गुरूवार, ०६ जुन २०२४
राशिफल
गुरूवार, ०६ जुन २०२४
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आज कौटुंबिक वातावरण समाधानी,आनंदी व उत्साहवर्धक राहील. कुटुंबीयांसमवेत काही धार्मिक कार्यात मग्न राहाल. काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहारही पार पाडाल.
वृषभ
आजचा दिवस आपणासाठी नवचैतन्याचा व उत्साहवर्धक असेल. आपल्या कलाकृतीचे कौतुक होईल. आज स्वतःसाठी देखील वेळ काढाल.
मिथुन
आज उत्सव साजरा करतांना उत्साह , जल्लोष यांनी आपण परिपूर्ण असाल. मात्र अति उत्साहात घाईत कामे न करता तारतम्य बाळगून कृती करावी.
कर्क
आज उत्तम लाभप्राप्ती, इच्छाप्राप्ती संभवते. आज बऱ्याच गोष्टी आपल्या मनाजोगत्या घडतील. प्रियजनांच्या गाठीभेटी होतील.
सिंह
आजचा संपूर्ण दिवस कामात व्यग्र असाल. आज उत्साहाने, आनंदाने सर्व कामे हातावेगळी कराल. दिवसा अखेरीस कर्तव्यपूर्तीचे समाधान देखील मिळेल.
कन्या
आजच्या दिवशी काही धार्मिक, सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. त्यामुळे कौतुकास, प्रशंसेस पात्र ठराल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तुळ
आजच्या मंगल दिनी उत्साहाने, नवचैतन्याने कामे पूर्ण करण्याकडे कल असेल. मात्र विनाकारण कोणतेही गैरसमज, वाद विवाद टाळा.
वृश्चिक
आजच्या उत्साही वातावरणात जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आज उत्तम वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल. दाम्पत्य जीवनातील मधुरता,प्रेम वृद्धिंगत होईल.
धनु
आजच्या शुभ दिनी अति उत्साहात कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मात्र कामे करतांना आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वतः ची कामे स्वतः च पूर्ण करा.
मकर
आज आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन संधी निर्माण होतील. कलाक्षेत्रातील मंडळींसाठी उत्तम दिवस राहील. काही प्रिय व्यक्तींच्या सहवासाने सुखावून जाल.
कुंभ
आज उत्तम गृहसौख्याची, समाधानाची प्राप्ती कराल. कुटुंब, परिवारासोबत आज आनंदात दिवस व्यतित कराल. ज्येष्ठांचे आशीर्वाद प्राप्त कराल.
मीन
आज काही नवे नियोजन उत्साहात करून त्याप्रमाणे कार्यास प्रारंभ कराल. नवनवीन संकल्पना तसेच नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यावसायिक बदल घडवून आणाल.