Skip to content

शनिवार, २१ ऑक्टोबर २०२३

राशिफल

शनिवार, २१ ऑक्टोबर २०२३

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद}

मेष
आज काही उपासना, पुजा-अर्चना करण्यात वेळ घालवाल. काही आवश्यक कामेही आज पूर्ण कराल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल.

वृषभ
आजचा आपला दिवस काहीसा धावपळीचा जाऊ शकतो. काहीशी दमछाक, दगदग संभवते. आज घाई, गडबड टाळा. शांतपणे आजचा दिवस व्यतीत करा.

मिथुन
आजचा दिवस आपल्या माणसांसोबत आनंदात, उत्साहात व्यतीत कराल. व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने काही मह्त्वपूर्ण निर्णय आज घ्याल.

कर्क
आज अती उत्साहात आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आज मामा, मावशी यांच्या समवेत दिवस आनंदात, मजेत जाईल. मात्र खाण्यावर नियंत्रण आवश्यक असेल.

सिंह
आज आपल्या काही आवडी निवडी, कलागुण, छंद यांच्यासाठी वेळ काढाल. मुलासमवेत एखादा नवीन छंद जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहाल.

कन्या
आपल्या खंबीर स्वभावानुसार आज काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. घरातील सदस्यांचे पाठबळ व सहकार्य मिळेल. काहीसा नव उत्साह जाणवेल.

तुळ
आज व्यापार – व्यवसायसंबंधी काही महत्वपूर्ण निर्णय घेतांना सजगता बाळगावी. घरात चैतन्याचे वातावरण राहिलं.

वृश्चिक
आज कुटुंबीयांसमवेत संपूर्ण दिवस आनंदात व्यतीत कराल. आज कुटुंबातील सदस्यांना समवेत बाहेर फिरायला जाण्याचे बेत बनवाल.

धनु
आजचा दिवस उत्साहात, आनंदात साजरा कराल. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठीने मन आनंदून जाईल. आजच्या दिवसाचा सदुपयोग करून घ्या.

मकर
आज काही धार्मिक कार्यात मग्न राहाल. आज मन शांत ठेवणे आवश्यक राहिलं. आपले काम भले व आपण भले अशी भूमिका ठेवणे योग्य राहिलं.

कुंभ
आज परिवारासमवेत बाहेर प्रवासाचे योग संभवतात. आज उत्तम भावंड सौख्य मिळेल. काही नवीन वस्तूंची खरेदी कराल.

मीन
आज आपल्या कामातून आनंदाची प्राप्ती कराल. आपल्या मेहनत व परिश्रमाचे चीज आज प्राप्त कराल. मात्र काहीशी दगदग संभवते.