शुक्रवार, २६ मे २०२३
राशिफल
शुक्रवार, २६ मे २०२३
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आज घरातील मंडळींच्या सहकार्याने घरातील एखादे महत्त्वाचे काम पूर्ण कराल. आजचा दिवस आपल्या मर्जीने मनसोक्त व्यतीत कराल.
वृषभ
आपली काही स्वप्ने, इच्छा पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्नशील राहाल. त्यादृष्टीने काही महत्त्वाचे पाऊल उचलाल. त्यात भावंड, मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल.
मिथुन
आजचा दिवस कुटुंबीयांमध्ये रममाण होण्याचा आहे. त्यांच्या आनंदात आज आपले सुख शोधण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या इच्छा, आकांक्षांचा आदर करा.
कर्क
आजचा दिवस आपणासाठी अतिशय उत्तम असेल. एक सकारात्मक ऊर्जा, उत्साह यांचा आज आपण अनुभव घ्याल. आजच्या दिवसाचा सदुपयोग अवश्य करा.
सिंह
आजचा दिवस आपणासाठी काहीसा कष्टप्रद जाऊ शकतो. काही वितंडवादाचे प्रसंग घडू शकतात. त्यामुळे असे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची कामे आज टाळावीत.
कन्या
आजचा दिवस आपणासाठी लाभदायक असेल. इतक्या दिवसांपासून घेत असलेल्या अविरत मेहनतीची शुभ फळे आज मिळतील. आज सर्वांचे प्रेम व सहवास लाभेल.
तुळ
आजचा दिवस कष्ट, मेहनत परिश्रमाचा असेल. कामाच्या व्यापामुळे काहीशी धावपळ, दगदग होईल. मात्र संघर्षातूनच यशाचा मार्ग सापडेल. त्यामुळे चिंता करू नका.
वृश्चिक
आज बऱ्याच दिवसानंतर काही घटना आपल्या इच्छेनुसार घडतील. काही इच्छा, अपेक्षांची पूर्ती आज संभवते. आपल्या सुखात, आनंदात इतरांनाही सामावून घ्याल.
धनु
आज काही अप्रिय व्यक्ती, प्रसंग समोर येऊ शकतात. मात्र स्थिर बुद्धीने व खंबीरपणे त्यांना सामोरे जा. दुखापत होऊ शकते. काळजी घ्या
मकर
आजच्या दिवशी सुखाची, प्रेमाची, आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराच्या आवडीनिवडीचा आदर करा. जोडीदाराला खूश ठेवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ
आज काही शारीरिक, मानसिक अस्थैर्य जाणवेल. नको त्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे प्रकर्षाने टाळा. कोणावरही विसंबून न राहता आपली कामे आपणच करण्याचा प्रयत्न करा.
मीन
आजच्या सुंदर दिवसाचे योग्य पद्धतीने नियोजन करा व त्यानुसार त्याची अंमलबजावणी करा. आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त कराल.