Skip to content

रविवार, ०६ ते १२ मार्च २०२२

साप्ताहिक राशीभविष्य

 

रविवार, ०६ ते १२ मार्च २०२२

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }


मेष
हा सप्ताह आपणासाठी नाविन्यपूर्ण उत्साहाचा, चैतन्याचा, अपेक्षित भाग्यप्राप्तीचा असेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली, रखडलेली कामे या सप्ताहात मार्गी लागतील. आपण घेत असलेल्या प्रचंड मेहनत, परिश्रम यांची उचित फले या सप्ताहात प्राप्त होतील. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहाल. आपणास उत्तम कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य, संततीसौख्य लाभेल. कुटुंबियांच्या भावभावना, त्यांच्या गरजा समजून घेणे आवश्यक राहील. जोडीदाराचेही भरभरून प्रेम, सहकार्य व पाठबळ लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रासंबंधित काही महत्वपूर्ण निर्णय घ्याल.

वृषभ
या सप्ताहाची सुरुवात काहीशी चिंतायुक्त, तणावग्रस्त असेल. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यानंतर मात्र उत्साहपूर्ण सप्ताह असेल. आपल्या इच्छित लाभप्राप्तीसाठी अधिक परिश्रम घेण्याची मानसिकता राहील. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी आपल्या परिश्रमाला, मेहनतीला व आपल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न कराल. नवीन नवीन गोष्टी शिकण्याकडे, त्या आत्मसात करण्याकडे कल राहील. पारिवारिक सौख्यही उत्तम लाभेल. कुटुंबियांचे सहकार्य, त्यांचे प्रेम मिळेल.

मिथुन
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचा काहीसा तणाव जाणवेल. मात्र आपण आपले कर्तव्य चोख बजावून आनंदाची प्राप्ती कराल. काही अनपेक्षित लाभाची प्राप्ती संभवते. सप्ताहाच्या मध्यात काहीशी विमनस्क अवस्था होईल. काही अप्रिय घटना, मनस्तापासारखे प्रसंग उद्भवू शकतात. मात्र आपण आपले नित्यकर्म चोखपणे करीत राहा. कोणत्याही अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया जाणार नाही, याची काळजी घ्या. सप्ताहाचा अखेरीस मात्र अभूतपूर्व उत्साह, नवउमेदीचा अनुभव घ्याल. उत्तम कौटुंबिक सौख्याची प्राप्ती कराल.

कर्क
सप्ताहाची सुरुवात कर्मप्रधान असेल. आपल्या कर्तव्याला जास्त प्राधान्य द्याल. आपल्या कर्तव्यपूर्तीतून आनंदाची, यशाची, भाग्याची प्राप्ती कराल. आपल्या कष्टाळू व मेहनती स्वभावाने या सप्ताहात लाभ प्राप्तीदेखील संभवते. अपेक्षित इच्छापूर्ती झाल्याने सुखाऊन जाल सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र काहीसा तणाव जाणवेल खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. काही अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता राहील. विनाकारण वाद विवाद, कटकटी यासारखे प्रसंग टाळावेत. आरोग्याचीही योग्य ती काळजी घ्यावी.

सिंह
सप्ताहाची सुरुवात भाग्यप्राप्ती, यशप्राप्ती, आनंदप्राप्तीची असेल. नशिबाची साथ लाभेल. काही धार्मिक, शैक्षणिक संस्थांना मदत करण्यात पुढाकार घ्याल. आपले व्यक्तिमत्व उत्साही व आनंदी असेल. आपल्या कार्यक्षेत्रातील कोणतेही प्रश्न सकारात्मकतेने सोडविण्याचा प्रयत्न कराल. आपले कर्तव्य बजावताना कोणतीही कसूर ठेवू नका. त्यातूनच पुढे लाभप्राप्ती, सौख्यप्राप्ती संभवते. सप्ताहाच्या अखेरीस मात्र काहीसे नैराश्य, औदासिन्य जाणवेल. कोणावरही विश्वास ठेवू नका. कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका.

कन्या
सप्ताहाच्या सुरुवातीला काही अडचणी, अडथळे यांचा सामना करावा लागू शकतो. काही चिंता सतावतील. आपली स्पर्धा स्वतःशीच असेल. मात्र आपल्या मेहनतीवर, परिश्रमावर विश्वास ठेवून आपले नित्य कर्म करत राहा. शांतचित्ताने व स्थिर बुद्धीने आपला कार्यभाग साधावा. त्यातूनच भाग्याची, यशाची प्राप्ती होईल. सप्ताहाच्या उत्तरार्धात कामाचा अतिरिक्त तणाव जाणवेल. पूर्णतः कामांमध्ये व्यस्त राहाल. बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली काही कामे पूर्णत्वास न्याल. मात्र कामाच्या तणावाने आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही ना याची काळजी घेणे आवश्यक राहील

तुळ
हा सप्ताह मेहनत, परिश्रम, कष्ट यांना प्राधान्य देणारा असेल. भरपूर मेहनत घेऊन आपले कर्तुत्व सिद्ध कराल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य व प्रेम लाभेल. आपणही जोडीदाराला मनाजोगता वेळ द्याल. व्यावसायिकांसाठी काही नवीन संधी निर्माण होतील. आपले व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ होण्यासाठी प्रयत्नशील राहाल. सप्ताहाच्या मध्यात अचानक पणे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही मनस्तापासारखे प्रसंग उद्भवू शकतात. मात्र आपण या सर्वांवर यशस्वीपणे मात करून भाग्याची, सौख्याची प्राप्ती कराल.

वृश्चिक
सप्ताहाच्या सुरुवातीला शारीरिक-मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. योग्य ती खबरदारी घ्यावी. दांपत्य जीवनात जोडीदाराचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या भावना, अपेक्षा समजून घ्या. सप्ताहाच्या उत्तरार्धात अचानकपणे काही संकटांचा सामना करावा लागू शकतो. काही कौटुंबिक समस्या सतावतील. काहीशी विमनस्क अवस्था राहीलं. आपल्या नित्य कर्मावर लक्ष ठेवणे हितकर राहील. विनाकारण नको त्या गोष्टींमध्ये बोलणे, सहभाग घेणे टाळावे.

धनु
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. उत्तम कौटुंबिक सौख्य तसेच वास्तू – वाहन सौख्य लाभेल. कुटुंबीयांचे भरभरून सहकार्य मिळेल. जोडीदाराचेही पाठबळ मिळेल. या सप्ताहात उत्तम संतती सौख्याची देखील प्राप्ती होईल. सप्ताहाच्या मध्यात मात्र आरोग्याच्या काही कुरबुरी जाणवतील. प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व्यापारी व्यवसायिकांना व्यवसायात काही नवीन उमेद निर्माण होईल. नोकरदार मंडळींनी शांतपणे व सामंजस्याने आपले नित्य कर्म करावे उगाच वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

मकर
या सप्ताहाची सुरुवात धडाकेबाज राहील. काही महत्त्वपूर्ण, धाडसी निर्णय घ्याल. नाविन्याचा, उत्साहाचा अनुभव घ्याल. उत्तम कुटुंबसौख्य, गृहसौख्य, संततीसौख्य लाभेल. कुटुंबासमवेत, मुलांसमवेत आनंदात वेळ व्यतीत कराल. अध्यात्मिक प्रगती साधाल. जोडीदाराचेही उत्तम सहकार्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. काही हितशत्रू, स्पर्धक डोके वर काढतील.काही अनावश्यक खर्च संभवतात.

कुंभ
हा सप्ताह आपणासाठी उत्तम असेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबियांबरोबर आनंदात वेळ व्यतीत कराल. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना कुटुंबियांचे मत विचारात घ्यावे. दांपत्य जीवन सर्वसामान्य राहील. घरातील काही महत्त्वपूर्ण कामांची अंमलबजावणी कराल. आपल्या पराक्रमी व धाडसी स्वभावाने यशाची प्राप्ती कराल. उत्तम संततीसौख्य देखील लागेल. सप्ताहाच्या अखेरीस प्रकृतीस्वास्थ्य सांभाळणे गरजेचे असेल. जोडीदाराच्याही आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील.

मीन
हा सप्ताह आपणासाठी उत्तम असेल. या सप्ताहात आनंदप्राप्ती, सौख्यप्राप्ती, लाभप्राप्ती संभवते. उत्तम गृहसौख्य, वास्तू – वाहन सौख्य, कौटुंबिक सौख्य यांची प्राप्ती होईल. आपली मेहनत, परिश्रम व प्रामाणिक कर्म यांनी भाग्याची प्राप्ती‌ कराल. घरातील बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली, रेंगाळलेली काही कामे या सप्ताहात पूर्ण कराल. आपल्या मुलांसमवेत खेळण्यासोबतच त्यांना शिस्त लावण्याचा देखील प्रयत्न कराल. आपले काही कलागुण छंद आवडीनिवडी यांची जोपासना कराल. प्रिय व्यक्तीसह वार्तालाप करून सुखावून जाल.