Skip to content

सोमवार, २७ नोव्हेंबर २०२३

राशिफल

सोमवार, २७ नोव्हेंबर २०२३

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आज उत्तम कौटुंबिक सौख्याचा लाभ घ्याल. आजच्या दिवशी कुटुंबातील व्यक्तींचे प्रेम व सहकार्य लाभेल. कुटुंबियांबरोबर एखाद्या सुखद वार्तेने आनंद द्विगुणित होईल.

वृषभ
बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजचा उत्तम दिवस आज आलेला आहे. आज नवचैतन्याचा, उत्साहाचा अनुभव घ्याल. आज मनातील सर्व इच्छांची पूर्तता होईल.

मिथुन
आजच्या दिवशी काहीसे शारीरिक, मानसिक, आर्थिक अस्थैर्य जाणवू शकते. काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. आजच्या दिवशी मन व चित्त शांत ठेवणे आवश्यक राहील.

कर्क
आजचा आपला दिवस लाभप्राप्ती, इच्छाप्राप्तीचा असेल. आज आपल्यातील कलागुणांनी आपली एक वेगळी सकारात्मक प्रतिमा निर्माण कराल. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.

सिंह
आजचा आपला दिवस कर्मप्रधान, कर्तव्यप्रधान असेल. आपल्या धाडसी, आक्रमक स्वभावाला अनुसरून आज कर्म कराल व त्यातून आनंदाची प्राप्ती कराल.

कन्या
आजचा आपला दिवस हा भाग्यप्राप्ती, सौख्यप्राप्तीचा असेल. काही धार्मिक, आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. काही लांबचे प्रवास संभवतात.

तुळ
आजच्या दिवशी काही अडीअडचणी, अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. आज प्रकृती व मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकते. विनाकारण वाद-विवाद, कटकटी सारखे प्रसंग टाळा.

वृश्चिक
आजच्या दिवशी उत्तम वैवाहिक सौख्याचा आस्वाद घ्याल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल.

धनु
आजच्या दिवशी काहीसे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणावरही अवलंबून राहू नका. आपली कामे आपणच करा.

मकर
आजचा दिवस आपणासाठी अतिशय उत्तम असणार आहे. नाविन्यपूर्ण उत्साह आज आपणास जाणवेल. आजचा दिवस आपल्या मुलांसमवेत आनंदात घालवाल.

कुंभ
आजच्या दिवशी आपण घरातील कामांमध्ये रममाण राहाल. आज आपले घर, आपली वास्तू स्वच्छ, टापटीप, नीटनेटकी ठेवण्याकडे आपला कल राहील. आज गृहसौख्याचा आस्वाद घ्याल.

मीन
आजच्या दिवशी काही धाडसी, महत्त्वपूर्ण कामे आपल्या बुद्धिचातुर्याने हातावेगळी कराल. त्यात जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शनही घ्याल. आज भावंडांचे सौख्यही लाभेल.