Skip to content
Home » कुंडली ओळख – ड्रा.ज्योती जोशी

कुंडली ओळख – ड्रा.ज्योती जोशी

  • by

“कुंडली ओळख”

ज्योती म्हणजे प्रकाश:- कुंडली ओळख! मनुष्याच्या जीवनामध्ये प्रकाश पसरविणारे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र, अशी या शास्त्राची साधी, सोपी आणि सरळ व्याख्या करता येईल. ज्योतिषशास्त्राच्या मदतीने मनुष्य जीवन सुकर करता येते. अनेक लोक ज्योतिषी म्हणून माझ्याकडे भाग्य बघण्यासाठी येतात. त्यावेळी अनेक समज-गैरसमज ते सोबतच घेऊन आलेले असतात. त्यांना वाटते की, हे आपले भाग्य बदलू शकतील. मात्र ‘ज्योतिषी भाग्य बदलू शकत नाही’ हे अधोरेखित असे सत्य आहे. ज्योतिषी फक्त आपल्या भाग्यात काय लिहिलंय? हे दर्शविण्याचं काम करतो. चांगल्या गोष्टी असतील तर त्यांचा अधिक लाभ कसा घ्यायचा? व वाईट गोष्टी असतील तर होणाऱ्या त्रासाची तीव्रता कशी कमी करता येईल? या विषयी ज्योतिषी मार्गदर्शन करू शकतो. भाग्यात जे लिहिलंय ते घडण्यावाचून कोणीही थांबवू शकत नाही. या विषयी जनजागृती होणे आधी गरजेचे आहे.
ज्योतिषशास्त्राचा शास्त्र या दृष्टीकोनातून अभ्यास करून आपल्याला हे आधी समजून घ्यावं लागेल की, ज्योतिषशास्त्र हे आपल्या फायद्याचे आहे. मनुष्याच्या कल्याणासाठीच आवर आधारलेलं असतं. जन्म कुंडलीमध्ये एकूण १२ घरे असतात. त्याला १२ भाव असेही म्हणतात. हे भाव आपल्या आयुष्यातील वेगवेगळे स्थान दर्शविण्याचे काम करीत असतात. या १२ स्थानांवर ग्रह हे सतत भ्रमंती करीत असतात. त्याविषयी आपण अजून पुढे जाणून घेणारच आहोत. आता फक्त या १२ स्थानांविषयी जाणून घेऊया.

१. प्रथम स्थान म्हणजे तनुस्थान किंवा स्वतःचे स्थान होय.
२. द्वितीय स्थान हे धनस्थान दर्शवितेपल्या पूर्वजांनी अथक परिश्रम करून त्याला विकसित केले आहे. अभिमानाची बाब म्हणजे या शास्त्राचा अभ्यास आज जगभरात सुरू आहे. आपण जन्म कुंडली म्हणजे काय? ती कशी काढली जाते? हे आधी समजून घेणार आहोत. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी जन्माच्या ठिकाणी आकाशात ग्रहांची जी स्थिती असेल त्या स्थितीवरून त्या व्यक्तीची जन्म कुंडली काढली जाते. संपूर्ण ज्योतिषशास्त्र या जन्म कुंडली. म्हणजे व्यक्तीच्या जीवनात कोणत्या वेळी अर्थप्राप्ती कशी राहील? हे दर्शविण्याचं काम द्वितीय स्थान करते.
३. तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान आहे. त्यामुळे या स्थानात होणाऱ्या ग्रहांच्या घडामोडींवरून व्यक्तीचे पराक्रम ठरत असतात.
४. चतुर्थ स्थान हे सुखाचे स्थान आहे. या स्थानावरील ग्रहांची अनुकूलता व्यक्तीच्या जीवनात सुखाचे वातावरण निर्माण करते.
५. पंचम स्थान हे विद्या व संततीचे स्थान आहे. व्यक्तीचे शिक्षण, त्याची विद्वत्ता व संततीची प्राप्ती हे स्थान दर्शवित असते.
६. षष्ठम स्थान हे शत्रूचे स्थान आहे. या स्थानावरील ग्रहांचे बलाबल हे व्यक्तीच्या जीवनात वेळोवेळी येणारे शत्रू किंवा समस्या दर्शविण्याचे काम करतात.
७. सप्तम स्थान हे पती किंवा पत्नीचे स्थान आहे. आपल्या आयुष्यातील जोडीदार कसा असेल? हे दर्शविण्याचं काम हे स्थान करीत असते.
८. अष्टम स्थान हे जी गोष्ट अटळ आहे, मात्र तरीही त्या गोष्टीची सर्वांना भीती वाटते अशा मृत्यूचे स्थान दर्शविते.
९. नवम स्थान हे भाग्य तसेच परदेश गमनाचे स्थान आहे. आपले भाग्य कसे असेल? किंवा परदेश गमनाची संधी आपल्याला मिळेल का? हे दर्शविण्याचे काम हे स्थान करीत असते.
१०. दशम स्थान हे कर्म स्थान दर्शविते. या स्थानातील ग्रहांचा परिणाम आपल्या कर्मावर होत असतो.
११. एकादश स्थान हे लाभ स्थान आहे.
१२. द्वादश स्थान हे व्यय स्थान आहे.

Click Here:- तुमची दैनिक राशीभविष्य येथे तपासा

कुंडलीतील ही वरील १२ स्थाने आपण व्यक्तीच्या स्वतःविषयी असणाऱ्या गोष्टींसाठी बघितली. हीच १२ स्थाने आपले नातेवाईकही दर्शवितात. त्याविषयी आता आपण जाणून घेऊया.

१. प्रथम स्थान हे स्वतःचे स्थान आहे.
२. द्वितीय स्थान हे कुटुंबाचे स्थान आहे. कुटुंबात व्यक्तीशी संबंधित घडणा-या घडामोडी या स्थानानुसार घडत असतात. म्हणून या स्थानाला विशेष महत्त्व आहे.
३. तृतीय स्थान हे भावंडांचे स्थान आहे.
४. चतुर्थ स्थान हे आईचे स्थान आहे.
५. पंचम स्थान हे संतती व प्रथम अपत्य दर्शविते.
६. षष्ठम स्थान हे मामा, मावशी किंवा आईकडील नातेवाईकांचे स्थान आहे.
७. सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार तसेच दुसरे अपत्य दर्शविते.
८. अष्टम स्थान हे व्यक्तीच्या सासरचे स्थान आहे.
९. नवम स्थान हे तिसरे अपत्य दर्शविते.
१०. दशम स्थान हे वडील व सासूचे स्थान आहे.
११. एकादश स्थान हे पहिल्या सुनेचे किंवा पहिल्या जावयाचे स्थान आहे.
१२. द्वादश स्थान हे काका व आत्याशी संबंधित आहे.

आता आपण बघितलं, की जन्म कुंडलीतील १२ स्थाने हे व्यक्तीचे वैयक्तिक व पारिवारिक जीवन कशा पद्धतीने दर्शवितात. तसेच यावरून आपल्या हेही लक्षात आले असेल की या १२ स्थानांनीच व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य व्यापलेले आहे. याशिवाय वेगळे असे काहीच नसते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये जन्म कुंडलीला व त्यातील या १२ स्थानांना खूप महत्त्व आहे.

“आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा कुंडली ओळख सारखा कुंडली ओळख लिहिलेला ब्लॉग आवडला असेल आणि ब्लॉग वाचण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा.”

Facebook Marathi:- Astroguru Dr. Jyoti Joshi   

Facebook Hindi:- Astro Gurumaa Dr. Jyoti Joshi

Youtube Marathi:- Astroguru Dr Jyoto Joshi

Youtube Hindi:- Astro Guruma Dr Jyoti Joshi

 

 

  धन्यवाद ।
शुभम भवतु ।।
“एस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *