गुरूवार, १७ ऑक्टोबर २०२४
राशिफल
गुरूवार, १७ ऑक्टोबर २०२४
{आज ज्यांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आपली कल्पकता, बुद्धिमत्ता यांचा आजच्या दिवशी म्हणावा तितका उपयोग होणार नाही. आज खर्चाचा योग्य ताळमेळ साधावा लागेल. कारण काही अनपेक्षित खर्च आज उभे ठाकतील.
वृषभ
आजचा आपला दिवस हा लाभप्राप्ती व इच्छापूर्तीचा असणार आहे. नोकरदार मंडळींना आज अनपेक्षितपणे भाग्यप्राप्ती, लाभप्राप्तीचे योग संभवतात. आज आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.
मिथुन
आजचा आपला दिवस हा कर्म प्रधान असेल. आज आपल्या कर्तव्याला प्राधान्य देऊन आपले काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आजच्या दिवशी प्रतिष्ठा मानसन्मान प्रसिद्धी प्राप्त करण्याचे योग संभवतात.
कर्क
आजचा आपला दिवस उत्तम आनंदप्राप्ती व फलप्राप्तीचा असेल. काही सन्माननीय वंदनीय व्यक्तींचा सहवास आज आपणास लाभू शकतो. काही धार्मिक अथवा शैक्षणिक संस्थेत दानधर्म कराल.
सिंह
आजच्या दिवशी काही शारीरिक, मानसिक अस्थिरता जाणवेल. कोणत्याही प्रलोभनांना, आमिषांना बळी पडू नका. आपले संपूर्ण लक्ष हे आपल्या रोजच्या कामावर केंद्रित ठेवा. विनाकारण लक्ष विचलित होऊ देऊ नका.
कन्या
आजच्या दिवशी आपणास जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्या. आज जोडीदारासह कुटुंबीयांनाही वेळ द्याल.
तुळ
आजच्या दिवशी आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतील. तब्येतीकडे मुळीच दुर्लक्ष करून चालणार नाही. काही स्पर्धक हितशत्रू डोके वर काढतील. आजच्या दिवशी कोणावर ही अति विश्वास ठेवू नये.
वृश्चिक
आजच्या दिवशी आपणास उत्तम संतती सौख्याची प्राप्ति होईल. मुलांसमवेत आजचा दिवस आनंदात मजेत व्यतीत कराल. विद्यार्थ्यांनी देखील आजच्या दिवसाचा सदुपयोग करीत अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
धनु
आजच्या दिवशी आपणास उत्तम गृहसौख्य वाहन वास्तू सौख्य लाभेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली रेंगाळलेली रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवशी प्रयत्न कराल. आज कुटुंबीयांसमवेतच रममाण व्हाल.
मकर
आजच्या दिवशी आपली बुद्धिमत्ता व आपले कौशल्य यांना परिश्रमाची पराक्रमाची जोड देऊन आपले ध्येय साध्य कराल. आजच्या दिवशी आपल्यातील लेखन कौशल्याला देखील उत्तम वाव मिळू शकतो. भावंडांचे सौख्य देखील लाभेल.
कुंभ
आजच्या दिवशी उत्तम कौटुंबिक सौख्याचा आनंद घ्याल. परिवारातील सदस्यांसमवेत आजचा दिवस अगदी मजेत जाईल. आपल्या नेतृत्वगुणी स्वभावाने आज सर्वांना हवेहवेसे वाटेल. पाहुण्यांची रेलचेल संभवते.
मीन
आजच्या सुंदर दिवसाचा योग्य नियोजन करून यथार्थ उपयोग करून घ्या. आपली बुद्धिमत्ता व उत्साह यांच्या जोरावर आज कोणतेही काम सहज पूर्ण कराल आज योग्य कर्तृत्व गाजवून नावलौकिक मिळवाल.