Skip to content

शुक्रवार, २५ जुलै २०२५

राशिफल

शुक्रवार, २५ जुलै २०२५

*मेष*
आज गृहसौख्यचा आनंद घ्याल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद प्राप्त कराल. वाहन, वास्तू खरेदी संभवते. परिवाराचे सहकार्य लाभेल.

*वृषभ*
आज आपल्या शौर्याने, धाडसाने काही महत्वपूर्ण निर्णय घ्याल. आज भावंडांचे सौख्य लाभेल. त्यांच्या समवेत काही प्रवास योग संभवतात.

*मिथुन*
आज कुटुंबियांचे उत्तम सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी, प्रसन्न राहिलं. कुटुंबीयांसमवेत सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्याल.

*कर्क*
आजचा आपला दिवस उत्साहाने, नविन्याने भरलेला असेल. आज आपला कार्यभाग साधाल. आज स्वतःसाठी वेळ काढाल. काही महत्वाची कामे हातावेगळी कराल.

*सिंह*
आजचा काही गृह उपयोगी वस्तूंची खरेदी संभवते. परिवारातील सदस्यांसमवेत कुठे बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखाल.

*कन्या*
आज अनेक इच्छांची, लाभाची , आनंदाची प्राप्ती होईल. काही महत्वाकांक्षा पूर्ण कराल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. काही प्रिय व्यक्तींबरोबर वेळ व्यतीत कराल.

*तुळ*
आजचा आपला दिवस कर्म प्रधान असेल. आज कामाचे योग्य नियोजन करून त्यानुसार कृती कराल. आज हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहाल.

*वृश्चिक*
आज आपल्या कर्तुत्वाला वेगळीच झळाळी प्राप्त होईल. आज भाग्याची देखील उत्तम साथ लाभेल. आज काही धार्मिक, आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल.

*धनु*
आज काही गोष्टी जरी आपल्या इच्छेनुसार घडल्या नाहीत, तरी फारसे मनावर घेवू नका. उद्याचा दिवस हा आपलाच आहे. कुटुंबीयांना प्राधान्य देऊन आजचा हा सुंदर दिवस व्यतीत कराल.

*मकर*
आज जोडीदाराला एखादी भेट वस्तू द्याल. जोडीदारासाठी काही खरेदी देखील कराल. जोडीदाराचेही भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. आपल्या व्यवसायातही काही आनंददायक अनुभव येतील.

*कुंभ*
आज आपला उत्साह, ऊर्जा काहीशी नियंत्रणात ठेवावी. विनाकारण दगदग धावपळ करू नये. शांत चित्ताने आजचा दिवस व्यतीत करावा. प्रकृतीकडेही लक्ष द्यावे.

*मीन*
आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. आज काही नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याकडे कल राहील. आज आपल्या काही आवडीनिवडी, छंद जोपासण्यासाठी वेळ काढाल. संतती सोबत दिवस मजेत जाईल.