Skip to content

सोमवार, २६ जुन २०२३

राशिफल

सोमवार, २६ जुन २०२३

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजचा दिवस काहीसा कष्टप्रद राहू शकतो. मात्र आपण आपल्या नित्य कर्मावर लक्ष ठेवून आजचा दिवस व्यतीत करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ
आज आपल्या बुद्धिचातुर्याने दिवस आनंदात, मजेत व्यतीत कराल. एक नावीन्यपूर्ण उत्साह व उमेद आज आपल्यात असेल. संततीसौख्य देखील लाभेल.

मिथुन
आजच्या दिवशी उत्तम गृह सौख्याची प्राप्ती होईल. आज घरातील सर्वांची काळजी घ्याल. घरातील बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आज झपाट्याने पूर्ण कराल.

कर्क
आज आपल्यातील धाडस कर्तुत्व व उत्साही स्वभाव यांचा योग्य उपयोग करून जास्तीत जास्त लाभ प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. बुद्धिमत्तेला कर्तुत्वाची जोड लाभेल.

सिंह
आज आपल्या कामाचे नियोजन करतानाच पारिवारिक, कौटुंबिक सौख्याचा देखील आनंद घ्याल. कुटुंबीयांसमवेत त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा.

कन्या
आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय सुंदर व महत्त्वाचा असेल. काहीतरी नवीन गोष्टी करण्याकडे आज आपला ओढा राहील. उत्साह, उमेद यांनी परिपूर्ण असा दिवस असेल.

तुळ
आज काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता राहील. त्यामुळे मन काहीच खट्टू होईल. काही अनावश्यक खर्च देखील संभवतात. खर्चाचा योग्य ताळमेळ साधावा.

वृश्चिक
आजचा आपला दिवस लाभ, यश, आनंदाची प्राप्ती करणारा असेल. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. मित्रमंडळींसमवेत दिवस मजेत जाईल.

धनु
आपल्यातील बुद्धिमत्ता व व्यवहार कौशल्य यांचा योग्य वापर करत आज कार्यसिद्धी साधाल. संपूर्ण दिवस कार्यमग्न असाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

मकर
आजच्या दिवशी भाग्याची, सौख्याची, आनंदाची प्राप्ती कराल. आपल्यातील कलाकौशल्य, रसिकता, मधुरता यांचा योग्य ताळमेळ साधत मजेत दिवस घालवाल.

कुंभ
आजच्या दिवशी काहीसे मानसिक अस्थैर्य जाणवेल. आपल्यातील ताकद, धडाडी,शौर्य यांचा अतिरेक टाळावा .अन्यथा मनस्ताप, पश्चाताप होऊ शकतो.

मीन
आजचा आपला दिवस उत्साही, आनंदी असेल. वैवाहिक जोडीदाराला मनासारखा वेळ द्याल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत देखील विचारात घ्याल.