Skip to content

२४ ते ३० जुलै २०२२

राशीभविष्य

 

२४ ते ३० जुलै २०२२

{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा }

मेष
हा सप्ताह आपल्यासाठी सर्वसामान्य राहिलं. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. कुटुंबीयांचे भरभरून सहकार्य राहीलं. जोडीदाराचेही पाठबळ राहीलं. संततीसौख्य लाभेल. वाहन ,वास्तूसौख्य सामान्य राहीलं. आपली बुद्धिमत्ता योग्य ठिकाणी वापरून कार्यभाग साधाल. सप्ताहाच्या मध्यात आरोग्याच्या कुरबुरी जाणवतील. प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नोकरदार मंडळींनी शांतपणे व सामंजस्याने आपले नित्य कर्म करावे. उगाच वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यावसायिकांसाठी उत्तम कालावधी. अनाठायी खर्च टाळावेत.

वृषभ
हा सप्ताह आपणासाठी नवचैतन्याचा, उत्साहाचा, आनंदाचा राहीलं. उत्तम कुटुंबसौख्य, गृहसौख्य, संततीसौख्य लाभेल. जोडीदाराशी मात्र सामंजस्याने वागा. अन्यथा वितंडवाद संभवतो. आरोग्यही सर्वसामान्य राहिलं. नोकरदार व्यावसायिकांसाठी लाभदायी, यशदायी काळ. अडचणी अडथळ्यांवर मात कराल. अध्यात्मिक प्रगती साधाल. मित्रमंडळींमध्ये आनंदाने वेळ व्यतीत कराल. विद्यार्थ्यांनी आळस, कंटाळा न करता नियमितपणे अभ्यास करावा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मिथुन
या आठवड्याची सुरुवात धडाकेबाज असेल. कौटुंबिक सौख्य बऱ्यापैकी असेल. पारिवारिक आयुष्यात आपली भाषा व वाणी यांवर नियंत्रण ठेवावे. वाहन – वास्तू सौख्य लाभेल. गृहसौख्य उत्तम असेल. दांपत्य जीवन सामान्य राहीलं. नोकरी-व्यवसायात आपल्या पराक्रमाने यश, लाभप्राप्ती कराल. आर्थिक व्यवहार सांभाळून करावेत. संततीवर लक्ष देणे आवश्यक. संततीवर, जोडीदारावर खर्च करावे लागतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. वाईट संगतीपासून दूर राहावे. कर्मप्रधान स्वभावाने लाभाची प्राप्ती कराल.

कर्क
हा सप्ताह आपल्यासाठी सौख्यप्राप्ती, आनंदप्राप्ती, लाभप्राप्तीचा असेल. वास्तू-वाहन सौख्य, गृहसौख्य लाभेल. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. मन व चित्त शांत ठेवणे गरजेचे राहीलं. आपली मेहनत व नित्यकर्म प्रामाणिकपणे करा. वायफळ खर्च होणार नाही, याकडे लक्ष द्या. मित्रमंडळींवर खर्च होऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी राहणार नाही. मात्र उत्साहाचा थोडा अभाव राहीलं. स्पर्धक, हितशत्रूंवर विजय प्राप्त कराल. कुटुंबापेक्षा कर्माला जरा जास्त प्राधान्य द्याल. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. अधिक मेहनत घ्यावी. कलाकारांना मोठ्या संधी प्राप्त होतील.

सिंह
हा सप्ताह आपल्यासाठी अपेक्षित भाग्यप्राप्तीचा असेल. इतके दिवस रखडलेली, अडकलेली, रेंगाळलेली कामे आता मार्गी लागतील. आपले ध्येय साध्य करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आपण प्रचंड मेहनत, परिश्रम घेत होतात. मात्र हा सप्ताह आपल्यासाठी लाभदायक असेल. उत्तम वाहन – वास्तूसौख्य लाभेल. संततीही मनाप्रमाणे वागेल. नोकरदार मंडळींसाठी लाभदायक सप्ताह. व्यावसायिकांसाठी मात्र काहीसा संघर्षाचा काळ असू शकतो. अनपेक्षितपणे काही खर्च उद्भवू शकतात. खर्चाचे योग्य नियोजन आवश्यक. सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

कन्या
या सप्ताहाची सुरुवात काहीशी तणावग्रस्त असेल. नंतर मात्र उत्साहपूर्ण सप्ताह असेल. नवनवीन गोष्टी शिकण्याकडे आपला कल असेल. आपले व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ व विकसित होईल. अधिक परिश्रम घेण्याची मानसिकता राहीलं. पारिवारिक सुखही उत्तम राहील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. परिश्रम व मेहनत घेऊन आनंद व समाधानाची प्राप्ती कराल. विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न कराल. वास्तु – वाहन सौख्य लाभेल. गृहसौख्यही उत्तम असेल. विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करतील मात्र अभ्यासात सातत्य असणे गरजेचे. स्पर्धक, हितशत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मात्र आपण त्यांच्या कारवाया हाणून पाडाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य ती काळजी घ्या.

तुळ
सप्ताहाची सुरुवात कर्मप्रधान असेल. कामाचा बोजा जाणवेल. मात्र आपण आपले कर्तव्य चोख बजावून त्यातून आनंदाची प्राप्ती कराल. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य, संततीसौख्य चांगले राहीलं. कामाच्या/ व्यवसायाच्या ठिकाणी आपण जे नियोजन याआधी केलेले आहे, ते प्रत्यक्ष कृतीत या सप्ताहात आणाल. मात्र कष्ट घेण्यात कोठेही कमी पडू नका. आपले नित्यकर्म चोखपणे करीत राहा. विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता राहीलं. अभ्यासात चालढकल करून चालणार नाही. आधी काही गुंतवणूक केलेली असेल तर त्यातून लाभप्राप्ती होण्याची शक्यता. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवू शकतात.

वृश्चिक
सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचा तणाव जाणवेल. कामे उरकण्याकडे, पूर्णत्वास नेण्याकडे सर्व लक्ष राहीलं. कर्तव्याला जास्त प्राधान्य द्याल. कौटुंबिक, पारिवारिक सौख्य उत्तम लाभेल. कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. उत्तम गृहसौख्याची प्राप्ती होईल. जोडीदाराचे भरभरून प्रेम लाभेल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात कसूर करू नये. एकाग्रतेने अभ्यास करावा. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. उत्साहाचा काहीसा अभाव जाणवेल. नोकरदार , व्यावसायिकांसाठी उत्तम कालावधी. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. काही किमती वस्तूंची खरेदी कराल. जोडीदारावरही खर्च होतील.

धनु
हा सप्ताह काहीसा संमिश्र स्वरूपाचा असेल. आपले व्यक्तिमत्त्व उत्साही व आनंदी असेल. कोणतेही प्रश्न सकारात्मकतेने सोडवा. कौटुंबिक सौख्य मध्यम स्वरूपाचे राहीलं. आपल्या बोलण्यातून परिवारातील लोक दुखावले जाणार नाही ना याची काळजी घ्यावी. गृहसौख्य चांगले राहीलं. संतती सौख्य लाभेल. जोडीदाराशी काहीसा विसंवाद संभवतो. नोकरी व्यावसायिकांना या सप्ताहात कामाचा ताण प्रचंड राहीलं. कष्टाच्या तुलनेत लाभ कमी प्रमाणात संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीच्या कुरबुरी सतावतील. संततीवर खर्च होतील.

मकर
या सप्ताहाची सुरुवात काहीशी चिंताग्रस्त, तणावयुक्त असेल. या सप्ताहात आपली स्वतःची स्पर्धा स्वतःशीच असेल. आपल्या मेहनतीवर, परिश्रमावर विश्वास ठेवून कर्म करा. आपल्या रागावर, संतापावर नियंत्रण ठेवणे अतिआवश्यक. शांत चित्ताने व स्थिर बुद्धीने कार्यभाग साधावा. कौटुंबिक सौख्य सामान्य राहीलं. जोडीदाराचे मात्र उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराचे भरभरून प्रेम मिळेल. भावंडांचे सौख्य लाभेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम कालावधी. आरोग्य सर्वसामान्य राहीलं. नोकरदार व्यावसायिकांसाठी यशदायी काळ. जुनी येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांनी असून जास्तीत जास्त अभ्यास करावा.

कुंभ
या सप्ताहात परिश्रमाला महत्त्व द्याल. भरपूर मेहनत घेऊन कर्तुत्व सिद्ध कराल. कुटुंबीयांची चिंता सतावेल, मात्र कुटुंबाचे भरभरून सहकार्य लाभेल. पारिवारिक सौख्य, गृहसौख्य लाभेल. वास्तू, वाहनसौख्य मध्यम स्वरूपाचे राहीलं. संततीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यांचे शिक्षण, आरोग्य, करियर याबाबत सजग राहावे लागेल. दांपत्यजीवन सुरळीत राहीलं. नोकरदार, व्यावसायिकांसाठी अनेक सुसंधी निर्माण होतील. त्याचा अवश्य फायदा करून घ्यावा. त्याचे दूरगामी परिणाम जाणवतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी सातत्याने नियोजनबद्ध अभ्यास करावा. शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.

मीन
या सप्ताहात नवीन उत्साहाने, धडाडीने कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न कराल. काम करतांना एक ऊर्जा जाणवेल. परिवाराचे सहकार्य लाभेल. संततीही मनाप्रमाणे वागेल. दांपत्यजीवनही समाधानी राहीलं. वाहन, वास्तूसौख्य, गृहसौख्य सामान्य राहीलं. नोकरदार मंडळींसाठी आश्वासक सप्ताह. व्यावसायिकांसाठी सर्वसामान्य काळ राहीलं. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे. अनावश्यक खर्च टाळावेत. आवक-जावक यांचा योग्य मेळ घालावा.