Skip to content
Home » कुंडली व आपले अवयव – ड्रा.ज्योती जोशी

कुंडली व आपले अवयव – ड्रा.ज्योती जोशी

  • by

“कुंडली व आपले अवयव”

आता आपण आपली कुंडली व आपले अवयव तसेच बारा राशी यांची ओळख करून घेणार आहोत.
आपल्या कुंडलीतील वेगवेगळे स्थान हे वेगवेगळे अवयवही दर्शवित असतात. मनुष्य जीवन हे ग्रहांची दिशा आणि दशा यांच्यावर अवलंबून असते. या ग्रहांचा परिणाम कुंडलीतील वेगवेगळ्या स्थानांवर होत असतो. परिणामी ते स्थान जो अवयव दर्शवित असेल त्या अवयवांवरही ग्रहांचा परिणाम होत असतो. आता आपण कुंडलीतील स्थानानुसार अवयवांच्या बाबतीत जाणून घेऊया.

. प्रथम स्थान: कुंडलीतील प्रथम स्थान हे शरीराचा सर्वांत वरचा भाग म्हणजे चेहरा, डोके, केस दर्शवितात.
. द्वितीय स्थान: द्वितीय स्थानामध्ये मान, मुख, उजवा डोळा यांचा समावेश होतो.
. तृतीय स्थान: तृतीय स्थानामध्ये खांदे, फुफ्फुसे व उजवा कान यांचा समावेश होतो.
. चतुर्थ स्थान: चतुर्थ स्थानामध्ये हृदय, छाती यांचा समावेश होतो.
. पंचम स्थान: पंचम स्थानामध्ये उजवी कुशी, उदर, पाठ यांचा समावेश होतो.
. षष्ठम स्थान:षष्ठम स्थानामध्ये कंबर, पचनेंद्रिय व लहान मोठे आतडे यांचा समावेश होतो.
. सप्तम स्थान: सप्तम स्थानामध्ये ओटी पोट व मूत्राशय यांचा समावेश होतो.
. अष्टम स्थान: अष्टम स्थानामध्ये गुहेंद्रियाचे आतील भागाचा समावेश होतो.
. नवम स्थान: नवम स्थानामध्ये मांड्यांचा समावेश होतो.
१०. दशम स्थान: दशम स्थान गुडघे दर्शवितात.
११. एकादश स्थान: एकादश स्थान पोट-या व डावा कान दर्शवितात.
१२. द्वादश स्थान: द्वादश स्थान हे डावा डोळा व तळ पाय दर्शवितात.

Click Here:- तुमची दैनिक राशीभविष्य येथे तपासा

अशा प्रकारे आपल्या कुंडलीतील प्रत्येक स्थान हे आपल्या प्रत्येक अवयवांचे प्रतिनिधित्त्व करीत असते. कुंडलीतील ग्रहांची दिशा व दशा समजून घेत असतांना या स्थानांचाही आपला अभ्यास असला तर त्यांचे मनुष्य जीवनासह अवयवांवरही म्हणजे शरीरावर कसे परिणाम होतात, हे आपल्या लक्षात येऊ शकते. म्हणून यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
आता आपण राशीविषयी जाणून घेणार आहोत. ‘मनुष्य मूळ स्वभावाला जागतो’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. राशिचक्राचे निर्माते व ज्योतिष तज्ज्ञ श्री. शरद उपाध्ये म्हणतात, ‘‘मनुष्य जातीवर नाही तर राशीवर जातो.’’ आपलं हे बोलणं सिद्ध करण्यासाठी ते विविध दाखलेही देतात. तर विषय आहे राशी व तिची स्वभाव वैशिष्ट्ये व आपल्या जीवनाशी राशीचा असलेला संबंध आता आपल्याला बघायचा आहे. राशीची उत्पत्ती किंवा राशीचा संबंध विस्तीर्ण अवकाशातील तारकासमूहाशी आहे. आपल्याला माहिती आहेच की, चंद्र, सूर्य, पृथ्वी हे सतत भ्रमण करीत असतात. सूर्य भ्रमण करीत असतांना ठरावीक कालावधीनंतर अवकाशातील एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये भ्रमण करीत असतो. या सूर्याच्या भ्रमण मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. ज्योतिषशास्त्राच्या निर्मात्यांनी या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही सव्वादोन नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. आपल्या अवकाश मंडलामध्ये असे एकूण १२ तारकासमूह आहेत. जे १२ राशी म्हणून ओळखले जातात.
भविष्य पाहत असतांना काही जण रवीला महत्त्व देऊन रवीची रास पाहतात. तर काहीजण चंद्राला महत्त्व देऊन चंद्रराशी पाहतात. याचाच अर्थ राशी दोन पद्धतीने पाहता येते. रवी म्हणजे सूर्य! सूर्याची गती ठरावीक असते. त्याची रोजची गती एक अंश इतकी असते. म्हणजे रवी एका महिन्याला एक राशी व एका वर्षात १२ राशी पूर्ण करतो. म्हणजे व्यक्तीचा जन्म ज्या महिन्यात झाला असेल त्या महिन्यात सूर्य ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची राशी समजली जाते.
चंद्राच्या बाबतीत प्रत्यक्ष रास म्हणजे माणसाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी चंद्र ज्या राशीत असेल ती त्या त्या व्यक्तीची रास समजली जाते. चंद्र साधारणपणे सव्वादोन दिवस एका राशीत असतो. म्हणजेच २७ दिवसात तो बारा राशी पूर्ण करतो.
राशी हा विषय व राशीचे ज्योतिषशास्त्रातील महत्त्व, मनुष्य जीवनातील महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला नक्षत्रेही समजून घेणे गरजेचे आहे. सूर्याच्या भ्रमण मार्गाचा म्हणजे क्रांतिवृत्ताचा १/२७ भाग म्हणजे एक नक्षत्र होय. आपल्या अवकाश मंडलामध्ये अशी एकूण नक्षत्रे २७ आहेत. म्हणजेच एका राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्रे असतात. आपल्या ज्योतिषशास्त्राने त्यांचाही अगदी सूक्ष्म अभ्यास करून सांगितले आहे की, प्रत्येक नक्षत्र १३ अंश २० कलांचे असते. त्यात ४ चरण असतात. एक नक्षत्र अनेक तारकांनी बनलेले असते. या नक्षत्रांनाही ज्योतिषशास्त्रामध्ये फार महत्त्वपूर्ण स्थान आहे. कारण संपूर्ण राशींसह ज्योतिषशास्त्राचा संपूर्ण अभ्यासच या नक्षात्रांवर आधारलेला आहे. ह्या राशी क्रमानुसार

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, मीन

अशा आहेत. आपण निसर्ग कुंडलीप्रमाणे सर्व राशींचा केवळ नैसर्गिक अभ्यास करीत आहोत. एकूण आपल्याला आकाशात राशींची स्थाने दिसत नाहीत. तशा राशी काल्पनिक आहेत. मात्र त्यांचे महत्त्व आपण टाळू शकत नाही.

“आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा कुंडली व आपले अवयव सारखा कुंडली व आपले अवयव लिहिलेला ब्लॉग आवडला असेल आणि ब्लॉग वाचण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा.”

Facebook Marathi:- Astroguru Dr. Jyoti Joshi   

Facebook Hindi:- Astro Gurumaa Dr. Jyoti Joshi

Youtube Marathi:- Astroguru Dr Jyoto Joshi

Youtube Hindi:- Astro Guruma Dr Jyoti Joshi

Dr Jyoti Joshi Books:- Best Selling Book

 

 

  धन्यवाद ।
शुभम भवतु ।।
“एस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *