Skip to content

मंगळवार, १६ मे २०२३

राशिफल

मंगळवार, १६ मे २०२३

{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजचा दिवस काहीसा कष्टप्रद, तणावपूर्ण जाऊ शकतो. आज अत्यंत विचारपूर्वक खर्च करावेत. अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळावी.

वृषभ
आज उत्तम भौतिक सुखांची प्राप्ती कराल. आज होणाऱ्या लाभातून आनंदाची अनुभूती घ्याल. आज आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.

मिथुन
आजचा आपला दिवस कर्म प्रधान असेल. आज कामाला जास्त महत्त्व द्याल. हातातील कामे पूर्णत्वास नेण्याकडे कल राहीलं.

कर्क
आज आपल्या भाग्याने अपेक्षित लाभप्राप्ती, यशप्राप्ती कराल. नशिबाची आज उत्तम साथ लाभेल. त्याचा अवश्य लाभ करून घ्या.

सिंह
आजचा दिवस अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. मात्र आपण ध्येयावर लक्ष ठेवून शांतचित्ताने काम करावे.

कन्या
आज जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. आपणही जोडीदाराला भरभरून प्रेम द्याल. आज जोडीदारासमवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल.

तुळ
आज काहीशी प्रकृती अस्वस्थता जाणवेल. वेळीच योग्य उपचार करून घेणे गरजेचे राहिलं. स्पर्धक,विरोधकही त्रास देण्याचा प्रयत्न करतील.

वृश्चिक
आज उत्तम संततीसौख्य प्राप्त होईल. मुलांच्या समवेत दिवस आनंदात व्यतित कराल. आज आपल्यातील काही सुप्त कलागुणांना चालना मिळेल.

धनु
आज घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न राहीलं. आज उत्तम वाहन – वास्तूसौख्य लाभेल. घराच्या सजावटीसाठी काही वस्तूंची खरेदी कराल.

मकर
आजचा आपला दिवस पराक्रमाचा, धाडसाचा असेल. व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने एखादे महत्वाचे, धाडसी पाऊल उचलाल. भावडांचे सहकार्य लाभेल.

कुंभ
आज कुटुंबीयांसमवेत दिवस अगदी मजेत व्यतीत कराल. कुटुंबियांसमवेत एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. सर्वांच्या आवडी निवडी जपाल.

मीन
आजचा दिवस आपलाच आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज स्वतःसाठी वेळ काढाल. आपल्या आवडी निवडी आज जोपासाल. आजच्या दिवसाचा अवश्य लाभ करून घ्या.