मंगळवार, ०९ ऑगस्ट २०२२
राशीभविष्य
मंगळवार, ०९ ऑगस्ट २०२२
{आज ज्यांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद}
मेष
आजचा आपला दिवस भाग्य प्राप्तीचा राहिलं. इतक्या दिवसांपासून घेत असलेल्या कष्टाचे आज चीज होईल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल.
वृषभ
आजचा दिवस काहीसा अडचणी, अडथळ्यांचा असेल. विनाकारण मनस्ताप संभवतो. मात्र आपण फक्त आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करा.
मिथुन
आजचा आपला दिवस उत्तम जाईल. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावना, मताचा आदर करा.
कर्क
आजचा आपला दिवस काहीसा तणावयुक्त जाईल. प्रकृती अस्वास्थ्य जाणवू शकते. आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक राहिलं. कोणावरही अतिविश्वास ठेवू नये.
सिंह
आजचा दिवस नव उत्साहाचा, ऊर्जेचा असेल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना काही नवीन संधी प्राप्त होतील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासासाठी उत्तम दिवस राहील. आज संततीसोबत दिवस मजेत जाईल.
कन्या
आज आपणास उत्तम गृहसौख्य लाभेल. घरातील काही महत्वाची कामे पूर्ण करण्याकडे कल असेल. घरातील स्वच्छतेकडे आज लक्ष द्याल. ज्येष्ठांची सेवा कराल.
तुळ
आजचा आपला दिवस पराक्रमाचा, शौर्याचा असेल. काही महत्वपूर्ण निर्णय घ्याल. आज कामानिमित्त काही प्रवास संभवतात.
वृश्चिक
आज पारिवारिक सुखाचा आस्वाद घ्याल.घरी पाहुण्यांची रेलचेल संभवते. सर्वांच्या साथीने उत्सवाची तयारी कराल. आपल्या आवडी निवडी जोपासाल.
धनु
आजचा दिवस हा आपलाच आहे. आजचा दिवस अतिशय उत्साहात,आनंदात व्यतीत कराल. जोडीदाराचे भरभरून प्रेम आज प्राप्त कराल. आपणही जोडीदाराला वेळ द्याल व दिवस मजेत घालवाल.
मकर
आजचा आपला दिवस मनस्तापाचा, चिंतेचा जाऊ शकतो. प्रकृतीकडेही लक्ष द्यावे लागेल. कुटुंबावर काही खर्च देखील संभवतात. आज शांतपणे विचार करून कृती करावी.
कुंभ
आजचा आपला दिवस इच्छापूर्तीचा आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे, परिश्रमाचे फळ आज आपणास प्राप्त होईल. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.
मीन
आजचा आपला दिवस कामात व्यग्र जाईल. दिवसभर कामाचा बोजा राहिलं. मात्र आपण आपल्या कठीण परिश्रमाने असाध्य ते साध्य करून दाखवाल.