Skip to content

बुधवार, २१ डिसेंबर २०२२

राशिफल

बुधवार, २१ डिसेंबर २०२२

{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजचा दिवस काहीसा कष्टप्रद जाऊ शकतो. आज कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. केवळ आपले काम भले आणि आपण भले अशी भूमिका ठेवावी.

वृषभ
आज उत्तम सहजीवनाचा आस्वाद घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ व सहकार्य लाभेल. व्यापार-व्यवसायात काही नवीन संधी निर्माण होतील.

मिथुन
आज काहीसे अनारोग्य जाणवू शकते. त्यामुळे शारीरिक तसेच मानसिक अस्थिरता जाणवेल. कामाच्या व्यापामुळे दगदग संभवते.

कर्क
आज आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव द्याल. काही मनोरंजनात्मक गोष्टी करण्यात वेळ जाईल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.

सिंह
आज घरातील कामातच संपूर्ण दिवस व्यतीत होईल. मात्र काही महत्वपूर्ण कामे देखील हातावेगळी कराल. घरच्यांचे देखील उत्तम सहकार्य लाभेल.

कन्या
आज व्यवसायवृद्धीचा विचार करून व्यापार-व्यवसायात काही धाडसी निर्णय घ्याल. त्यात ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन अवश्य घ्या. भावंडांचे सहकार्य लाभेल.

तुळ
आज कुटुंबीयांसमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. काही मह्त्वपूर्ण निर्णय घेतांना कुटुंबीयांच्या मताचा अवश्य विचार करा.

वृश्चिक
आजचा दिवस आपलाच आहे. आजचा दिवस उत्साह, आनंद, प्रसन्नता यांनी परिपूर्ण असेल. आजच्या दिवसाचा सदुपयोग करीत आपल्या मनातील इच्छांची पूर्तता कराल.

धनु
आज काहीसे नैराश्य, उदासीनता जाणवू शकते. शारीरिक, मानसिक अस्थिरता जाणवेल. त्यामुळे आज कोणतेही काम शांत चित्ताने व विचारपूर्वक करावे.

मकर
आजचा आपला दिवस लाभ प्राप्तीचा आहे. बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या काही इच्छांची पूर्तता आज संभवते. आपण घेत असलेल्या मेहनतीचे, प्रयत्नांचे फलित आज आपणास मिळेल.

कुंभ
आजचा आपला दिवस कर्मप्रधान असेल. हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी चिकाटीने प्रयत्न कराल.

मीन
आजचा दिवस आपणासाठी उत्तम असेल. भाग्याची, नशिबाची साथ आज लाभेल. काही प्रवास संभवतात. काही अनोळखी व्यक्तींच्या
गाठीभेटी संभवतात