Skip to content

शनिवार, २५ फेब्रुवारी २०२३

राशिफल

शनिवार, २५ फेब्रुवारी २०२३

{आज ज्यांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद

मेष
आजचा दिवस हा आपलाच आहे. सर्वकाही मनाजोगते घडेल. अपेक्षेपेक्षा जास्त सुखाची प्राप्ती आज संभवते. आजच्या सुंदर, उत्साहपूर्ण दिवसाचे योग्य नियोजन करून त्यानुसार कृती करा.

वृषभ
आज रोजच्या कार्यात दगदग, धावपळीचे प्रमाण वाढेल. छोट्या छोट्या कार्याच्या पूर्ततेसाठी जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे मनात अशांततेची भावना निर्माण होऊ शकते.

मिथुन
आजच्या दिवशी स्वकर्तुत्वाने, परिश्रमाने इच्छित लाभ संपादन कराल. तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. सार्वजनिक जीवनात तुमची पत, प्रतिष्ठा वाढेल.

कर्क
आज आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त होईल. नियोजनपूर्वक कामात निश्चितपणे यशप्राप्ती, उत्तम मान मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

सिंह
आजच्या दिवशी मनात असलेली, नियोजित सर्व क्षेत्रातील कार्य थोड्याच प्रयत्नांनी सहजसुलभ होतील. त्यामुळे कामाचा हुरूप वाढेल. एखाद्या धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.

कन्या
आजचा दिवस काहीसा त्रासदायक, कष्टदायक जाऊ शकतो. वादविवादापासून दूर राहणे, प्रलोभनांपासून अलिप्त राहणे आवश्यक राहील. कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करा.

तुळ
आजच्या दिवशी आपणास उत्तम वैवाहिकसौख्याची प्राप्ती होईल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. पारिवारिक एकोपा अनुभवास येईल. व्यापार व्यवसायाविषयी काही नवी धोरणे ठरवून त्यानुसार नियोजन कराल.

वृश्चिक
नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी इतरांवर टीका करणे टाळा. हितशत्रूंच्या कारवाया यांना बळ देऊ नका. प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील. अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ व्यर्थ जाऊ देऊ नका.

धनु
आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती कामे करून घेणे श्रेयस्कर ठरेल. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आज आपल्यातील सुप्त कलागुणांनाही वाव द्याल.

मकर
आज कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील अनुकूल वातावरणामुळे प्रसन्नता, आनंद, समाधान यात वृद्धी होईल. स्थावरमालमत्ता, जमीनजुमल्यांविषयीची कार्ये सफल होतील.

कुंभ
आज आपण वैयक्तिक प्रयत्न व जास्त परिश्रम करून यशप्राप्ती कराल. काही छोट्या-मोठ्या शुभ घटना घडल्याने दिलासा मिळेल. काही महत्त्वाची कामे साध्य करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

मीन
आज कुटुंब – परिवारात काही सुवार्ता कानी येऊ शकतात. त्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांचेही अपेक्षित सहकार्य लाभेल. काही जुन्या गुंतवणुकी आर्थिक फायदा मिळवून देतील.