Skip to content

मंगळवार, १६ जानेवारी २०२४

राशिफल

मंगळवार, १६ जानेवारी २०२४

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आज काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता राहील. काही अनावश्यक खर्च देखील संभवतात. खर्चाचा योग्य ताळमेळ साधावा.

वृषभ
आजचा आपला दिवस लाभ, यश, आनंदाची प्राप्ती करणारा असेल. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. मित्रमंडळींसमवेत दिवस मजेत जाईल.

मिथुन
आपल्यातील बुद्धिमत्ता व व्यवहार कौशल्य यांचा योग्य वापर करत आज कार्यसिद्धी साधाल. संपूर्ण दिवस कार्यमग्न असाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

कर्क
आजच्या दिवशी भाग्याची, सौख्याची, आनंदाची प्राप्ती कराल. आपल्यातील कलाकौशल्य, रसिकता, मधुरता यांचा योग्य ताळमेळ साधत मजेत दिवस घालवाल.

सिंह
आजच्या दिवशी काहीसे मानसिक अस्थैर्य जाणवेल. आपल्यातील ताकद, धडाडी,शौर्य यांचा अतिरेक टाळावा .अन्यथा मनस्ताप, पश्चाताप होऊ शकतो.

कन्या
आजचा आपला दिवस उत्साही, आनंदी असेल. वैवाहिक जोडीदाराला मनासारखा वेळ द्याल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत देखील विचारात घ्याल.

तुळ
आजचा दिवस काहीसा कष्टप्रद राहू शकतो. मात्र आपण आपल्या नित्य कर्मावर लक्ष ठेवून आजचा दिवस व्यतीत करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक
आज आपल्या बुद्धिचातुर्याने दिवस आनंदात, मजेत व्यतीत कराल. एक नावीन्यपूर्ण उत्साह व उमेद आज आपल्यात असेल. संतती सौख्य देखील लाभेल.

धनु
आजच्या दिवशी उत्तम गृह सौख्याची प्राप्ती होईल. आज घरातील सर्वांची काळजी घ्याल. घरातील बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आज झपाट्याने पूर्ण कराल.

मकर
आज आपल्यातील धाडसी, उत्साही स्वभावाचा योग्य उपयोग करत काही महत्वपूर्ण निर्णय घ्याल. आपल्या बुद्धिमत्तेला आज कर्तुत्वाची जोड देखील लाभेल.

कुंभ
आज पारिवारिक, कौटुंबिक सौख्याचा आनंद घ्याल. कुटुंबीयांसमवेत वेळ मजेत जाईल. बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखाल.

मीन
आजचा दिवस आपल्यासाठी नवीन उत्साह, ऊर्जा, उमेद यांनी परिपूर्ण असेल. आज आपल्या मनातील इच्छांची पूर्तता होईल. आजच्या दिवसाचा सदुपयोग अवश्य करा.