शुक्रवार, २९ मार्च २०२४
राशिफल
शुक्रवार, २९ मार्च २०२४
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आजच्या दिवशी नेमके काय करावे व काय करू नये, असे वाटेल. परंतु संयमाने, धैर्याने आजचा दिवस व्यतीत करा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका, प्रकृतीची हेळसांड होऊ देऊ नका.
वृषभ
आजचा आपला दिवस चांगला असेल. व्यवसायात काही नवीन संधी चालून येतील. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्या. जोडीदाराचेही उत्तम सहकार्य आज मिळेल.
मिथुन
काहीसे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. काही मानसिक चिंता सतावतील. नोकरदार व्यावसायिकांनी जपून रहावे. प्रवासात खबरदारी घ्यावी.
कर्क
आजच्या दिवशी मनोवांच्छित इच्छांची पूर्तता होईल. आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून त्यानुसार मार्गक्रमण कराल. काही महत्त्वाची कामे देखील आजच्या दिवशी हातावेगळी कराल.
सिंह
आज घरातील कामांमध्ये आपला उत्साह अभूतपूर्व असेल. बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आज वेगाने पूर्ण कराल. मनातील काही अपेक्षा पूर्ण होतील.
कन्या
आजच्या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसाय वृद्धीसाठी एखादे धाडस कराल. विशिष्ट पदाची प्राप्ती कराल. प्रियजनांच्या गाठीभेटी संभवतात.
तुळ
आज आपल्या कामाचा व्याप सांभाळत आपल्या कुटुंबियांनाही वेळ द्याल. कुटुंबियांच्या भावना, इच्छा समजून घ्याल. परिवाराचा विश्वास संपादन कराल.
वृश्चिक
आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. व्यावसायिक, व्यावहारिक यशप्राप्ती आज संभवते. योग्य नियोजन, योग्य निर्णय व त्यानुसार कृती आज साधावी.
धनु
आज आपली काहीशी विमनस्क अवस्था असेल. काहीसे नैराश्य, औदासिन्य जाणवेल. कोणतेही अवास्तव धाडस करण्याचा प्रयत्न करू नका.
मकर
बऱ्याच दिवसांपासून घेत असलेल्या परिश्रमाचे उत्तम फलित आज प्राप्त होईल. अधिकारी, सहकारी प्रशंसा करतील. आजच्या दिवसाचा सदुपयोग करून घ्या.
कुंभ
आज आपण आपल्या कर्तव्याला जास्त महत्त्व द्याल. कर्तव्यपूर्ती करतांना काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घ्याल. आज आपले संपूर्ण कसब पणाला लावाल.
मीन
आज नशिबाची, भाग्याची, सौख्याची प्राप्ती होईल. इतरांना देखील आनंद, सुख, समाधान देऊन आपला आनंद द्विगुणीत कराल. काही धार्मिक, शैक्षणिक कार्यात सहभागी व्हाल.