शुक्रवार, १० मार्च २०२३
राशिफल
शुक्रवार, १० मार्च २०२३
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आज काही अनपेक्षित प्रसंग, समस्या यांचा सामना करावा लागू शकतो. मात्र आपण लक्ष विचलित न होऊ देता केवळ आपल्या नित्य कामांवर लक्ष केंद्रित करा.
वृषभ
आजचा आपला दिवस आनंदाचा असेल. आज आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न कराल. संतती विषयी तळमळ असेल. त्यांच्यावर बारीक लक्षही द्यावे लागेल.
मिथुन
आजचा दिवस हा सौख्य प्राप्तीचा असेल. आपल्या इच्छेप्रमाणे आजचा दिवस व्यतीत कराल. ज्येष्ठांच्या मतांचा, इच्छेचा आदर कराल.
कर्क
आजचा दिवस काहीसा धाडसाचा, पराक्रमाचा असेल. मनाजोगत्या घटना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहाल. व्यवसाय वृद्धीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल.
सिंह
आज काही आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आपली बुद्धिमत्ता व गोड बोलणे यांचा संयोग साधून आपले काम पूर्णत्वास न्याल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
कन्या
आजचा दिवस अतिशय सुंदर उत्साहपूर्ण आहे. अपेक्षेपेक्षा जास्त काही आज मिळेल. एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. जोडीदाराचेही सहकार्य लाभेल.
तुळ
आज काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता आहे. अचानक काही खर्च उद्भवण्याची शक्यता राहिलं. महत्वाची कामे आज शक्यतो टाळावीत.
वृश्चिक
आजचा दिवस हा लाभवृद्धीचा असेल. आपल्या कर्तव्याच्या माध्यमातून पद, प्रतिष्ठा,यश,कीर्ती, नावलौकिक प्राप्त कराल. केलेल्या मेहनतीचे फळ आज प्राप्त होईल.
धनु
आजचा संपूर्ण दिवस कामात व्यस्त असाल. आज काहीशी जास्त मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीत, कष्टात कुठेही दिरंगाई करू नका.
मकर
आज काही मनाजोगत्या घटना घडतील. याचा प्रत्यक्ष प्रत्यय, अनुभव आज येईल. भाग्याची साथ आज मिळेल. त्यामुळे आनंद द्विगुणित होईल.
कुंभ
आज काही अप्रिय व्यक्ती, प्रसंग सामोरे येऊ शकतात. स्थिर बुद्धीने, खंबीरपणे, संयमाने यांचा सामना करावा. निरर्थक गोष्टींमध्ये आपला वेळ व्यर्थ घालवू नका.
मीन
आज उत्तम दाम्पत्य जीवनाचा लाभ घ्याल. सुखाची, प्रेमाची, आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराला खूश ठेवाल. जोडीदाराच्या आवडीनिवडींचा विचार कराल.