Skip to content

गुरूवार, ११ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य

 

गुरूवार, ११ ऑगस्ट २०२२

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजच्या दिवशी आपल्या कार्यक्षेत्रात आपली नवीन ओळख निर्माण कराल. आपले काम अधिक चोख, प्रामाणिकपणे करण्याकडे आपला कल असेल. वरिष्ठ, सहकारी यांचेही अपेक्षित सहकार्य मिळेल.

वृषभ
आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम असेल. काही धार्मिक कार्यात दानधर्म कराल. विद्वान, गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त कराल. आजच्या दिवसाचा सदुपयोग करा.

मिथुन
आजच्या दिवशी नको त्या गोष्टींमध्ये विनाकारण लक्ष देणे टाळावे. आपले काम भले आणि आपण भले अशी भूमिका आजच्या दिवशी ठेवणे, योग्य राहील.

कर्क
आज दाम्पत्य जीवनात समाधान लाभेल. दोघांमधील संबंध सलोख्याचे, सौख्याचे ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. सौख्याची प्राप्ती संभवते.

सिंह
आजच्या दिवशी अती उत्साहात कामे पूर्ण करतांना आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज नातलगांच्या गाठीभेटी संभवतात.

कन्या
आजच्या दिवशी अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील. मात्र आपण उत्साहाने आपली सर्व कामे, कर्तव्ये पार पाडाल. कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल.

तुळ
आज पारिवारिक सौख्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांसमवेद आजचा दिवस अतिशय आनंदात साजरा कराल. आज गृहसजावटीच्या काही वस्तूंची खरेदी संभवते.

वृश्चिक
आज काहीतरी नवीन करून दाखविण्याची इच्छा निर्माण होईल. मात्र त्यावर योग्य नियोजन व त्यानुसार कृती करणे महत्त्वाचे असेल. काही प्रवासाचे योग संभवतात.

धनु
आज पारिवारिक सौख्याचा आनंद घ्याल. आजचा दिवस कुटुंबीयांसमवेत अगदी मजेत व्यतीत कराल. मात्र आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आजच्या दिवशी गरजेचे राहील.

मकर
आज नाविन्यपूर्ण उत्साह, आनंद यांचा अनुभव घ्याल. एक नवीन उमेद, आशा, आकांक्षा आज निर्माण होतील व त्या पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न कराल.

कुंभ
आज अती उत्साह टाळलेला आपल्यासाठी चांगला राहिलं. याउलट आपला जास्तीत जास्त वेळ मनन, चिंतन करण्यात व्यतीत करावा. आज खर्चावर नियंत्रण आवश्यक राहिलं.

मीन
बरेच दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीची, परिश्रमाची शुभ फलिते आज आपणास प्राप्त होतील. व्यापार – व्यवसायात काही नवीन संधी प्राप्त होतील. आजच्या दिवसाचा योग्य उपयोग करा.