Skip to content

१५ ते २१ ऑक्टोबर २०२३

राशिफल

१५ ते २१ ऑक्टोबर २०२३

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य, दांपत्य सौख्य चांगले असेल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. कुटुंबीयांसमवेत अगदी उत्साहात हा काळ व्यतीत कराल. खरेदीचे योग संभवतात. मात्र कोणत्याही प्रलोभनांना, आमिषाला बळी पडू नका. सप्ताहाच्या उत्तरार्धात भाग्याची उत्तम साथ मिळेल. काही दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. काही धार्मिक स्थळांना भेटी द्याल.

वृषभ
हा सप्ताह आपणासाठी सामान्य असेल. गृहसौख्य, कौटुंबिक सौख्य, दाम्पत्य सौख्य सर्वसामान्य राहिलं. कुटुंबीयांना काही अनोखे आश्चर्यचकित करणारे सरप्राईज द्याल. त्यामुळे कुटुंबीयही सुखावून जातील. मात्र सण, उत्सवाच्या वातावरणात कुटुंबियांची काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य व साथ मिळेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात काही प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबीयांसमवेत काही तीर्थक्षेत्रांना जाण्याचे बेत आखाल.

मिथुन
सप्ताहाची सुरुवात उत्साहपूर्ण असेल. गृहसौख्य व कुटुंबसौख्य चांगले असेल. संततीकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल. संततीवर काही खर्च संभवतात. संतती तसेच जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यापार, व्यावसायिकांसाठी उत्साहाचा काळ असू शकतो. सण,उत्सवाच्या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पै – पाहुण्यांनी घर आनंदाने भरून जाईल. त्यामुळे अधिकच उत्साह जाणवेल. बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखाल.

कर्क
या सप्ताहात पारिवारिक सौख्य, गृहसौख्य, संततीसौख्य चांगले राहील. हा सप्ताह घरातील सदस्यांसमवेत आनंदात, उत्साहात व्यतीत कराल. काही नवीन वस्तूंची खरेदी संभवते. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. माहेरच्या मंडळींच्या गाठीभेटी संभवतात. जुन्या मित्र-मैत्रिणींची देखील भेट घडेल. खूप दिवसांपासून मनात असलेल्या सुप्त इच्छा या सप्ताहात पूर्ण कराल. आपल्या काही आवडीनिवडी, छंद यांची जोपासना देखील या सप्ताहात कराल.

सिंह
सप्ताहाच्या सुरुवातीला काही धाडसी, महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन कामाला लागाल. कुटुंब सौख्य, गृहसौख्य, संततीसौख्य उत्तम राहील. जोडीदाराचे सहकार्य व प्रेम लाभेल. घरातील काही बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. संततीवर काही खर्च संभवतात. छोटे-मोठे प्रवासाचे बेत आखाल. कुटुंबीयांसमवेत संपूर्ण सप्ताह मजेत आनंदात प्रसन्न वातावरणात व्यतीत कराल. आपल्या प्रसन्न, हसतमुख स्वभावाने घरातील सर्वांचे मन जिंकून घ्याल.

कन्या
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल. कुटुंबसौख्य, गृहसौख्य, दांपत्य सौख्य सर्वसामान्य राहील. कुटुंबियांसमवेत आनंदात वेळ घालवाल. त्यांना वेळ द्याल. घराच्या सजावटीच्या दृष्टीने काही नविन खरेदी कराल. घरातील ज्येष्ठांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त कराल. जोडीदाराचे व संततीचे भरभरून प्रेम व सहकार्य मिळेल. कुटुंबीयांना सरप्राईज करण्यासाठी काही योजना आखाल. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेटी संभवतात.

तुळ
हा सप्ताह आपणासाठी चांगला असणार आहे. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य, संततीसौख्य उत्तम राहिलं. हा सप्ताह जास्तीत जास्त वेळ कुटुंबीयांसमवेत व्यतीत कराल. कुटुंबीयांना त्यांच्या मनाजोगता वेळ द्याल. कुटुंबीयांसमवेत बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखाल. तसेच त्यांच्या समवेत सुग्रास भोजनाचे बेत देखील रचाल. जोडीदाराचेही संपूर्ण सहकार्य मिळेल.हा सप्ताह आपणासाठी चांगला असला तरी घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. पूर्ण विचाराअंती कोणतेही कार्य करा.

वृश्चिक
सप्ताहाच्या सुरुवातीला काहीसे नैराश्य जाणवेल. काही आर्थिक नुकसान संभवते. त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगावी. मात्र कुटुंबीयांची साथ व आपल्या इच्छाशक्तीने यावर मात करून उर्वरित सप्ताह नविन उत्साहाने, ऊर्जेने, आनंदात व्यतीत कराल. गृहसौख्य, कुटुंबसौख्य, संततीसौख्य चांगले राहीलं. जोडीदाराचेही भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. कुटुंबीयांसमवेत हा सप्ताह आनंदात व्यतीत कराल.

धनु
सप्ताहाची सुरुवात चांगली असेल. अचानक काही लाभ संभवतील. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य चांगले असेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. काही छोटे मोठे प्रवासाचे बेत आखाल. भावंडांवर परिवारावर अधिक खर्च कराल. आपल्या रसिक स्वभावाने सण, उत्सवात अधिकच रंगत आणाल. परिवारासोबत काही मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन कराल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण मात्र आवश्यक राहील.

मकर
सप्ताहाची सुरुवात धडाक्यात कराल. आपले कर्तव्य चोखपणे पार पाडण्याकडे संपूर्ण कल राहीलं. कौटुंबिकसौख्य, गृहसौख्य, संततीसौख्य, दांपत्यसौख्य सर्वसामान्य राहीलं. बऱ्याच दिवसांपासून असलेल्या काही अपेक्षांची इच्छांची पूर्तता या सप्ताहात होईल. आपल्या आवडत्या व्यक्तींचा सहवास, जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेटी संभवतील. खर्च मात्र तारतम्याने करावेत. विनाकारण नको त्या गोष्टींची खरेदी करू नये.

कुंभ
हा सप्ताह आपणासाठी उत्तम असेल. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य, संततीसौख्य चांगले राहीलं. जोडीदाराचे देखील भरभरून प्रेम उत्तम सहकार्य मिळेल. कुटुंबियांसमवेत हा सप्ताह आनंदात, उत्साहात साजरा कराल. पाहुण्यांच्या आगमनाने उत्साहात अधिकच भर पडेल. काही लाभप्राप्ती, यशप्राप्ती देखील संभवते. भाग्याची साथ लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रात देखील उत्तम कामगिरी बजावाल. वरिष्ठांकडून देखील कौतुकाची थाप मिळेल.

मीन
सप्ताहाच्या सुरुवातीला काही समस्यांचा, अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. काही प्रसंगी मनस्तापही होऊ शकतो. मात्र आपल्या बुद्धिचातुर्याने आपण निश्चितच यावर मात करू शकाल व उर्वरित सप्ताह आनंदात, उत्साहाने व्यतीत कराल. सप्ताहाच्या मध्यात भाग्याची, नशिबाची उत्तम साथ मिळेल. काही दूर प्रवासाचे बेत देखील आखाल. कौटुंबिक सुख चांगले राहिलं.कुटुंबीयांसमवेत आनंदात, उत्साहात, मजेत हा सप्ताह व्यतीत कराल.