मंगळवार, २८ नोव्हेंबर २०२३
राशिफल
मंगळवार, २८ नोव्हेंबर २०२३
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आज उत्तम कौटुंबिक सौख्याचा आस्वाद घ्याल. आपल्या दिलदार व शांत स्वभावाने आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल. पाहुण्यांची रेलचेल देखील संभवते.
वृषभ
आज आपल्यातील अभूतपूर्व उत्साहाच्या बळावर कोणतेही काम सहज पूर्णत्वास न्याल. आजच्या दिवसाचे योग्य नियोजन करून नावलौकिक मिळवाल.
मिथुन
आजचा दिवस आपणासाठी काहीसा खडतर असेल. आपल्या प्रयत्नांना, मेहनतीला अपेक्षित यश आज मिळणार नाही. काही अनावश्यक खर्च देखील उभे राहतील.
कर्क
आजचा आपला दिवस हा लाभप्राप्ती, सौख्यप्राप्ती व इच्छापूर्तीचा असणार आहे. काही अनपेक्षित सुखद घटना आज घडतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.
सिंह
आज आपल्या कार्यक्षेत्रात कर्तव्याला प्राधान्य देऊन आपली कामे चोखपणे पूर्ण करण्याकडे कल राहील. निरर्थक गोष्टींमध्ये वेळ न दवडता केवळ आपल्या कर्माला प्राधान्य द्याल.
कन्या
आजच्या दिवशी नशिबाची, भाग्याची उत्तम साथ मिळेल. काही सन्माननीय, वंदनीय, गुरुतुल्य व्यक्तींचा सहवास आज आपणास लाभू शकतो. काही धार्मिक, शैक्षणिक संस्थेत दानधर्म कराल.
तुळ
आजच्या दिवशी शारीरिक, मानसिक अस्थैर्य जाणवू शकते. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रलोभनांपासून दूर राहा. उगाच लक्ष विचलित होऊ देऊ नका.
वृश्चिक
व्यापारी व्यावसायिक व्यक्तींसाठी आजचा दिवस आश्वासक व लाभदायक असेल. व्यवसायाच्या काही नवीन संधी आज निर्माण होतील. आजच्या दिवसाचा सदुपयोग करून घ्या.
धनु
आजच्या दिवशी आरोग्याच्या काही तक्रारी सतावतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कार्यक्षेत्रातील काही विरोधक आज त्रासदायक ठरू शकतात.
मकर
आजच्या दिवशी उत्तम संततीसौख्याची प्राप्ती होईल. मुलांसमवेत स्वतःच्याही कलागुणांना वेळ देत मजेत, आनंदात दिवस व्यतीत कराल. विद्यार्थ्यांनीही आजच्या दिवसाचा सदुपयोग करावा.
कुंभ
आज सौख्याची प्राप्ती कराल. घरातील सदस्यांच्या सहकार्याने काही महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. काही सामाजिक कार्यांमध्ये देखील सहभागी व्हाल.
मीन
आज आपल्यातील उत्तम संभाषण कौशल्य व बुद्धिमत्तेला कर्तुत्वाची जोड देऊन इच्छित फलप्राप्ती कराल. मात्र कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये.