सोमवार, ०७ ऑक्टोबर २०२४


राशिफल
सोमवार, ०७ ऑक्टोबर २०२४
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
*मेष*
आज इतर कोणावरही अवलंबून न राहता आपली कामे आपणच पूर्ण करा. काही अप्रिय व्यक्ती, प्रसंग यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे संयम बाळगून खंबीरपणे वागा.
*वृषभ*
आजच्या दिवशी सुखाची, प्रेमाची, आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या आवडीनिवडी, छंद जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहाल.
*मिथुन*
आजच्या दिवशी काही अनपेक्षित प्रसंग सामोरे उभे राहतील. आरोग्याच्या काही तक्रारीही सतावतील. मात्र आपण लक्ष विचलित न होऊ देता आपल्या नित्य कामांवर लक्ष केंद्रित करा.
*कर्क*
आज आपले मनोइप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आज आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त कराल. आपल्या संततीवरही आज लक्ष द्याल.
*सिंह*
आजचा आपला दिवस हा सौख्य प्राप्तीचा आहे. आज मनातील काही इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्यात वेळ जाईल. घरातील वडीलधार्या व्यक्तींना देखील आज वेळ द्याल.
*कन्या*
आजचा दिवस हा काहीसा धाडसाचा, पराक्रमाचा असेल. सगळ्या गोष्टी आपल्या मनाजोगत्या घडतील. भावंडे, मित्रपरिवार यांचेदेखील सहकार्य लाभेल.
*तुला*
आजच्या दिवशी आपल्या बुद्धिचातुर्याने आपला कार्यभाग साधाल. त्यात कुटुंबातील सदस्यांचे देखील सहकार्य मिळेल. कुटुंबीयांच्या इच्छांचा आदर करून त्यांच्याशी सामंजस्याने वागा.
*वृश्चिक*
आजचा दिवस हा आपल्यासाठी अतिशय सुंदर, उत्साहपूर्ण आहे. अपेक्षेपेक्षा जास्त काही आज प्राप्त होईल. त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्यात निर्माण होईल.
*धनु*
आजच्या दिवशी कोणावरही अति विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रलोभनांना,आमिषांना बळी पडू नका. उधार, उसनवारी टाळा. कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेणे टाळा.
*मकर*
आजच्या दिवशी आपण घेतलेल्या परिश्रमातून लाभ, यश, आनंदाची प्राप्ती कराल. त्याच बरोबर प्रतिष्ठा, यश, कीर्ती, नावलौकिकही मिळवाल. मित्र परिवारासमवेत वेळ देखील मजेत जाईल.
*कुंभ*
आजचा दिवस हा मेहनत, परिश्रम, संघर्षाचा आहे. संघर्षातूनच यशाचा मार्ग आपणास प्राप्त होईल. आज काहीशी दमछाक, धावपळ संभवते. आज आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आपले काम चोख करा.
*मीन*
आज बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील. त्यामुळे आनंदित व्हाल. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घ्या. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल.