Skip to content

कर्जासाठी ज्योतिषशास्त्र

कर्जासाठी ज्योतिषशास्त्र

पूर्वी कर्ज काढणे म्हणजे पाप समजले जायचे. आजही खेडेगावांमध्ये राहणाऱ्या साध्या भोळ्या शेतकरी लोकांच्या अंगावर कर्जाचे नाव काढले तरी काटा येतो. मात्र इतर ठिकाणी तसे राहिलेले नाही. आज कोणताही व्यवसाय, उद्योग कर्ज काढल्याशिवाय उभा राहू शकत नाही. वाढती महागाई लक्षात घेता काही मोठे साध्य करायचे असेल तर कर्ज काढावेच लागते. सरकारही त्यासाठी प्रयत्न करते. थोडक्यात आधी कर्ज फक्त संकट काळात काढले जायचे आणि आज ते प्रगती करण्यासाठी काढले जात आहे. त्यामुळे कर्जाचे स्वरुप आणि कर्जाविषयीची मानसिकता आता हळू हळू बदलते आहे. उन्नतीसाठी कर्ज काढले असेल तर चांगली बाब आहे. मात्र कर्ज तेच चांगले जे आपण फेडू शकतो. कर्जबाजारी झाल्यामुळे अनेक घरं बसलेली आपण बघतो. कर्जामुळे रावांचे रंक झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. तसेच काहींचे संपूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यातच वाया जात असते. हे पत्रिकेतील बिघडलेल्या ग्रहस्थितीमुळे घडते. कर्जाच्या फेऱ्यामध्ये जो व्यक्ती एकदा अडकतो तो लवकर त्यातून बाहेर निघु शकत नाहीत. मात्र ज्योतिषशास्त्राची मदत घेतल्यास त्याची तिव्रता किंवा त्यावरील उपाय नक्कीच करता येऊ शकतात. किंवा प्रगतीसाठी कर्ज काढायचे असले तरी आपल्या पत्रिकेतील ग्रह स्थिती त्यासाठी अनुकुल आहे का? हे सुद्धा पत्रिकेवरुन बघता येऊ शकते. म्हणून आपल्याला कर्ज काढायचे असेल किंवा अंगावर कर्ज झालेले असेल तर समाधानासाठी आपली पत्रिका एकदा दाखवायला विसरु नका.

ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा

1 ते 3 प्रश्न.1 फोन काॕल