Skip to content

मंगळवार, ०५ डिसेंबर २०२३

राशिफल

मंगळवार, ०५ डिसेंबर २०२३

{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आपल्या आवडत्या कला क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. आपल्या कामाच्या स्वरूपात बदल घडून नवीन जबाबदारी मध्ये वाढ होऊ शकते. संततीशी योग्य संवाद साधणे गरजेचे राहील.

वृषभ
आजच्या दिवशी काही कडू-गोड अनुभव येतील. घरच्यांसोबत आनंदात दिवस व्यतित कराल. काही पाहुण्यांचे आगमन संभवते.

मिथुन
आजच्या दिवशी अवास्तव धाडस करण्याचा प्रयत्न करू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक करा. आपल्या निर्णयात थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन घेतल्यास त्याचा निश्चित फायदा होईल.

कर्क
आज कौटुंबिक सौख्याचा आनंद घ्याल. कुटुंबातील सदस्यांच्या मताचा आदर करा. विनाकारण मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.

सिंह
आजच्या दिवशी काही मनोबल वाढविणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूस घडतील. नवीन ऊर्जा, उत्साह, उमेद निर्माण होतील.

कन्या
आजचा दिवस काहीसा खडतर, कष्टप्रद जाऊ शकतो. दैनंदिन आयुष्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र विनाकारण कोणतेही दडपण घेऊ नका. शांततेने आजचा दिवस व्यतीत करा.

तुळ
आजच्या दिवशी आपल्या कार्याची दखल घेतली जाऊन आपण प्रशंसेस पात्र ठराल. आज आपल्या शब्दाला मान प्राप्त होईल आपले मत ग्राह्य धरले जाईल त्यामुळे मनोबल चांगले राहील.

वृश्चिक
आजचा दिवस कर्म प्रधान असेल. आज आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र कामाप्रती आपला उत्साह दांडगा असल्याने आपण त्या सर्व समस्यांवर समाधान शोधून काढाल.

धनु
आजच्या दिवशी भाग्याची, नशीबाची साथ मिळेल. भाग्याची साथ लाभल्याने उत्कर्षाचा मार्ग प्रशस्त बनेल. अध्यात्मिकतेकडे तसेच धार्मिकतेकडे ओढा राहील.

मकर
आजच्या दिवशी निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. एक प्रकारचे औदासिन्य जाणवू शकते. वादविवाद सारखी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.

कुंभ
आज सुखी वैवाहिक जीवनाचा अनुभव घ्याल. आजच्या दिवशी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यापार, व्यवसाय संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

मीन
आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्यकडे लक्ष देणे अपरिहार्य राहील. काहीसा नैराश्य, उदासीनता, ताण-तणाव यांनी युक्त दिवस जाऊ शकतो.