सोमवार, १७ जुलै २०२३
राशिफल
सोमवार, १७ जुलै २०२३
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आज आपल्यातील धाडसी स्वभावाचा, कर्तुत्वाचा व उत्साहाचा योग्य उपयोग करून जास्तीत जास्त लाभ करण्याचा प्रयत्न कराल. काही प्रवास योग संभवतात
वृषभ
आज पारिवारिक, कौटुंबिक सौख्याचा आनंद घ्याल. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वेळ द्याल. कुटुंबीयांसमवेत त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा.
मिथुन
आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय सुंदर व महत्त्वाचा असेल. काहीतरी नवीन गोष्टी करण्याकडे आज आपला ओढा राहील. नवीन ऊर्जा, उत्साह, उमेद यांनी परिपूर्ण असा दिवस असेल.
कर्क
आज काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता राहील. एक प्रकारचे नैराश्य जाणवेल. काही अनावश्यक खर्च देखील संभवतात. खर्चाचा योग्य ताळमेळ साधावा.
सिंह
आजचा आपला दिवस लाभ, यश,आनंदाची प्राप्ती करणारा असेल. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. मनातील सर्व इच्छांची पूर्तता होईल.
कन्या
आजचा संपूर्ण दिवस कार्यमग्न असाल. आपल्यातील बुद्धिमत्ता व व्यवहार कौशल्य यांचा योग्य वापर करत आज कार्यसिद्धी साधाल. कर्तव्यपूर्तीने समाधान प्राप्त होईल.
तुळ
आजच्या दिवशी भाग्याची, सौख्याची, आनंदाची प्राप्ती कराल. आपल्यातील कलाकौशल्य, रसिकता, मधुरता यांचा योग्य ताळमेळ साधत मजेत दिवस घालवाल.
वृश्चिक
आजच्या दिवशी काहीसे मानसिक अस्थैर्य जाणवेल. अचानक काही अडचणी समोर येऊ शकतात. धीराने त्यांचा सामना करणे हितावह राहिलं.
धनु
आजच्या दिवशी वैवाहिक सुखाचा आस्वाद घ्याल. वैवाहिक जोडीदाराला मनासारखा वेळ द्याल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत देखील विचारात घ्याल.
मकर
आजचा दिवस काहीसा कष्टप्रद राहू शकतो. काहीसे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याच्या शक्यता राहतील.
कुंभ
आज आपल्या बुद्धिचातुर्याने दिवस आनंदात, मजेत व्यतीत कराल. एक नावीन्यपूर्ण उत्साह व उमेद आज आपल्यात असेल. संतती सौख्य देखील उत्तम लाभेल.
मीन
आजच्या दिवशी उत्तम गृह सौख्याची प्राप्ती होईल. आज घरातील सर्वांची काळजी घ्याल. घरातील बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आज झपाट्याने पूर्ण कराल.