Skip to content

सोमवार, २४ ऑक्टोबर २०२२

राशीभविष्य

सोमवार, २४ ऑक्टोबर २०२२

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजचा दिवस आनंदाचा, उत्साहाचा, उत्सवाचा आहे. काही नातलगांच्या गाठीभेटी संभवतात. आपला स्वभाव दबंग असला तरीही आततायीपणाने कोणतेही धाडस करू नये.

वृषभ
आजचा आपला दिवस उत्तम आहे. तो आनंदाने, उत्साहाने व्यतीत कराल. आज आपल्यातील कलागुण, आवडीनिवडी, छंद यांना प्रोत्साहन द्याल.

मिथुन
आजच्या दिवशी गृहसौख्याचा, कुटुंब सौख्याचा आस्वाद घ्याल. कुटुंबीयांसमवेत घरातील काही महत्वाची कामे पूर्ण कराल. खरेदीचे योग संभवतात.

कर्क
आजचा आपला दिवस हा सौख्याचा, आनंदाचा, पराक्रमाचा असणार आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घ्या. आज आपल्या कामात नावलौकिक मिळेल. छोटे-मोठे प्रवास संभवतात.

सिंह
आज कौटुंबिक सौख्याचा आनंद घ्याल. कुटुंबियांना वेळ द्याल. आज आपले कला, छंद यांची जोपासना कराल व त्यातच रममाण व्हाल. काही आर्थिक व्यवहार पूर्ण कराल.

कन्या
आजचा दिवस आपल्यासाठी नवीन ऊर्जा व अभूतपूर्व उत्साह यांनी भरलेला असेल. आजच्या सुंदर व महत्वपूर्ण दिवसाचा अवश्य लाभ करून घ्या. वैवाहिक जोडीदार व व्यावसायिक भागीदार यांना खुष ठेवा.

तुळ
आज सर्वत्र आनंद, उत्साह ओसंडून वाहत असेल. आज काही नवीन खरेदीचे योग संभवतात. काही गुंतवणूक आज कराल. काही दूर प्रवासाचे नियोजन देखील आज कराल.

वृश्चिक
आजच्या दिवशी लाभाची, आनंदाची, सौख्याची प्राप्ती कराल. प्रियजनांचा सहवास प्राप्त होईल. त्यामुळे आनंदून जाल. आज सर्वत्र आनंद, उत्साह ओसंडून वाहत राहिलं.

धनु
आजच्या दिवशी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडण्याकडे आपला कल असेल. आज आपल्यातील उत्साह द्विगुणित झाल्याने आपल्या कार्यक्षेत्रात यश संपादन कराल.

मकर
आजचा दिवस सुखमय, आनंदमय असेल. आज नशिबाची, भाग्याची साथ मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे शुभ फलित आज प्राप्त होईल.

कुंभ
आपल्यातील बुद्धीचातूर्यच्या बळावर आज काहीतरी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कराल. नवीन, कलात्मक गोष्टी करण्याकडे कल असेल.

मीन
आजच्या दिवशी जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. आपणही जोडीदाराला वेळ द्याल. एकमेकांच्या साथीने आजचा सुंदर दिवस अधिकच सुंदर बनवाल