Skip to content

गुरूवार, २७ एप्रिल २०२३

राशिफल

गुरूवार, २७ एप्रिल २०२३

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजच्या दिवशी उत्तम गृहसौख्याची, समाधानाची, आनंदाची प्राप्ती कराल. आपल्या कुटुंब, परिवारात काही सुवार्ता येऊ शकतात. परिवार, कुटुंबाप्रती आपले कर्तव्य आज चोख बजावाल. ज्येष्ठांचे आशीर्वाद देखील प्राप्त कराल.

वृषभ
आजच्या दिवशी काही नवे संकल्प व नियोजन उत्साहात करून त्याप्रमाणे कार्यास प्रारंभ कराल. काही नवनवीन संकल्पना तसेच नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या व्यवसायामध्ये नवीन बदल घडवून आणाल.

मिथुन
आजच्या दिवशी आपले कौटुंबिक वातावरण समाधानी, आनंदी, व उत्साहवर्धक असेल. कुटुंबियांसमवेत काही मनोरंजनात्मक कार्यामध्ये मग्न राहाल. आज काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार देखील पूर्ण कराल.

कर्क
आजचा दिवस आपणासाठी नाविन्यपूर्ण उत्साहाचा, नवचैतन्याचा, नवीन ऊर्जेचा व उमेदीचा असेल. आज आपल्या मेहनतीचे, कष्टाचे कौतुक होईल. आज स्वतःसाठी देखील वेळ काढाल.

सिंह
आजचा आपला दिवस काहीसा काळजी, चिंता, भीती यांनी युक्त असा जाऊ शकतो. मनावर विनाकारण कसलेतरी दडपण येईल. मात्र आपण व्यर्थ चिंता न करता केवळ आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करा.

कन्या
आजच्या दिवशी उत्तम लाभप्राप्ती, इच्छाप्राप्ती, सौख्यप्राप्ती संभवते. बऱ्याच दिवसानंतर आज आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. काही जुन्या मित्र-मैत्रिणींशी भेट झाल्याने आपल्या आनंदात भर पडेल.

तुळ
आज आपल्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या वरील काही जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. अतिरिक्त काम करावे लागल्यामुळे काहीशी दगदग, धावपळ संभवते. मात्र आपल्या चांगल्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल.

वृश्चिक
आजच्या दिवशी आपण काही धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी राहाल. त्यामुळे कौतुकास प्रशंसेस पात्र ठराल. क्वचित प्रसंगी प्रवासाचे योग देखील संभवतात. आज थोरा मोठ्यांचे आशीर्वाद प्राप्त कराल.

धनु
आजचा दिवस आपल्यासाठी काहीसा प्रतिकूल असेल. त्यामुळे आज स्वतःला वाद-विवादांपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही परिस्थितीत आपले मनोधैर्य खचणार नाही याची काळजी घ्या.

मकर
आजच्या दिवशी उत्तम वैवाहिक सौख्याची प्राप्ती कराल. दाम्पत्य जीवनातील मधुरता, सौख्य, प्रेम वृद्धिंगत होईल. आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात आज काही नवीन संधी उपलब्ध होतील.

कुंभ
आजच्या दिवशी काहीसे शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याच्या छोट्यामोठ्या तक्रारी सतावतील. आज उधार, उसनवारी टाळावी. काही हितशत्रू, स्पर्धक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात.

मीन
आज आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन संधी निर्माण होतील. त्यांचा अवश्य लाभ करून घ्या. कला क्षेत्रातील मंडळींना आजचा दिवस उत्तम असेल. आज काही प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी झाल्याने सुखावून जाल.