दि. २८ मे ते ०३ जुन २०२३
राशिफल
दि. २८ मे ते ०३ जुन २०२३
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य राहील. सप्ताहाच्या मध्यात प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. हितशत्रू, स्पर्धक डोके वर काढतील. दाम्पत्यजीवनही सर्वसामान्य राहील. सप्ताहाच्या मध्यात वैवाहिक जोडीदाराशी काही मतभेद होण्याची शक्यता राहील. गृहसौख्य, वाहन, वास्तु सौख्य सामान्य राहील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. मात्र कर्तव्यात कुठेही कसूर करून चालणार नाही. प्रामाणिकपणे आपले कर्म करण्यावर भर द्या. या सप्ताहात कर्तव्यपूर्तीतूनच भाग्याची, लाभाची प्राप्ती होणार आहे. अनावश्यक खर्च टाळावेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा. नियोजनबद्ध अभ्यास करावा. नोकरदार, व्यावसायिकांनी अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता राहील.
वृषभ
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल. उत्तम कुटुंबसौख्य, गृहसौख्य लाभेल. संततीही मनाप्रमाणे वागेल. वाहन, वास्तू सौख्य मिळेल. जोडीदाराशी विनाकारण वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी पूर्ण निष्ठेने प्रामाणिकपणे काम कराल. त्याची फळे मात्र पुढील कालावधीत मिळतील. मात्र आता योग्य कर्म करण्यात कमी पडू नका. सप्ताहाचा शेवट आरोग्याचे काही प्रश्न डोके वर काढू शकतात. त्यामुळे आधीच योग्य ती काळजी घ्या. विद्यार्थी जोमाने अभ्यास करतील. नोकरदार, व्यावसायिकांसाठी आश्वासक कालावधी असेल.
मिथुन
या सप्ताहाची सुरुवात आपणासाठी धडाकेबाज असणार आहे. अनेक अडचणी, अडथळ्यांवर मात करून आपण आपले कर्तुत्व सिद्ध कराल. उत्तम कुटुंब सौख्य, गृहसौख्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे देखील आपणास भरभरून प्रेम व सहकार्य मिळेल. जोडीदाराचे देखील उत्तम पाठबळ मिळेल. संततीवर लक्ष देणे आवश्यक राहील. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्या. या सप्ताहात भाग्याचीही साथ मिळेल. त्याचा अवश्य लाभ करून घ्यावा. आरोग्यही सर्वसामान्य राहिलं. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मन भरकटणार नाही, याची काळजी घ्यावी. एकाग्रतेने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. नोकरदार, व्यावसायिकांसाठी उत्तम कालावधी असेल.
कर्क
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य सर्वसामान्य असेल. वाहन, वास्तु सौख्यही लाभेल. आपले कर्तृत्व, शौर्य, धाडस सिद्ध करण्यासाठी अनेक अडचणी, अडथळ्यांचा सामना करावा लागेल. संततीकडे देखील लक्ष द्यावे लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच आपल्याही प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरदार, व्यावसायिकांसाठी काहीसा संघर्षमय कालावधी असू शकतो. मात्र मेहनती अंती लाभप्राप्ती संभवते. विद्यार्थ्यांनी देखील थोडे अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता असेल.
सिंह
हा सप्ताह आपणासाठी उत्तम जाईल. उत्तम पारिवारिक, कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबासमवेत आनंदात काळ व्यतीत कराल. आपल्या मेहनतीतून, परिश्रमातून भाग्य प्राप्तीचा आनंद घ्याल. उत्तम गृहसौख्य, वास्तू – वाहन सौख्य मिळेल. संतती सुद्धा आपल्या मनाप्रमाणे वागेल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व उत्तम सहकार्य मिळेल. उत्तम दाम्पत्य जीवनाचा अनुभव घ्याल. नोकरदार, व्यावसायिकांसाठीही उत्तम सप्ताह राहील. आर्थिक प्राप्ती चांगली राहीलं. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने काही गुंतवणूक कराल. जोडीदारावर खर्च संभवतो. विद्यार्थ्यांसाठी उत्तम कालावधी. त्याचा अवश्य लाभ करून नियोजनबद्ध अभ्यास करावा. प्रकृतीकडे मात्र लक्ष द्यावे.
कन्या
या सप्ताहाची सुरुवात काहीशी चिंतायुक्त असेल. कौटुंबिक सौख्यही सामान्यत राहीलं. गृहसौख्य वास्तू वाहन सौख्य सामान्य राहील दांपत्य जीवन काहीसे असंतुष्ट राहील संततीवरही अधिक लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या तक्रारी सतावतील. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. नोकरदार, व्यावसायिकांसाठी काहीसा संघर्षमय कालावधी असेल. थोडे अधिक मेहनत वा परिश्रम घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांनीही अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता राहीलं. हौसमौज, करमणूक व संततीवर खर्च संभवतो.
तुळ
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. उत्तम गृहसौख्य प्राप्त होईल. सप्ताहाच्या मध्यात मात्र काहीसे नैराश्य, उदासीनता जाणवेल. मात्र आपण त्यावर यशस्वी मात कराल. आपल्या पराक्रमी, धाडसी स्वभावानुसार काही महत्वपूर्ण निर्णय घेताना मात्र विचारपूर्वक घ्यावेत. दांपत्यजीवन सामान्य राहीलं. जोडीदाराचे प्रेम व सहकार्य लाभेल. या सप्ताहात उत्तम संतती सौख्य लाभेल. कला-क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना काहीसा कष्टदायक सप्ताह असेल. विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याचीही योग्य ती काळजी घ्यावी लागेल. नोकरदार व्यावसायिकांसाठी उमेदीचा सप्ताह असेल.
वृश्चिक
हा सप्ताह आपणासाठी कर्मप्रधान असेल. कर्तव्याला प्राधान्य देऊन कर्म कराल व त्यातूनच लाभाची प्राप्ती देखील कराल. कुटुंबात रममाण होऊन उत्तम कौटुंबिक सौख्याची प्राप्ति कराल. उत्तम गृहसौख्य व वास्तू, वाहन सौख्य लाभेल. जोडीदाराशीही चांगले संबंध राहतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नोकरदार, व्यावसायिकांनाही पराक्रमाचा, धाडसाचा सप्ताह असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देणे गरजेचे राहीलं. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून अभ्यास करा. आरोग्य देखील सर्वसामान्य राहिलं.
धनु
हा सप्ताह आपणांसाठी उत्तम असेल. पारिवारिक सुख सर्वसामान्य असेल. गृहसौख्य, वाहन – वास्तु सुख उत्तम मिळेल. उत्तम संततीसुख मिळेल. दांपत्यजीवनही सुखकर राहिलं. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरदार व्यावसायिकांसाठी अगदी उत्तम सप्ताह असेल. आपले योग्य ते कर्तृत्व आपल्या कार्यक्षेत्रात सिध्द कराल. विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करून अभ्यास करावा. अनावश्यक, अनपेक्षित खर्च टाळावेत.
मकर
सप्ताहाची सुरुवात काहीशी त्रासाची राहिल. नंतर मात्र उत्तम सप्ताह असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही असेल. कुटुंबासाठी काही खर्च करावे लागतील. गृहसौख्य, वाहन, वास्तू सौख्य भरभरून मिळेल. घरात वाद उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी. जोडीदाराचे उत्तम सहकार्य व भरभरून प्रेम लाभेल. संततीही मनाप्रमाणे वागेल. विद्यार्थीही मन लावून अभ्यास करतील. नोकरदार मंडळी अधिक मेहनत घेतील. व्यावसायिकांसाठी काही नवीन संधी निर्माण होतील. काही अनावश्यक खर्च देखील संभवतात.
कुंभ
हा सप्ताह आपणासाठी सर्वसाधारण राहील. नवीन उमेद, उत्साह जाणवेल. कौटुंबिक सौख्य साधारण असेल. गृहसौख्य, वाहन वास्तु सौख्य सामान्य राहील. जोडीदाराशी नाते काहिसे असमाधानकारक राहील. विनाकारण वाद विवाद होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराच्या भावनांना मान द्या. नोकरदार मंडळींसाठी लाभदायक काळ असेल. व्यावसायिकांनीही अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता. विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास करावा. अभ्यासात कसूर करू नये. आरोग्य सर्वसामान्य राहील. खर्चावर नियंत्रण आवश्यक राहील. विनाकारण खर्च टाळावेत.
मीन
सप्ताहाच्या सुरुवातीला काही आरोग्यविषयक तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे तब्येतीची काळजी घेणे श्रेयस्कर राहील. खाण्यापिण्याच्या सवयींवर ताबा ठेवणे आवश्यक असेल. पारिवारिक सुख सामान्य राहील. परिवार, कुटुंबियांवर काही खर्च करावे लागू शकतात. गृहसौख्य, वास्तू,वाहन सौख्य सामान्य राहील. आपल्या पराक्रम, धाडसाच्या जोरावर अपेक्षित यश प्राप्त कराल. मात्र फक्त स्वप्नरंजन नव्हे तर प्रत्यक्ष कृती देखील महत्त्वाची असेल. संततीच्या काही समस्या सतावतील. विद्यार्थ्यांनीही अधिक मेहनत घेऊन अभ्यास करावा. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य लाभेल. मात्र आपणही समजूतदारीने वागावे. नोकरदार, व्यावसायिकांसाठी हा सप्ताह सर्वसामान्य असेल.