट्रोगुरु डॉ ज्योति जोशी यांच्या बद्दल
ज्योतिषशास्त्र ही आपल्या संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. आपल्या ऋषी मुनींनी कठोर परिश्रमातून केलेल्या संशोधनाचे ते फळ आहे. त्याची महती इतकी प्रचंड आहे की, आज हजारो वर्षांनंतरही ते जसेच्या तसे लागू होते. ज्योतिषशास्त्राची निर्मिती मनुष्याच्या कल्याणासाठी करण्यात आलेली आहे. ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने मनुष्याचे जीवन सुखद, सुखकर होऊ शकते. अशा या ज्योतिषशास्त्राची श्री वैदिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या माध्यमातून डॉ.सौ. ज्योती जोशी गत 22 वर्षांपासून सेवा करीत आहेत.
ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योति जोशी यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक जातकांच्या पारिवारीक, वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक समस्या सोडविल्या आहेत. ज्योतिषशास्त्र हे फक्त भविष्य वर्तविणारे शास्त्र अजिबात नाही. ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही. भाग्यात जे लिहिलंय ते अटळ आहे. त्याला कोणीही टाळू शकत नाही. मात्र त्याच्या आधाराने ज्योतिषी जातकाचं आयुष्य अधिक सुखकर नक्कीच करु शकतो. संकट काळात त्याला सावध करुन संकटांची दाहकता कमी करुन शकतो. तसेच प्रगतीचा काळ असेल तर मिळणाऱ्या संधीचा लाभ अधिक चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी सजग करु शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे आणि तेवढा त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास देखील आहे.
