Skip to content
Home » ग्रह – ड्रा.ज्योती जोशी

ग्रह – ड्रा.ज्योती जोशी

  • by

“ग्रह”

ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने ज्यांचा अभ्यास केला जातो, जे घटक सर्वांत आधी लक्षात घेतले जातात, ते म्हणजे ग्रह होय. या ग्रहांच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत.
दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य व्यक्ती ग्रहांविषयी पूर्णपणे माहिती नसतांनाही अगदी सहजपणे आपल्या सोबत घडणाऱ्या गोष्टींचा संबंध ग्रहांशी जोडतो. जसे काही चांगले घडल्यास ‘सध्या माझे ग्रह खूप छान आहेत’ असे म्हटले जाते. तसेच काही वाईट घडल्यास त्याचाही संबंध ग्रहांशी जोडला जातो. फक्त आपल्याच बाबतीत नव्हे तर इतरांच्याही बाबतीत ‘सध्या त्याचे ना! ग्रह अगदी जोरावर आहेत’ असे अगदी सहजपणे बोलले जाते. कारण ग्रहांच्या बाबतीत पूर्णपणे माहिती नसली तरी जे काही घडतं ते सर्व ग्रहांमुळेच घडतं यावर सर्वांचा विश्वास आहे, नव्हे ते आपल्या संस्कृतीतच आहे. थोडक्यात मला हे सांगायचं आहे, की मनुष्य जीवन हे ग्रहांची दिशा आणि दशा यांच्यावर अवलंबून असतं. याचाच अर्थ मनुष्याचं संपूर्ण जीवन हे ग्रहांच्या चक्रावर आधारलेलं असतं. त्यामुळे ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अशा या ग्रहांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामुळे तुमची वाढलेली उत्सुकता अधिक न ताणता आपण आता सरळ विषयाला सुरुवात करूया.
रात्री आपण आकाशाकडे एकटक बघितल्यास अनेक तारे आपल्याला दिसतात. त्यांची संख्या मोजणं आजपर्यंत कोणालाही शक्य झालेलं नाही. कारण ते जेवढं आपल्या डोळ्यांना दिसतं तेवढंच नसून अथांग आहे. आपल्या विश्वामध्ये कोट्यवधी तारे आहेत. अनेक सूर्य आहेत तशा त्यांच्या सूर्यमालाही आहेत. या सर्व ताऱ्यांची एकमेकांपासूनची अंतरे ही कोटी मैल दूर आहेत. अनेक सूर्यमालांतील आपली एक सूर्यमाला आहे. एक ताराकापुंज आहे. ज्याला आपण विश्व असे संबोधित असतो. अशी अनंत विश्व या ब्रह्मांडात आहेत, असं खगोलशास्त्र सांगतं. हे सर्व आपण शाळा, कॉलेजमध्ये असतांना शिकलेलो आहे. त्याचबरोबर आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण १२ ग्रह आहेत. जे आजच्या आधुनिक विज्ञानानेही मान्य केलेले आहेत. त्यांच्याविषयी सुद्धा आपण शिकलेलो आहोत. आज पुन्हा आपण त्यांची नव्याने ओळख करून घेणार आहोत. फक्त ओळख नाही तर त्यांच्याविषयी माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊन त्यांचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. आपल्या सूर्यमालेतील १२ ग्रह म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लूटो हे होय. यातील पहिले सात ग्रह म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी या ग्रहांना मुख्य ग्रह म्हणून संबोधलं जाते.

• राहू व केतू या ग्रहांना छायाग्रह किंवा छेदनबिंदू असे म्हणतात.
• हर्षल, नेपच्यून व प्लूटो हे हल्लीचे प्रचलित ग्रह आहेत.

Click Here:- तुमची दैनिक राशीभविष्य येथे तपासा

सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा असून हा ग्रह केंद्रस्थानी स्थिर असतो. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह हे त्याच्या भोवती सतत भ्रमण करीत असतात. सूर्य हा स्थिर असल्याने खगोलशास्त्रात त्याला तारा असे समजतात. या सूर्यताऱ्याची स्वतःची ग्रहमाला आहे. त्यात अनेक ग्रह आहेत. आकाराने लहान असणाऱ्या ग्रहांना लघुग्रह असे म्हटले जाते. त्यातीलच बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, हर्षल व नेपच्यून हे सात ग्रह मोठे ग्रह आहेत. हेच आपल्या सूर्याचे कुटुंब होय.

अशा या आपल्या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचे गुणधर्म, वैशिष्ट्ये, गती, त्यांचे विश्वावर होणारे परिणाम यावरच आपले फलज्योतिषशास्त्र पूर्णपणे अवलंबून आहे. यामध्ये राहू व केतूचाही समावेश करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता राहू व केतू हे ग्रह नाहीत, तर ते छायाग्रह आहेत. चंद्राची कक्षा व पृथ्वीची कक्षा यांचे ते दोन छेदन बिंदू आहेत. पण त्यांना गती असल्याने व त्यांचे परिणाम अनुभवास येत असल्याने त्यांना ग्रह संबोधण्यात आले आहे.

जसं प्रत्येकाचं आपलं एक अस्तित्त्व असतं, आपला स्वभाव असतो व त्यानुसारच प्रत्येक व्यक्ती कार्यरत असतो. तसच प्रत्येक ग्रहांचा आपला एक स्वभाव आहे, अस्तित्त्व आहे. प्रत्येक ग्रहाला आपले काही अधिकार आहेत. त्यानुसार हे ग्रह कार्य करत असतात किंवा त्यानुसारच मनुष्य जीवनावर त्यांचा प्रभाव पडत असतो. जसं एखाद्याला जाणून घेण्यासाठी आधी त्याचा स्वभाव माहिती होणे गरजेचे असते, तसेच ग्रह समजून घेण्यासाठी त्यांचे स्वभाव गुणधर्म समजून घेणे गरजेचे आहे. जे आपण आता समजून घेणार आहोत.

रवी- रवी या ग्रहाला सर्व ग्रहांचा राजा असे म्हणतात. रवी केंद्र स्थानी स्थिर असतो. कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत असल्यामुळे रवी अधिकारांचा कारक ग्रह आहे. राशिचक्रामध्ये रवी हा सिंह राशीचा स्वामी आहे. त्यामुळे सिंह राशीची माणसे खूप मजबूत असतात. त्यांना प्रत्येक ठिकाणी केंद्र स्थानी राहून मोठेपणा हवा असतो तो रवीच्या प्रभावामुळेच.

चंद्र– चंद्र म्हणजे ग्रहांच्या मंत्रीमंडळातील प्रधान होय. चंद्राला कीर्तिकारक ग्रहही म्हटले जाते. त्यामुळे व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये चंद्रबल असल्यास त्याला देदीप्यमान कीर्ती लाभत असते.

मंगळ – मंगळ म्हणजे ग्रहांच्या मंत्रीमंडळातील सेनापती होय. त्यामुळे या ग्रहाला लढवय्या ग्रह असेही म्हटले जाते. मंगळ पराक्रमकारक ग्रह म्हणून ओळखला जातो. हे सर्व गुण मंगळ असलेल्या लोकांमध्ये प्रकर्षाने बघायला मिळतात.

बुध – बुध म्हणजे ग्रहांच्या मंत्रीमंडळातील युवराज होय. कारण ग्रहमालेतील हा ग्रह सर्वांत लहान ग्रह आहे. या ग्रहाला बुद्धीचा कारक म्हटले जाते. बुध प्रबळ असलेल्या लोकांमध्ये बुद्धिमत्ता अगदी ठासून भरलेली असते.

गुरू- गुरू म्हणजे ग्रहांच्या मंत्रीमंडळातील प्रधान मंत्री होय. ज्यांच्याकडे सर्वजण सल्ला मागायला किंवा मार्गदर्शन घ्यायला येत असतात. या वैशिष्ट्यांमुळेच गुरू ग्रहाला ज्ञानाचा कारक म्हटले जाते. गुरूचे बळ असणारे लोक तत्त्वज्ञानी असतात.

शुक्र – शुक्र म्हणजे ग्रहांच्या मंत्रीमंडळातील गुप्तमंत्री होय. सध्याच्या काळात ज्याला सीबीआय म्हटले जाते ते अधिकार शुक्राकडे आहेत. शुक्र या ग्रहाला विषयसुखकारक म्हटले जाते. त्यामुळे शुक्र प्रबळ असणारे लोक विलासी जीवन जगणे पसंत करतात.

शनी – शनी हा ग्रह न्यायाधीश आहे. शनीच्या दृष्टीतून कोणीही व काहीही सुटत नसते. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणजे न्याय देण्याचे काम शनी महाराजांकडे असते. शनी या ग्रहाला परमार्थ कारक म्हटले जाते.

राहू व केतू – राहू व केतू हे ग्रह सेवक म्हणून काम पाहतात. राहू ताटातूट कारक तर केतू कारस्थान कारक ग्रह म्हणून ओळखला जात¨.

हर्षल– हर्षल या ग्रहाला अचानक घटना कारक असे म्हटले जाते. मनुष्य जीवनात आकस्मिक घडणा-या घटना या ग्रहामुळे घडत असतात.

नेपच्यून – नेपच्यून या ग्रहाला अंतःस्फूर्ती कारक असे म्हटले जाते.

प्लूटो- प्लूटो या ग्रहाला संशोधन कारक ग्रह असे म्हटले जाते.

“आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा नक्षत्र सारखा नक्षत्र लिहिलेला ब्लॉग आवडला असेल आणि ब्लॉग वाचण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा.”

Facebook Marathi:- Astroguru Dr. Jyoti Joshi   

Facebook Hindi:- Astro Gurumaa Dr. Jyoti Joshi

Youtube Marathi:- Astroguru Dr Jyoto Joshi

Youtube Hindi:- Astro Guruma Dr Jyoti Joshi

Dr Jyoti Joshi Books:- Best Selling Book

 

  धन्यवाद ।
शुभम भवतु ।।
“एस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *