Skip to content

मंगळवार, १७ जुन २०२५

राशिफल

मंगळवार, १७ जुन २०२५

*मेष*
आजच्या दिवशी काही इच्छित तर काही अनपेक्षित लाभाची, आनंदाची प्राप्ती संभवते. आपल्या मेहनतीचे, प्रयत्नांचे शुभ फळ आज मिळेल. आज आपले कौतुक देखील होईल

*वृषभ*
आज आपल्या कार्यक्षेत्रात स्व कर्तुत्वाने इच्छित ध्येय साध्य कराल. आपले काम चोख पार पाडण्याकडे कल असेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

*मिथुन*
आजच्या दिवशी मनात असलेली कार्ये पूर्णत्वास नेण्यासाठी भाग्याची साथ मिळेल. त्यामुळे कामाचा हुरूप वाढेल. काही प्रवास देखील संभवतात. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

*कर्क*
आजचा दिवस काहीसा अडचणींनी युक्त जाऊ शकतो. वादविवादापासून दूर राहणे, प्रलोभनांपासून अलिप्त राहणे हितावह राहिलं. उगाच निरर्थक गोष्टीत लक्ष घालू नये.

*सिंह*
आजच्या दिवशी उत्तम सहजीवनाचा आनंद घ्याल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. जोडीदारासमवेत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल.

*कन्या*
आज प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक राहील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हित शत्रूंपासून सांभाळून राहावे. नको त्या गोष्टींमध्ये वेळ व्यर्थ जाऊ देऊ नका.

*तुळ*
आजच्या दिवशी आपली सर्व महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक राहीलं. आज आपल्यातील सुप्त कलागुणांनाही वाव द्याल. काही प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.

*वृश्चिक*
आज कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण प्रसन्न, आनंदी, समाधानी राहिलं. काही नवीन वस्तूंची खरेदी संभवते. घरातील ज्येष्ठांची सेवा कराल.

*धनु*
आज काही महत्वाची कामे हातावेगळी कराल. मात्र कामे साध्य करण्यासाठी मेहनत देखील घ्यावी लागेल. अधिक प्रयत्न व परिश्रम करून यशप्राप्ती कराल.

*मकर*
आज कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल. काही जुन्या गुंतवणुकी आर्थिक फायदा मिळवून देतील.

*कुंभ*
आजचा दिवस हा आपलाच आहे. सर्वकाही मनाजोगते घडेल. अपेक्षेपेक्षा जास्त सुखाची प्राप्ती आज संभवते. आजच्या सुंदर, उत्साहपूर्ण दिवसाचे योग्य नियोजन करून त्यानुसार कृती करा.

*मीन*
आज काहीशी दगदग, धावपळ वाढेल. आज कोणतीही गोष्ट सहज साध्य होणार नाही. त्यासाठी अधिकचे परिश्रम घ्यावे लागतील. मन काहीसे उदास राहिलं.