Skip to content

बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य

 

बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजचा दिवस हा जोडीदारासोबतच कुटुंबीयांसमवेत आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरा कराल. आजच्या दिवशी आपल्या व्यावसायिक क्षेत्रात देखील प्रगती साध्य होईल.

वृषभ
आजच्या दिवशी आपल्यातील योग्यता, क्षमता, कर्तुत्व यांची योग्य ती जाणीव ठेवून जबाबदाऱ्या पार पाडाल. आज अति उत्साहात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

मिथुन
आजचा दिवस आपणासाठी उत्साहाचा, आनंदाचा असेल. आपल्यातील सुप्त कलागुणांना आज वाव मिळेल. त्यातून सौख्याची प्राप्ती होईल. संततीसमवेत आजचा दिवस मजेत जाईल.

कर्क
आजच्या दिवशी उत्तम गृहसौख्याचा आनंद घ्याल. आजचा संपूर्ण दिवस कुटुंबीयांसमवेत उल्हासात व्यतित कराल. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य आज मिळेल.

सिंह
आज आपल्या बुद्धीचातुर्याचा वापर करून काही महत्त्वाची कामे मार्गी लावाल. आज आपल्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी देखील वेळ काढाल.

कन्या
आजचा दिवस परिवारातील सदस्यांसमवेत आनंदी, प्रसन्न, उत्साही वातावरणात साजरा कराल. कुटुंबीयांचे देखील आज आपणास उत्तम सहकार्य मिळेल. कुटुंबीयांसाठी काही खर्च देखील संभवतात.

तुळ
आजचा दिवस आपणासाठी उत्तम असणार आहे. आपल्यातील उत्साहाचा, कर्तुत्वाचा प्रभाव इतरांवर पाडाल. आज आपल्या धाडसी व नेतृत्वगुणी स्वभावाने अनेक समस्यांना सहज पार कराल.

वृश्चिक
आजचा दिवस भक्तीभावाने, अत्यंत उत्साहात साजरा कराल. त्यामुळे मन प्रसन्न होऊन जाईल. आज आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करा.

धनु
इतक्या दिवसांपासून घेत असलेल्या मेहनतीची शुभ फले आज आपणास प्राप्त होतील. आपल्यातील कलागुणांनी लोकांवर आपली सकारात्मक छाप आज सोडाल आणि मानसन्मान व कीर्ती प्राप्त कराल.

मकर
आज आपल्या मूळ कर्मप्रधान व मेहनती स्वभावाला अनुसरून केवळ कर्माला प्राधान्य द्याल. मात्र आज आपल्या कामासोबतच आपल्या कुटुंबियांना देखील तितकाच वेळ द्याल.

कुंभ
आजचा आपला दिवस भाग्यप्राप्ती, सौख्यप्राप्तीचा असेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छांची पूर्तता आज होईल. त्यामुळे आनंदाने सुखावून जाल.

मीन
आजच्या दिवशी काही अनपेक्षित घटना घडू शकतात. आपली प्रकृती व मनस्थिती दोन्हीही स्थिर ठेवणे आवश्यक राहिलं. आजचा शुभ दिवस योग्य पद्धतीने व्यतीत करा.