सोमवार, २३ जून २०२५
राशिफल
सोमवार, २३ जून २०२५
*मेष*
आज काही कौटुंबिक कारणांमुळे बाहेरगावी जाण्याची शक्यता संभवते. आज कुटुंबीयांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबियांसाठी काही खर्चही संभवतात.
*वृषभ*
आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला जाणार आहे. आपल्या उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. आज आपण आपल्या धाडसी आणि नेतृत्वगुणी स्वभावाने अनेक समस्यांवर सहज मात कराल.
*मिथुन*
आज काही शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान संभवते. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध जाण्याची शक्यता आहे. आज मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
*कर्क*
इतके दिवस तुम्ही घेत असलेल्या मेहनतीची शुभ फलिते तुम्हाला आज प्राप्त होतील. तुमचे कला कौशल्य आज लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकेल त्यातून तुम्हाला सन्मान प्राप्त होईल.
*सिंह*
आज तुमच्या मूळ धाडसी आणि मेहनती स्वभावानुसार तुम्ही कामाला प्राधान्य द्याल. मात्र आपल्या मेहनतीच्या तुलनेत अपेक्षित यश आज मिळणार नाही. कामाचा काहीसा ताण जाणवेल.
*कन्या*
आजचा दिवस शुभ आणि समृद्धीकारक असेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छा आज पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही आनंदीत व्हाल.
*तुळ*
आज काही त्रासदायक, कष्टदायक गोष्टी घडू शकतात. स्वभाव आणि मनःस्थिती दोन्ही अस्थिर असू शकतात. अनावश्यक वाद आणि भांडणे टाळा.
*वृश्चिक*
आज जोडीदारासोबत प्रेम, आनंद आणि सौहार्दाचे नाते प्रस्थापित होईल. दोघांमध्ये प्रेम वाढेल. आज सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल.
*धनु*
आजचा दिवस आपल्यासाठी निराशाजनक असू शकतो. प्रकृती अस्वस्थता जाणवेल. आज आपल्या गुणांची, क्षमतांची, कर्तृत्वाची म्हणावी तितकी दखल घेतली जाणार नाही.
*मकर*
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा असेल. तुमच्या लपलेल्या कलागुणांना आज वाव मिळेल. त्यामुळे आनंद मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात लोकांना नवीन संधी मिळतील.
*कुंभ*
आज उत्तम गृह सौख्याचा आनंद घ्याल. आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याकडे आपला कल असेल. आज आपणास कुटुंबीयांचे देखील पूर्ण सहकार्य मिळेल.
*मीन*
आज काही महत्वाची कामे पूर्ण करतांना आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग कराल. आपल्या आवडी निवडी जपण्यासाठी आज वेळ काढाल. कामानिमित्त काही प्रवासाचे योग संभवतात.