मंगळवार, १८ एप्रिल २०२३
राशिफल
मंगळवार, १८ एप्रिल २०२३
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आजचा आपला दिवस काहीसा चिंतायुक्त, मनस्तापदर्शक असेल. मानसिक अस्थिरता, अस्वस्थता जाणवेल. खर्चात अनपेक्षितपणे वाढ होईल. वाहने जपून चालवावीत.
वृषभ
बऱ्याच दिवसांच्या मेहनतीनंतर आजच्या दिवशी अपेक्षित लाभप्राप्ती, इच्छापूर्ती साध्य होईल. त्यामुळे सुखावून जाल. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून आनंद द्विगुणित कराल.
मिथुन
आजचा आपला दिवस कर्म प्रधान असेल. आज आपल्या कामाला जास्त महत्त्व द्याल. कामाचा काहीसा तणाव आज जाणवेल. कामानिमित्त प्रवासाचे योग देखील संभवतात.
कर्क
आजचा आपला दिवस सुखमय, आनंदमय, भाग्यमय असेल. आज नशिबाची व भाग्याची साथ मिळेल. नोकरीनिमित्त काही नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. आजच्या दिवसाचा सदुपयोग करून घ्या.
सिंह
आज काही अडीअडचणींचा. संकटांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या मेहनतीला, प्रयत्नांना अपेक्षित यश आज प्राप्त होणार नाही. शांत चित्त व संयमाने केवळ आपल्या नित्य कर्मावर लक्ष ठेवून आजचा दिवस व्यतीत करावा.
कन्या
आज आपल्या जोडीदारासमवेत छान, मजेत वेळ व्यतीत कराल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल आपणही जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी देखील उत्तम दिवस असेल.
तुळ
आज काहीशी चिडचिड, अस्वस्थता जाणवेल.आरोग्याच्या काही तक्रारी सतावतील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरदार मंडळींना आज काहीसा तणाव जाणवेल.
वृश्चिक
आजचा आपला दिवस आनंदात, उत्साहात व्यतीत कराल. आज आपल्यातील कलागुणांना जोपासण्यासाठी वेळ काढाल. संतती समवेत ही अमूल्य वेळ व्यतीत कराल.
धनु
आज कुटुंबातील, परिवारातील सदस्यांसमवेत आनंदात वेळ घालवाल. आजच्या दिवशी सौख्याची प्राप्ती होईल. घरातील काही महत्त्वाची कामे आज पूर्ण कराल. त्यात कुटुंबियांचे सहकार्य लाभेल.
मकर
आजचा दिवस कर्तृत्व, पराक्रम गाजविण्याचा दिवस आहे. आज अधिक मेहनत घेऊन आपली कामे पूर्ण करण्याकडे कल असेल. काही महत्त्वाचे व धाडसी निर्णय घ्याल.
कुंभ
आजचा दिवस कौटुंबिक सौख्य, समाधानाचा आहे. कुटुंबातील सदस्यांसमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. पाहुण्यांचे आदरातिथ्य कराल. काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहारही आज पूर्ण कराल.
मीन
आजच्या दिवशी नाविन्यपूर्ण उत्साह, ऊर्जा, आनंद यांचा अनुभव घ्याल. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असणार आहे. स्वतःसाठी वेळ काढाल. काही महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी देखील कराल.