Skip to content

मंगळवार, १९ जुलै २०२२

राशीभविष्य

 

मंगळवार, १९ जुलै २०२२

{आज ज्यांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे त्या सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वाद}

मेष
आजचा दिवस आपल्यासाठी निराशाजनक असू शकतो. आरोग्याच्या काही समस्या सतावतील. आज प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे असेल.

वृषभ
आज आपल्याला लाभ प्राप्ती, इच्छा प्राप्ती संभवते. आज प्रियजनांशी होणाऱ्या वार्तालापामुळे आनंदून जाल.

मिथुन
आजचा आपला दिवस कर्तव्य प्रधानअसेल. आज तुम्ही दिवसभर कामात व्यस्त असाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

कर्क
आज तुम्हाला भाग्य, आनंद आणि सौख्याची प्राप्ती होईल. काही धार्मिक संस्थांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल.

सिंह
आजचा दिवस कठीण, चिंताग्रस्त, तणावपूर्ण असू शकतो. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. फक्त तुमच्या दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करा.

कन्या
आज उत्तम वैवाहिक जीवनाचा अनुभव घ्याल. आज व्यवसायात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. कोणताही निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्या.

तुळ
आज आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास संभवू शकतो. प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवतील. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. आज तुम्हाला चांगले संतानसुखही मिळेल. मुलांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. आज तुम्ही घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. आज तुमच्या सहवासाने घरातील वातावरण उत्साही होईल.

मकर
आजचा आपला दिवस धाडस, शौर्य आणि पराक्रमाचा असेल. इतके दिवस तुम्ही घेतलेल्या मेहनतीच्या बळावर आज तुम्हाला लाभाची प्राप्ती होईल.

कुंभ
आज तुम्हाला कौटुंबिक आनंद मिळेल. आज कुटुंबाला जास्त वेळ द्याल. आज तुम्ही काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहारही पूर्ण कराल.

मीन
आजचा दिवस आपलाच आहे. आज मन खूप प्रसन्न राहील. आज स्वतःसाठी वेळ काढाल. आज आपण काही महत्त्वाचे काम पूर्ण कराल.