शनिवार, २७ सप्टेंबर २०२५
राशिफल
शनिवार, २७ सप्टेंबर २०२५
*मेष*
आजच्या दिवशी काही अडचणी, अडथळे संकटे यांचा सामना करावा लागू शकतो. काही अनावश्यक भीती, चिंता सतावेल.
*वृषभ*
आज उत्तम वैवाहिक सौख्याचा आस्वाद घ्याल. आजच्या दिवशी जोडीदाराचे भरभरून प्रेम, सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
*मिथुन*
आज शारीरिक व मानसिक अस्थिरता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी सतावतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
*कर्क*
आजचा संपूर्ण दिवस उत्साहाने, आनंदाने भरलेला असेल. आज स्वतःच्या आवडीनिवडी, छंद जोपासाल. संततीसोबतही आनंदात वेळ व्यतीत कराल.
*सिंह*
आजच्या दिवशी उत्तम गृहसौख्याचा लाभ घ्याल. घरातील सदस्यांसमवेत घरातील काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल. घरातील मंडळींची सेवा कराल.
*कन्या*
आज काही धाडसी, महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. मात्र निर्णय घेताना त्यावर सखोल विचार करणे आवश्यक राहीलं. आज भावंडांचे सुखही लाभेल.
*तुळ*
आज उत्तम कौटुंबिक सौख्याचा आस्वाद घ्याल. कुटुंबीयांसमवेत आजचा दिवस आनंदाने व्यतीत कराल. आज काही आर्थिक व्यवहारही पूर्ण कराल.
*वृश्चिक*
आजचा आपला दिवस हा अतिशय सुंदर व उत्साहपूर्ण असेल. त्याचे योग्य नियोजन करून तो व्यतीत केल्यास त्याचा अवश्य लाभ होईल.
*धनु*
आजच्या दिवशी कोणाशीही वादविवाद, कटकटी होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. अन्यथा मनस्ताप होऊ शकतो. आज काही अनपेक्षित खर्च ही उद्भवतील.
*मकर*
आजचा दिवस लाभ प्राप्तीचा आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छा, आकांक्षांची पूर्तता होईल. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.
*कुंभ*
आजचा आपला दिवस हा कर्तव्याला प्राधान्य देणारा असेल. आज दिवसभर कामात व्यग्र असाल. आपले सर्व कसब पणाला लावून आज आपली कामे पूर्णत्वास न्याल.
*मीन*
आजचा दिवस हा आपल्यासाठी भाग्य, आनंद, यश यांची प्राप्ती करणारा असेल. गुरुजनांचे आशिर्वाद प्राप्त कराल. त्यामुळे दिवसभर नव चैतन्याचा अनुभव घ्याल.