Skip to content

मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२

राशीभविष्य

 

मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२

{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजचा दिवस काहीसा खडतर जाऊ शकतो. आरोग्याच्या काही कुरबुरी सतावतील. काही मनस्ताप होऊ शकतो. विनाकारण नको त्या गोष्टीत वेळ वाया घालवू नका.

वृषभ
आजचा दिवस उत्साह, नव चैतन्याचा अनुभव घ्याल. आज आपल्या प्रिय व्यक्तीसह आनंदाने, प्रेमाने दिवस व्यतित कराल. आपल्या काही आवडी निवडी आज जपाल.

मिथुन
आजचा दिवस घरच्यांसोबत आनंदात, सुखात व्यतीत कराल. माहेरच्या मंडळींच्या गाठीभेटी संभवतात. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्याल व त्यांचे आशीर्वादही प्राप्त कराल.

कर्क
आज कामानिमित्त काही प्रवासाचे योग संभवतात. आज काही धाडसी महत्वपूर्ण निर्णय घ्याल. शेजार पाजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध राहतील.

सिंह
आज काही आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आपल्या बुद्धी चातुर्याने व बोलक्या स्वभावाने यशाची प्राप्ति कराल. आज कुटुंबियांनाही वेळ द्याल.

कन्या
आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असेल. नावीन्यपूर्ण उत्साह, उमेद, ऊर्जा यांचा अनुभव घ्याल. आजच्या दिवसाचे योग्य नियोजन आवश्यक असेल.

तुळ
आजचा दिवस काहीसा तणावयुक्त जाऊ शकतो. त्यामुळे मन व चित्त काहीसे विचलित होऊ शकते. काही खर्च उद्भवतील. शांत चित्ताने आजचा दिवस व्यतीत कराल.

वृश्चिक
बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छांची पूर्तता आज होईल. त्यामुळे सुखावून जाल. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.

धनु
आज आपण आपल्या कामाला जास्त प्राधान्य द्याल. कामे पूर्ण करण्याकडे कल राहिलं. वरिष्ठांशी काही मतभेद होऊ शकतात. सहकाऱ्यांसमवेत सामंजस्याने वर्तन करा.

मकर
आज भाग्याची, सौख्याची अनुभूती घ्याल. काही प्रवास देखील संभवतात. काही गुरुतुल्य व्यक्तींचा सहवास लाभेल. आजच्या दिवसाचा सदुपयोग करा.

कुंभ
आज काही अडचणी, अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. काहीशी द्विधा मनस्थिती राहिलं. कोणत्याही प्रलोभनांना, आमिषांना बळी पडू नका.

मीन
व्यापारी, व्यवसायिक मंडळींसाठी नवनविन संधी निर्माण होतील. वैवाहिक आयुष्यात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराला वेळ द्या.