Skip to content

शनिवार, ०९ जुलै २०२२

राशीभविष्य

 

*शनिवार, ०९ जुलै २०२२*

 

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद

 

 

*मेष*

         आज सुखी वैवाहिक जीवनाचा अनुभव घ्याल. आजच्या दिवशी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

 

*वृषभ*

          आजच्या दिवशी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अपरिहार्य राहील. काहीसा नैराश्य, उदासीनता, ताण-तणाव यांनी युक्त दिवस जाऊ शकतो. मनोबल काहीसे डळमळीत होऊ शकते.

 

*मिथुन*

        आपल्या आवडत्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. आपल्या कामाच्या स्वरूपात बदल घडून नवीन जबाबदारी मध्ये वाढ होऊ शकते. संततीशी योग्य संवाद साधणे गरजेचे राहील.

 

*कर्क*

        आजच्या दिवशी काही कडू-गोड अनुभव येतील. काही प्रिय तर काही अप्रिय समाचार प्राप्त होतील. त्याचा गृहसौख्यावर परिणाम होऊ शकतो. शांत चित्त व स्थिर बुद्धीने आजचा दिवस व्यतीत करा.

 

*सिंह*

       आजच्या दिवशी कोणतेही अवास्तव धाडस करण्याचा प्रयत्न करू नका. कोणताही निर्णय योग्य विचाराअंती घ्या. आपल्या निर्णयात थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन घेतल्यास त्याचा निश्चित फायदा होईल.

 

*कन्या*

        आज घरातील शांतता भंग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्यांच्या मताचा आदर करून विनाकारण मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.

 

*तुळ*

          आजच्या दिवशी एक नवा उत्साह, उमेद संचारेल. मनोबल वाढणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूस घडतील. रोजच्या जीवनातील घटना गती घेऊन वेगवान होतील.

 

*वृश्चिक*

       आजचा दिवस काहीसा खडतर, कष्टप्रद जाऊ शकतो. दैनंदिन आयुष्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र विनाकारण कोणतेही दडपण घेऊ नका. शांततेने आजचा दिवस व्यतीत करा.

 

*धनु*

        आजच्या दिवशी आपल्या कार्याची दखल घेतली जाऊन आपण प्रशंसेस पात्र ठराल. आज आपल्या शब्दाला मान प्राप्त होईल आपले मत ग्राह्य धरले जाईल. त्यामुळे मनोबल चांगले राहील.

 

*मकर*

       आज आपल्या कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र कामाप्रती आपला उत्साह दांडगा असल्याने आपण त्या सर्व समस्यांवर समाधान शोधून काढाल.

 

*कुंभ*

          आजच्या दिवशी पूर्वी घेतलेले कष्ट फलद्रूप होताना आढळतील. भाग्याची साथ लाभल्याने उत्कर्षाचा मार्ग प्रशस्त बनेल. अध्यात्मिकतेकडे तसेच धार्मिकतेकडे ओढा राहील.

 

*मीन*

        आजच्या दिवशी एकाच वेळी निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. एक प्रकारची निराशा मनात घर करून राहिलं. कलहसदृश्य परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.