Skip to content

शनिवार, २८ जानेवारी २०२३

राशिफल

शनिवार, २८ जानेवारी २०२३

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजचा सुंदर दिवस आलेला आहे. परंतु आपले मन शांत, स्थिर व डोके थंड ठेवणे आवश्यक राहील. आजचा दिवस आपल्या मर्जीने, इच्छेने आनंदात व्यतीत कराल.

वृषभ
आजच्या दिवशी काही मनाविरुद्ध,अप्रिय घटना घडू शकतात. त्यामुळे मन काहीसे खट्टू होईल. विनाकारण नको तिथे अधिक खर्च होईल. आवक-जावक यांचा योग्य मेळ साधता येणार नाही. त्यामुळे काळजी घ्यावी.

मिथुन
आजच्या दिवशी काही इच्छित लाभप्राप्ती, सौख्यप्राप्ती होईल. आजच्या दिवशी आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल. मात्र कोणावरही अतिविश्वास ठेवू नये.

कर्क
आजच्या दिवशी कामाचा अतिरिक्त तणाव जाणवेल. कामाची व्याप्ती जास्त व वेळ मात्र कमी अशी स्थिती निर्माण होईल. परंतु आपण प्रामाणिकपणे आपले कार्य पूर्ण करण्यास प्राधान्य द्याल.

सिंह
आज भाग्याची, नशिबाची साथ मिळेल. काही दूरचे प्रवास देखील संभवतात. अनोळखी व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. मात्र प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये.

कन्या
आज ध्यानीमनी नसताना काही त्रासदायक, कष्टदायक गोष्टी घडतील. त्यामुळे काहीसे मानसिक अस्थैर्य जाणवेल. आर्थिक नुकसान देखील संभवते. त्यामुळे मनाचा तोल ढळणार नाही याची काळजी घ्यावी.

तुळ
आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराशी कोणतेही मतभेद, वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आज उभयतांमध्ये सामंजस्य असणे खूप आवश्यक राहीलं. उगाच चिडचिड करू नका.

वृश्चिक
आज काहीसे मानसिक व प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. नैराश्य, उदासीनता यांनी युक्त दिवस जाऊ शकतो. काही अनावश्यक खर्च देखील संभवतात. आज मन शांत ठेवून केवळ आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करा.

धनु
आज आपल्या मुलाबाळांकडे अधिक लक्ष द्यावे लागू शकते. मुलांच्या काही समस्या, चिंता सतावतील. मुलांशी योग्य संवाद साधणे व त्यांना वेळ देणे आवश्यक राहीलं.

मकर
आज गृहसौख्याचा लाभ घ्याल. मात्र घरात काही मनाविरुद्ध, अप्रिय घटना घडणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबीयांसमवेत आज शांततेने, प्रेमाने व धीराने कोणताही प्रसंग हाताळण्याची आवश्यकता राहील.

कुंभ
आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेताना व कोणतेही धाडसी पाऊल उचलताना त्यावर सर्वांगीण विचार करणे आवश्यक राहीलं. अन्यथा नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते.

मीन
आज कुटुंबियातील सदस्यांसमवेत आनंदाने दिवस व्यतीत कराल. कुटुंबीयांची मर्जी मोडू नका. त्यांच्या मताचा निर्णयाचा आदर करा. कोणतीही मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा.