बुधवार, २७ सप्टेंबर २०२३
- राशिफल
बुधवार, २७ सप्टेंबर २०२३
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
*मेष*
बरेच दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीची, परिश्रमाची शुभ फलिते आज आपणास प्राप्त होतील. व्यापार – व्यवसायात काही नवीन संधी प्राप्त होतील. आजच्या दिवसाचा योग्य उपयोग करा.
*वृषभ*
आजच्या दिवशी शांतचित्ताने केवळ हाती घेतलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. आपल्या कामापासून लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या. नोकरदार मंडळींना कामाचा काहीसा तणाव जाणवेल.
*मिथुन*
आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम असेल. काही धार्मिक कार्यात दानधर्म कराल. विद्वान, गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त कराल. आजच्या दिवसाचा सदुपयोग करा.
*कर्क*
आजच्या दिवशी काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. त्यामुळे मनस्वास्थ्य असमाधानकारक राहील. मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने चिडचिड, त्रागा संभवतो.
*सिंह*
आज दाम्पत्य जीवनात समाधान लाभेल. दोघांमधील संबंध सलोख्याचे, सौख्याचे ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. सौख्याची प्राप्ती संभवते.
*कन्या*
आजच्या दिवशी अती उत्साहात कामे पूर्ण करतांना आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाळीव प्राण्यांपासून देखील सावध राहावे.
*तुळ*
आजच्या दिवशी अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील. मात्र आपण उत्साहाने आपली सर्व कामे, कर्तव्ये पार पाडाल. कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल.
*वृश्चिक*
आज पारिवारिक सौख्य लाभेल. आज गृहसजावटीच्या काही वस्तूंची खरेदी संभवते. मालमत्तेसंबंधित काही व्यवहार आज पूर्ण कराल.
*धनु*
आज काहीतरी नवीन करून दाखविण्याची इच्छा निर्माण होईल. मात्र त्यावर योग्य नियोजन व त्यानुसार कृती करणे महत्त्वाचे असेल. काही प्रवासाचे योग संभवतात.
*मकर*
आज पारिवारिक सौख्याचा आनंद घ्याल. मात्र आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आजच्या दिवशी गरजेचे राहील तसेच आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावली जाणार नाहीत ना याचीही काळजी घ्यावी.
*कुंभ*
आज नाविन्यपूर्ण उत्साह, आनंद यांचा अनुभव घ्याल. एक नवीन उमेद, आशा, आकांक्षा आज निर्माण होतील व त्या पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न कराल.
*मीन*
आजचा दिवस काहीसा असमाधानकारक जाऊ शकतो. विनाकारण मरगळ आल्यासारखे वाटेल. निराशा, उदासीनता जाणवेल. त्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ मनन, चिंतन करण्यात व्यतीत करावा.