शनिवार, १० जुन २०२३
![](https://drjyotijoshi.com/wp-content/uploads/2023/06/10-06-2023-2-1024x1024.jpg)
![](https://drjyotijoshi.com/wp-content/uploads/2023/06/10-06-2023-1024x1024.jpg)
राशिफल
शनिवार, १० जुन २०२३
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आज व्यवसायवृद्धीचा विचार करून व्यापार-व्यवसायात काही धाडसी निर्णय घ्याल. त्यात ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन अवश्य घ्या. भावंडांचे सहकार्य लाभेल.
वृषभ
आज कुटुंबीयांसमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. काही मह्त्वपूर्ण निर्णय घेतांना कुटुंबीयांच्या मताचा अवश्य विचार करा.
मिथुन
आजचा दिवस आपलाच आहे. आजचा दिवस उत्साह, आनंद, प्रसन्नता यांनी परिपूर्ण जाईल. स्वतःच्या इच्छेनुसार काही गोष्टी कराल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
कर्क
आज शारीरिक, मानसिक अस्थिरता जाणवू शकते. त्यामुळे काळजी घ्या. डोके शांत व मन स्थिर ठेवा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.
सिंह
इतके दिवस घेत असलेल्या मेहनतीचे, परिश्रमाचे शुभ फलित आज आपणास प्राप्त होईल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा- आकांक्षांची आज प्राप्ती होईल.
कन्या
आजच्या दिवशी आपल्या कामाला अधिक प्राधान्य द्याल. आपले काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
तुळ
आजचा दिवस आपणासाठी उत्तम असेल. भाग्याची, नशिबाची साथ आज लाभेल. काही प्रवास संभवतात. काही अनोळखी व्यक्तींच्या
गाठीभेटी संभवतात.
वृश्चिक
आजचा दिवस काहीसा कष्टप्रद जाऊ शकतो. प्रकृतीची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्या. आज कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका
धनु
आज उत्तम सहजीवनाचा आस्वाद घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ व सहकार्य लाभेल. व्यापार-व्यवसायात काही नवीन संधी निर्माण होतील.
मकर
आज काहीसे अनारोग्य जाणवू शकते. त्यामुळे शारीरिक तसेच मानसिक अस्थिरता जाणवेल. कामाच्या व्यापामुळे दगदग संभवते.
कुंभ
आज आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव द्याल. काही मनोरंजनात्मक गोष्टी करण्यात वेळ जाईल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.
मीन
आज घरातील कामातच संपूर्ण दिवस व्यतीत होईल. मात्र काही महत्वपूर्ण कामे देखील हातावेगळी कराल. एकंदरीत आजच्या दिवशी गृह सौख्याचा आनंद घ्याल.