गुरूवार, ०९ फेब्रुवारी २०२३


राशिफल
गुरूवार, ०९ फेब्रुवारी २०२३
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आज नोकरदार मंडळींसाठी काहीसा मनस्तापाचा दिवस असू शकतो. कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कोणावरही अती विश्वास ठेवू नये.
वृषभ
आज आपल्या प्रिय व्यक्तीसह आनंदात वेळ घालवाल. आपले कलागुण, छंद, आवडीनिवडी यांसाठी आज वेळ काढाल. विद्यार्थ्यांनी आज विशेष मेहनत घेऊन अभ्यास करावा.
मिथुन
आज गृहसौख्याचा आनंद घ्याल. आज घरातील रेंगाळलेली कामे पूर्णत्वास नेण्याकडे कल राहीलं. आज स्वतःसाठी खर्च कराल.
कर्क
आज नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याकडे कल राहीलं. आज छोटे-मोठे प्रवास करण्याचा योग संभवतो. आज गुरुजन, विद्वान व्यक्तींचा सहवास लाभू शकतो.
सिंह
आज कुटुंबियांशी आपलेपणाची भावना ठेवून वागा. उगाच वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या. आर्थिक गणिते शांतपणे सोडवावीत. आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही ना, याची काळजी घ्यावी.
कन्या
आजचा आपला दिवस अतिशय उत्तम आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत डोक्यात राग जाणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराचे सहकार्य लाभेल, त्यामुळे मन प्रसन्न राहीलं.
तुळ
आज मानसिक, आर्थिक मनस्तापाचा दिवस संभवतो. स्वतःचा तोल ढळू देऊ नका. आज कामानिमित्त घरापासून दूर जावे लागू शकते. अनावश्यक खर्च टाळा.
वृश्चिक
इतक्या दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे, परिश्रमाचे चीज होईल. आज उत्तम संतती सौख्य लाभेल. मित्र मंडळींच्या गाठीभेटीने मन सुखावून जाईल.
धनु
आजचा आपला दिवस कर्तव्यपूर्तीचा आहे. आजचा दिवस अतिशय व्यस्त जाईल. कामाचा जास्त ताण येईल. कामे पूर्णत्वास नेण्याकडे कल राहीलं. काही महत्वाचे आर्थिक व्यवहार आज पूर्ण कराल.
मकर
आजचा आपला दिवस भाग्यप्राप्तीचा आहे. आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही घेत असलेल्या परिश्रमाची,मेहनतीची आज दखल घेतली जाईल. आज एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल.
कुंभ
आजचा आपला दिवस काहीसा चिंताग्रस्त जाऊ शकतो. आज आपले चित्त, आपले विचार यावर नियंत्रण ठेवा. आपल्या वाणीवर, बोलण्यावर ताबा ठेवा. अनाठायी खर्च टाळा.
मीन
आज वैवाहिक जोडीदारासोबत छान काळ व्यतीत कराल. आज उभयतांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. व्यापारी व व्यावसायिकांसाठी लाभदायक दिवस राहील.