Skip to content

शुक्रवार, १२ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य

 

शुक्रवार, १२ ऑगस्ट २०२२

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }


*मेष*
आजचा संपूर्ण दिवस कार्यमग्न राहाल. कामाचा व्याप आज संपतो,की नाही असे वाटेल. मात्र कामातूनच आर्थिक लाभ देखील संभवतात. त्यामुळे प्रसन्न चित्ताने व निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडा.

*वृषभ*
आजचा आपला दिवस हा यश, कीर्ती, मानसन्मान, प्रसिद्धी, नावलौकिक यांची प्राप्ती करण्याचा असेल. त्यामुळे आजच्या दिवसाचे योग्य नियोजन करून त्यानुसार कृती करणे आवश्यक राहील.

*मिथुन*
आजचा दिवस काहीसा त्रासदायक, कष्टदायक जाऊ शकतो. काही मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने चिडचिड संभवते. विनाकारण वाद-विवाद, कटकटी यासारखे प्रसंग टाळा.

*कर्क*
आज उत्तम दांपत्य सौख्याची प्राप्ती कराल. आज जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. दोघांमधील प्रेम आज वृद्धिंगत होईल. त्यामुळे प्रसन्न, आनंदी राहाल.

*सिंह*
आज आरोग्याच्या काही कुरबुरी जाणवतील. नकारात्मकता, नैराश्य जाणवेल. आजच्या दिवशी अनावश्यक गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. आपले काम भले आणि आपण भले ही भूमिका ठेवणे योग्य राहील.

*कन्या*
आजच्या दिवशी उत्तम संततीसौख्याची प्राप्ती कराल. आज दिवसभर नवीन उत्साह व नवी उमेद यांचा अनुभव घ्याल. आपल्या काही सुप्त कलागुणांसाठी आज वेळ काढाल.

*तुळ*
आजच्या दिवशी उत्तम गृह सौख्य लाभेल.घरात चैतन्याचे, आनंदाचे, समाधानाचे वातावरण राहीलं. घरातील ज्येष्ठ मंडळींची सेवा, सुश्रुषा कराल. माहेरच्या मंडळींचा सहवास लाभू शकतो.

*वृश्चिक*
आज काही महत्वाच्या कामांसाठी वेळ काढाल. कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन देखील कराल.आज आपल्या उपजत कलेच्या माध्यमातून अर्थार्जनही कराल.

*धनु*
आज आपल्या वाक्चातुर्याने सर्वांची मने जिंकून घ्याल.तसेच इच्छित कार्यसिद्धी देखील कराल. आज काही धनप्राप्तीचे योग देखील संभवतात.

*मकर*
आजचा दिवस आनंदात, उत्साहात, मजेत व्यतीत कराल.काही नवीन कामे हाती घ्याल. त्यासाठी उत्साहाने नियोजन व आखणी कराल. आज स्वत:साठी वेळ काढाल.

*कुंभ*
आज काही अनपेक्षित,अवास्तव खर्च निर्माण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहिलं.आज हिशोबी वृत्तीने वागणे श्रेयस्कर ठरेल.नको त्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये.

*मीन*
आजचा दिवस आनंदाचा,प्रसन्न व उत्साहवर्धक असेल. तो तितक्याच उत्साहाने मजेत व्यतीत करा.मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील.त्यांच्या सहवासाने सुखावून जाल.