सोमवार, २० जून २०२२


राशीभविष्य
सोमवार, २० जून २०२२
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
*मेष*
आजच्या दिवशी अनेक अडचणी, अडथळ्यांवर मात करून लाभाची, आनंदाची, सौख्याची प्राप्ती कराल. प्रियजनांचा सहवास प्राप्त होईल. त्यामुळे आनंदून जाल.
*वृषभ*
आज आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित कराल. आजच्या मेहनत व परिश्रमावर पुढील लाभ अवलंबून आहेत. त्यामुळे केवळ कर्माला प्राधान्य द्याल.
*मिथुन*
आजचा दिवस सुखमय, आनंदमय असेल. आज नशिबाची, भाग्याची साथ मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे शुभ फलित आज प्राप्त होईल.
*कर्क*
आजच्या दिवशी अचानक काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणतेही महत्वाचे व्यवहार आज टाळावेत. कोणावरही अती विश्वास ठेवू नये.
*सिंह*
आजच्या दिवशी जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. आपणही जोडीदाराला वेळ द्याल. मात्र कोणत्याही परिस्थितीत एकमेकांविषयी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
*कन्या*
आजचा दिवस काहीसा काळजी, चिंता यांनी युक्त जाऊ शकतो. आरोग्यही काहीसे अस्वस्थ राहीलं. तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. आजचा दिवस शांतपणे व्यतीत करावा.
*तुळ*
आजचा आपला दिवस उत्तम आहे. तो आनंदाने, उत्साहाने व्यतीत कराल. आज आपल्यातील कलागुण, आवडीनिवडी, छंद यांना प्रोत्साहन द्याल.
*वृश्चिक*
आजच्या दिवशी गृहसौख्याचा, कुटुंब सौख्याचा आस्वाद घ्याल. कुटुंबीयांसमवेत घरातील काही महत्वाची कामे पूर्ण कराल. खरेदीचे योग संभवतात.
*धनु*
आपल्या दबंग स्वभावाला अनुसरून आजचा दिवस हा पराक्रमाचा असणार आहे.त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घ्या. आज आपल्या कामात नावलौकिक मिळेल. छोटे-मोठे प्रवास संभवतात.
*मकर*
आज कौटुंबिक सौख्याचा आनंद घ्याल. कुटुंबियांना वेळ द्याल. आज आपले कला, छंद यांची जोपासना कराल व त्यातच रममाण व्हाल. काही आर्थिक व्यवहार पूर्ण कराल.
*कुंभ*
आजचा दिवस आपल्यासाठी नवीन ऊर्जा व अभूतपूर्व उत्साह यांनी भरलेला असेल. आजच्या सुंदर व महत्वपूर्ण दिवसाचा अवश्य लाभ करून घ्या. वैवाहिक जोडीदार व व्यावसायिक भागीदार यांना खुष ठेवा.
*मीन*
आजच्या दिवशी काहीशी मानसिक अस्थिरता जाणवेल. त्यामुळे आजच्या दिवशी कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळावेत. त्यामुळे शांतपणे आजचा दिवस व्यतीत करा.