Skip to content

बुधवार, दि. ३० मार्च २०२२

राशीभविष्य

 

बुधवार, दि. ३० मार्च २०२२

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }


मेष
आजचा दिवस आपणासाठी सुंदर असेल. बऱ्याच दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीची शुभ फळे आज प्राप्त होतील. आज प्रिय व्यक्तींचे प्रेम व सहवास लाभेल.

वृषभ
आजचा आपला दिवस कर्म प्रधान, कर्तव्य प्रधान असेल. कामाच्या व्यापामुळे काहीशी धावपळ, दगदग जाणवेल. आपण घेत असलेली मेहनत, परिश्रम, कष्ट व संघर्ष यातूनच यशाचा मार्ग सापडेल.

मिथुन
आज बऱ्याच दिवसानंतर काही मनाजोगत्या घटना घडतील. काही इच्छा, अपेक्षांची पूर्तता आज संभवते. आजच्या दिवशी आपण आपल्या सुखात, आनंदात इतरांनाही सामावून घ्याल.

कर्क
आजचा दिवस काहीसा खडतर जाऊ शकतो. काही अप्रिय व्यक्ती, कटू प्रसंग यांना सामोरे जाऊ लागू शकते. मात्र संयम बाळगून, स्थिर बुद्धीने, खंबीरपणे आजचा दिवस व्यतीत करावा.

सिंह
आजच्या दिवशी सुखाची, प्रेमाची, आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराचा मनाजोगता सहवास लाभेल. जोडीदाराला खूश ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्या आवडीनिवडींचा आदर करा.

कन्या
आज काहीशी शारीरिक, मानसिक अस्थिरता जाणवेल. नको त्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे प्रकर्षाने टाळा. कोणावरही विसंबून न राहता आपली कामे आपणच करण्याचा प्रयत्न करावा.

तुळ
आजचा दिवस आपणासाठी उत्तम असणार आहे. त्यामुळे आजच्या सुंदर दिवसाचे योग्य पद्धतीने नियोजन करा व त्यानुसार अंमलबजावणी करत योग्य कृती करा. आज आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त कराल.

वृश्चिक
बऱ्याच दिवसांपासून घरातील काही रेंगाळलेली, रखडलेली, अडकलेली कामे आजच्या दिवशी पूर्ण कराल. घरच्या मंडळींचे त्यात सहकार्य लाभेल. आजचा दिवस आपल्या मर्जीने, मनसोक्त व्यतीत कराल.

धनु
आपली काही स्वप्ने, इच्छा पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्नशील राहाल. त्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले देखील उचलाल. त्यात भावंडं, मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभेल.

मकर
आजचा दिवस कुटुंबीयांमध्ये रममाण होण्याचा आहे. परिवाराच्या आनंदातच आज आपले सुख शोधण्याचा प्रयत्न कराल. त्यांच्या इच्छा – आकांक्षांचा आदर कराल.

कुंभ
आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय उत्तम असेल. एक सकारात्मक ऊर्जा, उत्साह यांचा आपण आजच्या दिवशी अनुभव घ्याल. अपेक्षेपेक्षा जास्त सुखांची प्राप्ती आज संभवते.

मीन
आजचा दिवस आपणासाठी काहीसा त्रासदायक, कष्टप्रद जाऊ शकतो. विनाकारण वाद विवाद कटकटी यासारखे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. खर्चावर नियंत्रण आवश्यक