Skip to content

बुधवार, दि. ०७ सप्टेंबर २०२२

राशीभविष्य

 

बुधवार, दि. ०७ सप्टेंबर २०२२

{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजचा आपला दिवस कामात व्यग्र जाईल. दिवसभर कामाचा बोजा राहिलं. मात्र आपण आपल्या कठीण परिश्रमाने असाध्य ते साध्य करून दाखवाल.

वृषभ
आज भाग्याची, सौख्याची प्राप्ति कराल. काही प्रवासाचे योग संभवतात. काही धार्मिक, अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुरुजनांचे आशीर्वाद प्राप्त कराल.

मिथुन
आज काही चिंता, तणाव सतावतील. काही कामात विघ्न निर्माण होईल. वाईट संगतीपासून स्वतःला दूर ठेवा. अनावश्यक गोष्टींपासून वेळ वाया घालवू नका.

कर्क
आपली काही स्वप्ने, इच्छा पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्नशील राहाल. त्यादृष्टीने काही महत्त्वाचे पाऊल उचलाल. त्यात भावंड, मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल.

सिंह
आजच्या दिवशी आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतील. तब्येतीकडे मुळीच दुर्लक्ष करून चालणार नाही. काही स्पर्धक हितशत्रू डोके वर काढतील. आजच्या दिवशी कोणावर ही अति विश्वास ठेवू नये.

कन्या
आजचा दिवस नव उत्साहाचा, ऊर्जेचा असेल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना काही नवीन संधी प्राप्त होतील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासासाठी उत्तम दिवस राहील. आज संततीसोबत दिवस मजेत जाईल.

तुळ
आज आपणास उत्तम गृहसौख्य लाभेल. घरातील काही महत्वाची कामे पूर्ण करण्याकडे कल असेल. घरातील स्वच्छतेकडे आज लक्ष द्याल. ज्येष्ठांची सेवा कराल.

वृश्चिक
आजचा दिवस कर्तृत्व, पराक्रम गाजविण्याचा दिवस आहे. आज अधिक मेहनत घेऊन आपली कामे पूर्ण करण्याकडे कल असेल. काही महत्त्वाचे व धाडसी निर्णय घ्याल.

धनु
आज पारिवारिक सुखाचा आस्वाद घ्याल. काही सहलींचे कार्यक्रम बनवाल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ होईल. घरातील वातावरण प्रसन्न असेल.

मकर
आजच्या सुंदर दिवसाचा योग्य नियोजन करून यथार्थ उपयोग करून घ्या. आपली बुद्धिमत्ता व उत्साह यांच्या जोरावर आज कोणतेही काम सहज पूर्ण कराल आज योग्य कर्तृत्व गाजवून नावलौकिक मिळवाल.

कुंभ
आजच्या दिवशी कोणाशीही वादविवाद, कटकटी होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. अन्यथा मनस्ताप होऊ शकतो. आज काही अनपेक्षित खर्च ही उद्भवतील.

मीन
आजचा आपला दिवस हा लाभप्राप्ती व इच्छापूर्तीचा असणार आहे. नोकरदार मंडळींना आज अनपेक्षितपणे भाग्यप्राप्ती, लाभप्राप्तीचे योग संभवतात. आज आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.